गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

*छत्रपती* एक आख्यायिका का झाले...

 फार कमी जणांना माहीत असेल म्हणून शेअर करतोय
पुढच्या पिढीला पण माहीत करून द्या... 

*छत्रपती* एक आख्यायिका का झाले... 

शिवाजी महाराजांचे 7 घोडे -
1- मोती
2- विश्वास 
3- तुरंगी 
4- इंद्रायणी
5- गाजर 
6- रणभीर
7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.
शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत.

छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. 
संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी. 

मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले. 

जगातील 111 देशात १९फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला.

छत्रपती शिवाजी महाराज एक 
भूगर्भ शाश्रज्ञ-  

आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.

छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.  

जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही,  स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.

छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –

प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात 
किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.
याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा. 
पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण 25 फुट व जास्त लांब आहे.

रायगड- 
राज्यभिषेक दिन 6 जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे. 
65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी 
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी.

आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज.

मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एक दमात 100/125 किमी सहज जात कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते.

मुघलांचे घोडे 30/35 किमीवर थांबत कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते.

महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळात 
८ मंत्री
३० विभाग (12 महाल व १८ कारखाने) 
३० विभागात ६०० कर्मचारी
महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल.
रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.

छत्रपती शिवाजी महाराज -
महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रच, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरु केली. महाराज्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली.
म्हणून छत्रपतींना जानता राजा म्हणतात.

वयाच्या 17 व्या शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली. त्यांनी स्वतः डिजाईन करून राजगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो “ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु” होते. बांधकाम खर्च 22000 कोटी. 
या गडावर महाराज 27  वर्ष राहिले. 

1982 साली पोर्तुगालची राजधानी लिसबेन येथे गडकोट/किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते. 

त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर “राजगड” किल्यास प्रथम पारितोषिक दिले. 
महाराज्यांच्या मृत्यूनंतर 302 वर्षांनीही महाराज्यांच्या सन्मान होतो.🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

टिपू सुलतान: शृंगेरी मठ हल्ला आणि ब्रेस्ट टॅक्स रद्द

टिपू सुलतान प्रकरण पेटले की दोन मुद्दे नेहमी खोटे narrative म्हणून पुढे येतात. 

#longpost

मुद्दा क्रमांक 1 टिपू सुलतानला शृंगेरी च्या शंकराचार्यांनी तोंड भरून दिलेला आशीर्वाद आणि मराठा सैन्याने लुटलेला शृंगेरी मठ 

मुद्दा क्रमांक 2 टिपू सुलतान ने रद्द केलेला breast tax . या दोन्ही मुद्द्यांना मी यापूर्वीच पुराव्यासह उत्तर दिलेले आहे. 

ते आता #repost स्वरुपात इथे पुन्हा एकदा खाली देतो आहे. 

टिपू सुलतान च्या समर्थनार्थ पोस्ट लिहिणार्‍या गाढवांना देण्यासाठी हे उत्तर आहे... 

मुद्दा क्रमांक 1 

*शृंगेरी वरील मराठ्यांचा हल्ला*

ऐतिहासिक घटनांचा अभ्यास खूप साकल्याने करणे आवश्यक असते. वरवर अभ्यास केला तर वरवरचे निकाल हातात येतात. म्हणून पूर्ण घटना समजून घ्यायची. मी कधीही जे निष्कर्ष मांडतो ते अश्या अभ्यासातून आणि सर्वांगीण आकलनातून येतात मग ते वर वर प्रचलित गोष्टींच्या विरुद्ध जाणारे असेल तरी ते पूर्ण सत्य असते. 
हे प्रकरण पूर्ण जाणून घ्यायचे असेल तर मैसूर साम्राज्याचा इतिहास ज्ञात असला पाहिजे. मैसूर साम्राज्य वाडीयार साम्राज्य. राजा दुर्बल होता, त्याने हैदर अली ला आधी सेनापती आणि मग पंतप्रधान पद दिले. त्याने आक्रमकपणे साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. दोन उद्दिष्ट समुद्रापर्यंत सत्ता वाढवणे. बंदर पण ताब्यात घेणे जेणेकरून भविष्यात अरबी राष्ट्रांशी व्यापार होऊ शकतो. खरी धार्मिक कारणे त्याला आणि पुत्र टिपू सुलतान ला ज्ञात होती. मुलगा टिपू सुद्धा राज्याचा सर्वेसर्वा झाला पण ऑफिशियली वाडियार होते. 

त्यामुळे काही तोंडदेखल्या गोष्टी होत होत्या. जसे की वाडियार घराणे नेहमीच शृंगेरी पिठाचा आशीर्वाद बाळगून होते. तो तसाच चालू ठेवण्यात टिपू यशस्वी झाला. 

नन्तर टिपू ने मलबार काबीज केले आणि एका दिवसात ५०००० हिंदू कापून काढले, हजारो बलात्कार केले हे सगळे त्याने त्यातील बुतशिकन गाझी जागा झाल्याचे निदर्शक होते. त्याने वाडियार नामधारी राजे करून ठेवले होते. त्याच्या या स्पेसिफिक कृत्याला आचार्यांचा आशीर्वाद नव्हता. त्याने मलबार मोहिमेसाठी आशीर्वाद मागितला, तत्कालीन शंकराचार्यांनी दिला. ही धार्मिक परंपरा आहे आणि जिंकून त्याने तिथे हैदोस केला. पण वरवर पहाता मठाने टिपू सुलतान समर्थन / आशीर्वाद दिला असेच होते. 

ब्रिटीश आणि टिपू यांचा संघर्ष वेगळ्या पातळीचा होता. टिपूला मलबार बंदरामध्ये विकसित करून व्यापाराचा विस्तार करणे हे अपेक्षित होते. या मुद्द्यावर टिपू आणि ब्रिटीश खटकले.
पेशवे किंवा मराठा फौज तोवर यात नाक खुपसत नव्हती कारण तांत्रिकदृष्ट्या राज्य वाडियार यांचे होते. ते हिंदू होते. त्यामुळे मराठ्यांना फरक पडत नव्हता. 
मलबार ला जे झाले त्यातून खूप गोष्टी मराठ्यांना स्पष्ट झाल्या. 

१) वाडियार आता नामधारी राजा आहेत.
२) टिपू कट्टर धर्मांध आहें आणि आता तो तिथे इस्लामी राजवट आणतो.
अर्थात त्याला आता एकतर शरण आणणे , किंवा नष्ट करणे हाच पर्याय होता मराठ्यांनी टिपूला मलबार मधील अत्याचारांच्या बद्दल क्षमा मागावी अन्यथा आम्ही तुझ्यावर हल्ला करू. टिपूने नकार दिला आणि त्यानंतर मराठा फौजा टिपूवर तुटून पडल्या.. मराठ्यांच्या समोर लढण्याचे सामर्थ्य नसलेला टिपू श्रीरंगपट्टण च्या जंगलात जाऊन लपला. ब्रिटीश फौजांनी सुद्धा संधी साधून मराठ्यांशी हातमिळवणी केली. टिपू ला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. 

त्याने मराठ्यांना संदेश पाठवला, तुम्ही आणि मी इथल्या मातीतील आहोत तुम्ही ब्रिटिशांना का मदत करत आहात ? मराठ्यांनी सांगितले मलबार मधील अत्याचारांच्या बद्दल क्षमा माग. भविष्यात धर्मांध वागणार नाही असे अभिवचन दे तुला सोडून देऊ. टिपूने नकार दिला... 

मराठा आणि ब्रिटीश फौजांना फ्रेंच आणि निजाम सुद्धा मदतीला आले आणि सर्वांनी मिळून टिपूचा पाडाव केला. टिपूला शृंगेरी पिठाच्या शंकराचार्यांचा आशीर्वाद होता हे उघड सत्य होते. याची खुन्नस मराठा फौजांच्या डोक्यात होतीच.
 त्यावेळी मराठ्यांच्या फौजांच्या बरोबर पेंढारी मंडळी सुद्धा लढत असत. यांना scavengers म्हणत असत. मुख्य युद्ध संपल्यावर लुटालूट करणाऱ्या 
टोळ्या...अशाच टोळ्यांनी शृंगेरीवर हल्ला चढवला. आणि शृंगेरी मठ लुटला. तिथल्या शंकराचार्यांनी संतापून उपोषण सुरु केले. 

नाना फडणवीस यांनी त्यांना आम्ही नुकसान भरून देऊ सांगितले आणि खेद व्यक्त केला.. खेद बर का क्षमा नाही.. 

आदि शंकराचार्यांचा शिष्य, एकारांत चित्तपावन ब्राह्मण आणि श्री विद्या उपासक असलो तरीही मराठा फौजांनी जे केले त्याचे पूर्ण समर्थन आहे. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांचे हे कर्तव्य होते की जर टिपू त्यांचे ऐकत होता तर त्याला त्याने धर्मांधतेचा त्याग करायला भाग पाडायचे. या उलट त्यांनी त्याला आशीर्वाद दिले त्यामुळे त्यांना शिक्षा मिळायलाच हवी होती आणि ती मिळाली... 

धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती अव्यभिचारी निष्ठा असणे आवश्यक आहे. शृंगेरी मठाधिपती त्याला विसरले तर त्यांना त्याची शिक्षा मिळणारच.  

तळटीप- 

प्रभा मिद्दडी नावाच्या स्त्रीने याचा उल्लेख करणारा एक लेख लिहिला. कट कॉपी पेस्ट वाली मुग्धा कर्णिक या लेखाला आपल्या टाईम लाईन वर घेऊन आग ओकू लागली... त्या दोघींनी सुद्धा हा लेख व्यवस्थित वाचावा म्हणून कोणीतरी त्यांच्या पर्यंत पोचवा. 

मलबार डायरीज नावाचा एक ग्रंथ आहे तो वाचा.. टिपू सुलतान ने मलबार मध्ये केलेले अत्याचार वाचून रक्त थिजून जाईल... टिपू सुलतान हा स्वतःला दक्षिण भारतातील गाझी आणि खलिफा घोषित होण्याच्या वेडाने झपाटलेला होता. तो अरब राष्ट्रांशी संधान साधून संपूर्ण हिंदुस्तान इस्लामी करण्याचे वेडे स्वप्न बाळगून होता त्यामुळे त्याचा समूळ विनाश आवश्यक होता. आणि तो मराठ्यांनी केला... 
यासाठी मराठा सैन्याला लाख वेळा अभिवादन आणि या मार्गात धर्मच्युत होणाऱ्या शंकराचार्यांना झळ बसली ते सुद्धा आवश्यकच ..... 

याच संदर्भातील माझी आणखी एक पोस्ट 

टिपू सुलतान आणि मराठे यांचा संघर्ष यातील कालच्या लेखातील काही राहिलेले मुद्दे ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला. 

टिपू सुलतानचा बाप हैदर अली हा मैसूरचे राजे वाडियार यांच्या सेवेत होता.. कर्तुत्वाच्या बळावर तो सेनापती झाला. त्याने 8000 ब्राह्मण धर्मांतर करण्यास नकार देत होते म्हणून त्यांची कत्तल केली. त्याच्यावर मराठा सैन्याने हल्ला चढवला. तो जीव वाचवण्यासाठी शृंगेरी मठात जाऊन लपला. तत्कालीन मठाच्या अधिपतींनी अर्थात तत्कालीन शंकराचार्यांनी त्याला आश्रय दिला. 

त्यावेळी सांगलीच्या पटवर्धन यांच्या अखत्यारीत तो भूभाग येत होता. त्यांनी मठाला वेढा घातला आणि आतील स्वामींना निरोप पाठवला हैदर अलीला आमच्या स्वाधीन करा तो हिंदूंचा शत्रू आहे. स्वामींनी निरोप पाठवला तो मला शरण आला आहे आणि आपली संस्कृती शरण आलेल्या व्यक्तीचे रक्षण करण्यास सांगते. 
दोन तीन दिवस वाट पाहून शेवटी मराठा सैन्याने मठाच्या दरवाजावर तोफगोळे डागले. हे बघितल्यावर स्वामींनी हैदरला मागच्या दाराने पळून जायला मदत केली. मठ त्याच वेळी उध्वस्त झाला असता पण शंकरचार्य सर्वोच्च धर्मगुरू आहे म्हणून वाचला. 

पुढे टिपूने वाडियार राजांना नामधारी करून सगळी सूत्रे हाती घेतली. त्याने मलबार मोहिमेला जाण्यापूर्वी याच शंकराचार्यांचे आशीर्वाद घेतले होते आणि तिथे जाऊन त्याने हिंदूंचा कत्तलखाना आणि हिंदू स्त्रियांसाठी बलात्कार मोहिमच आरंभली. त्याचे अत्याचार वाचून हात अक्षरशः त्याच्या नरडीचा घोट घ्यायला आतुर होतात इतके क्रूर अत्याचार त्याने केले आहेत. 

म्हणून परत एकदा त्याच्याविरुद्ध मोहीम सुरू झाली. यावेळी निजाम , इंग्रज सुद्धा जोडीला होते. टिपुला मारले मराठ्यांनीच , त्याचा मृतदेह घोड्याला बांधून 8-10 किलोमीटर फरफटत नेला.... 

टिपूच्या मृत्युने इंग्रज प्रबळ झाले , किंवा मराठे दुर्बल झाले असले उफराटे निष्कर्ष कम्युनिस्ट विचारवंत काढतात बाकी कोणीही काढत नाही. 

टिपू मनोविकृत होता, पराकोटीचा धर्मांध होता , प्रचंड हिंदूद्वेष्टा होता आणि तो या भूमीला कलंक होता.. त्यामुळे त्या नरराक्षसाला ठेचणे अत्यंत आवश्यक होते. त्याचा धर्म बंधु असणारा निजाम सुद्धा या मोहिमेत सामील झाला कारण असा विकृत राज्यकर्ता जीवंत असणे कोणत्याच समाजाच्या हिताचे नसते. 

टिपुच्या काळातील पेशव्यांच्या / मराठ्यांच्या सैन्याचा शृंगेरी मठावरील हल्ला हा जुना राग काढण्याचा scavenger मंडळींचा अर्थात लढाईनंतर लुटालूट करणार्‍या मंडळींचा प्रताप होता आणि त्या संदर्भात नाना फडणवीस यांनी फक्त खेद व्यक्त केला. ते पुरेसे बोलके आहे. 

तत्कालीन मराठ्यांच्या संकल्पना सुस्पष्ट होत्या. हिंदवी स्वराज्य याचा अर्थ हिंदूंनी चालवलेले राज्य.. इथे मुसलमानांनी लायकीनुसार आणि इज्जतीत राहावे. धर्मांधता केली तर ठेचून काढू असा सरळसोट विषय त्या काळी होता. त्या सैन्यात किंवा नंतर सुद्धा मुसलमान मंडळी असली तरी ती लायकीनुसार राहायची. आज जे सेक्युलर नावाखाली डोक्यावर मिरे वाटण्याचे उद्योग होतात ते त्या काळी अशक्य होते. 

हा आजच्या दळभद्री आणि चरित्रहीन इतिहासकारांच्या मेंदूला न झेपणारा विषय आहे. त्यामुळे आजचे इतिहासकार म्हणवणारे जे काही बरळतात तो कडक गांजाचा परिणाम असतो. त्याकडे लक्ष देऊ नका. 

याचा एक उपसंहार सुद्धा आहे. 

पटवर्धन यांच्या फौजांनी शृंगेरीवर हल्ला केल्याने त्यांना तिथल्या शंकराचार्यांनी शाप दिला की तुमचा निर्वंश होईल. तो शाप बाधला असून नंतर पटवर्धंनांच्या कुळात दत्तक पुत्र परंपरा सुरू करावी लागली. 

हातभट्टी मारून ब्राह्मण द्वेषाचा इतिहास लिहिणारी मंडळी असे सत्य कधीच सांगत नाहीत. 

पटवर्धन यांचा निर्वंश झाला. 

सदाशिवराव पेशवे , भाऊ पेशवे, नानासाहेब पेशवे तिघेही शेवटच्या क्षणापर्यंत देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्यच या देशावर राहावे यासाठी लढले आणि मेले आहेत. 

पटवर्धन यांचे सगळे दत्तक वंशज तहहयात गादीची सेवा करत राहिले. नानासाहेब पेशवे ब्रम्हावर्तला पेन्शन खात बसून राहू शकले असते. पण ते दत्तक पुत्र असूनही शस्त्र हातात घेऊन तात्या टोपेंच्या सह शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांची कन्या मैनावतीशी ब्रिटिश किती क्रौर्याने आणि किती कृतघ्नपणाने वागले हे वाचले तर आपल्याला संताप अनावर होतो. 

पण ब्रिटीशांनी पेरलेल्या ब्राह्मण द्वेषाला बळी पडलेल्या महाराष्ट्रातील आंधळ्या नागरिकांना हे कधीच समजणार नाही...... 

सामाजिक पातळीवर दुभंगलेला , जातीद्वेषाने बरबटलेला हा महाराष्ट्र बघून स्वर्गात शिवाजी महाराजांना काय यातना होत असतील याची कल्पना जरी केली तर डोळे पाणावतात. 

आपल्यासारख्या कपाळकरंट्यांना चार सुखाचे क्षण मिळावे म्हणून या लक्षावधी मावळ्यांनी आणि महाराजांनी आयुष्याचा होम केला.... 

आणि आपण काय करतो आहोत ????

ज्यांच्याशी महाराज आयुष्यभर लढले त्या मुसलमानांचे गुणगान करत महाराजांच्या कार्याला मातीमोल करतो आहोत..............

आपल्या महाराजांचा इतिहास चुकीच्या सांगणार्‍या , त्यांचा अवमान करणार्‍या लोकांना थोर बनवून डोक्यावर घेऊन नाचतो आहोत.... 

आपल्यासारखे दलिंदर फक्त आपणच असू शकतो.....

आता मुद्दा क्रमांक दोन - टिपू सुलतान आणि breast tax 

टिपू सुलतान ने काय केले ?? breast tax हे प्रकरण काय आहे?? ब्रिटिशांना चांगले म्हणणाऱ्या प्रत्येक समाजसुधारक व्यक्तीचा मी द्वेष का करतो ???
एका देशमुख कुलोत्पन्न कन्येने अक्कल पाजळली आहे. त्याचे स्क्रीन शॉट फिरत आहेत. मी ते परत टाकणार नाही. पण तिने मांडलेले तीन मुद्दे आहेत ते खोडण्यासाठी हा लेख आहे. 

१ टिपू सुलतान स्वातंत्र्य सेनानी होता 
२ टिपू सुलतान झाशीच्या राणी लक्ष्मी बाई सह इंग्रजांच्या विरोधात लढला. 
३ टिपू सुलतान ने स्त्रियांची breast tax मधून सुटका केली.  
आपल्या मुलांना किती संभ्रमित केले जाते आहे याचे हे उदाहरण आहे. पण जोडीला सत्य ज्ञात असणे आवश्यक आहे. 

पहिले टिपू सुलतान... 

याचा बाप हैदर अली हा म्हैसूर च्या वाडियार राजाचा सेनापती होता.. बापाने आणि याने मैसूर राजाला आधी मांडलिक बनवले मग सत्ता गिळली. 

पराकोटीचा धर्मांध.. 

त्याला दक्षिण भारतात इस्लामी साम्राज्य उभे करायचे होते. त्या साठी त्याने अरबस्तानात संपर्क साधला होता. त्यासाठी त्याला बंदराची आवश्यकता होती म्हणून त्याने मलबार वर हल्ला चढवला. १०,००० ब्राम्हण कापून काढले.. त्या पेक्षा दुप्पट स्त्रियांवर बलात्कार केले. त्याचे मलबार मधील अत्याचार मलबार डायरीज म्हणून कुप्रसिद्ध आहेत. 

त्याची धर्मांधता बघून निजाम , इंग्रज आणि मराठे एकत्र आले आणि त्याचा विनाश केला. 

तो स्वातंत्र्यवीर होता.. ??

बिलकुल नाही कारण तो फक्त ब्रिटिशांशी लढला नाही.. निजाम , मराठे आणि ब्रिटीश अश्या संयुक्त फौजेशी लढला आहे. आणि अन्य दोघांनी ब्रिटिशांना बरोबर घेतले.. मुख्य काटा मराठ्यांनी काढला आहे.  

पराकोटीचा धर्मांध, क्रूर , लुटारू होता.. त्याला संपवणे आवश्यक होते. 
त्याचा आणि राणी लक्ष्मीबाईचा संबंध जोडणाऱ्या कन्येला सरळ वेड्यांच्या इस्पितळात भरती केले पाहिजे. इतिहासाचा इतका मोठा अपलाप होऊ शकत नाही. 

आता बहुचर्चित #Breast_tax 

याला समजण्यापूर्वी तुम्हाला दक्षिण भारतातील खास करून तामिळनाडू आणि केरळ मधील सामाजिक परंपरा ज्ञात असणे आवश्यक आहे. 

या भूभागात स्त्रिया कमरेवर वस्त्र घालत नाहीत. स्तन झाकणे हे असंस्कृत मानले जाते. कुलीन स्त्रिया घरात कमरेवर अनावस्त्र असत. काम करणाऱ्या स्त्रिया घराबाहेर जाताना साडीच अशी ओढत की स्तन झाकले जात. पण चोळी ही संकल्पना तिथे रूढ नव्हती. 

मी १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मद्रास प्रेसिडेन्सी मधील एक गोष्ट सांगतो. मी एका रशियन दंपतीचे प्रवास वर्णन वाचले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी मद्रास प्रेसिडेन्सी स्थापन केली होती आणि स्त्रिया अनावृत्त फिरताना पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी स्त्रियांनी चोळी घातलीच पाहिजे. स्तन झाकलेच पाहिजेत असा कायदा केला. 

या कायद्याविरुद्ध तिथल्या नाडर समाजाच्या स्त्रियांनी बंड पुकारले... आम्ही कुलीन आहोत आम्हाला स्तन झाकायला सांगणे हा आमचा अपमान आहे... 
या सगळ्या घटनाक्रमाचे वर्णन त्या प्रवास वर्णनात मी वाचले होते. 

पुढे चोळी वर तडजोड झाली. केरळात तर साडी नेसताना लुंगी प्रमाणे नेसून तिनेच स्तन झाकले जातात. 

१८ व्या शतकाच्या सुरुवातीला केरळात ब्रिटिशांनी पाय पूर्ण रोवले होते आणि त्यांना जी वसुली करायची होती त्या साठी त्रावणकोरच्या राजाने पुरुषांना वेगळा आणि स्त्रियांना वेगळा कर लावला. हा कर मालकांनी आपल्या कामगारांच्या कडून कापून घेऊन सरकार जमा करायचा असे. 

आता यात वाद कुठे निर्माण झाला ?? ब्रिटीशांची हरामखोरी.. त्यांनी धर्मांतरित ख्रिस्ती स्त्री पुरुषांना या करातून सूट दिली... धर्मांतरित स्त्रियांना अनावस्त्र रहाण्याची सुद्धा मुभा दिली गेली. अन्य स्त्रियांनी मात्र अनावस्त्र राहायचे असेल तर कर भरला पाहिजे असा फतवा काढला.. 

अर्थ उघड होता.. त्यांना घाऊक धर्मांतर घडवायचे होते... 

नंगेली नावाच्या एका तरुण स्त्रीवर जमीनदारांनी करासाठी जबरदस्ती केली. तिने संतप्त होऊन आपले स्तन कापले आणि बलिदान दिले.. 

मग लोकक्षोभामुळे हा कर रद्द झाला.. 

ब्रिटीश , त्यांचे पित्ते यांनी संपूर्ण कथा twist केली... त्रावणकोर चा राजा स्तनांवर कर घेत होता... हा पहिला narrative set केला. आणि याला विरोध म्हणून नंगेली ने बलिदान दिले हा पण narrative set केला.

भारतीय लोकांच्या इतके जगात महामूर्ख लोक दुसरे नसल्याने आपल्याला हे सगळे खरे वाटले.. 

कम्युनिस्ट आणि इतर सर्व भिकारचोट मंडळी स्त्रियांवरील भारतीय अन्याय आणि त्याला आव्हान देणारी नंगेली म्हणून ही ष्टोरी रंगवून रंगवून सांगतात.. 
आपल्या निर्बुद्ध जनतेला यावर विश्वास बसतो. 

हिंदूंचा निर्बुद्ध पणा, स्वधर्म आणि संस्कृती प्रती असणारी अनास्था आणि सेक्युलरपणा हा हिमालयाच्या पेक्षा उंच आणि सागरापेक्षा खोल आहे तो असा... 
स्त्रीचे स्तन अनावृत्त असणे हे दक्षिण भारतात कुठेही गैर मानत नाहीत.. तिथल्या देवींचे मूळ विग्रह सुद्धा तसेच आहेत.. 
आपल्याकडे देवीचे ध्यानाचे जे श्लोक आहेत ते वाचा.. पुष्ट , पयोधर आणि उन्नत स्तन हे स्त्री सौंदर्याचे प्रतिक आहेत. कारण ते पुरुषाला आकर्षित करतात आणि आपल्या पत्नीशी एकनिष्ठ रहाण्यासाठी प्रेरित करतात असे मानले जाते. त्याच प्रमाणे पुष्ट स्तन हे एक उत्तम माता असण्याचे लक्षण आहे असे सुद्धा मानले जाते.. 
खाली महालक्ष्मीचा ध्यानाचा श्लोक देतो आहे तो वाचा.. 

या सा पद्मासनस्था विपुलकटीतटी पद्मपत्रायताक्षी 
गंभीरवर्ता नाभीस्तनाग्रा नमिता शुभ्रवस्त्रोत्तरिया
लक्ष्मी दिव्यायै गजेंद्रायै मणीगणखचीतार्ये
स्नापित हेमकुंभार्ये ह्रीं सा पद्महस्ता
मम वसतुगृहे सर्व मांगल्ययुक्ता

जिची स्तनाग्रे तिच्या नाभीच्या दिशेने नमित आहेत.. आणि ज्यांच्यावर श्वेत वस्त्रांचे अवगुंठण आहे... या संपूर्ण ध्यानाच्या श्लोकाचे विवेचन नंतर कधी करेन.. 
त्याच प्रमाणे श्री ललिता सहस्त्रनामात देवीच्या वर्णनात एक भाग असा आहे की 
" कामेश्वर प्रेमरत्न मणी प्रतिपण स्तनी " 

कामेश्वराचे अर्थात शिवाचे प्रेम रुपी मणी प्राप्त व्हावा म्हणून तिने त्याच्याशी प्रतिपण केला.. आपले स्तन त्याला अर्पण केले आणि त्याचे प्रेम रत्न प्राप्त केले.. 
'स्तन आणि पुरुषाचे मन' या विषयावर खूप लिहिण्याबोलण्यासारखे आहे. पण आज आपला समाज तितका परिपक्व उरला नाही आणि पूर्वग्रहांचे ओझे आपल्याला असे काही उन्मुक्त पचवू सुद्धा देणार नाही.. 

काही काही गोष्टींच्या संदर्भातील ब्रिटिशांनी केलेला बुद्धिभेद हा खूप आक्रमक होऊन उध्वस्त केला पाहिजे.... 

त्यापैकी हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
- लेखक - श्री भोगले सुजितचंद्र यांच्या पोस्टवरून साभार.

19 मे

  .