रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

आजचा सुविचार 17 Oct 2021

चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. 

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

मेघनाथ साहा

Meghnad Saha - Wikipedia
 
जन्मदिन - ६ ऑक्टोबर १८९३

मेघनाद साहा हे भारतीय भौतिकीविज्ञ. तार्‍यांचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करुन सिद्धांत मांडणारे भारतीय वैज्ञानिक. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ होते.
साहा यांचा जन्म डाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगला देश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन १९१५ मध्ये एम्.एस्‌सी. आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून डी.एस्‌सी. पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक (१९२१-२३), पलित प्राध्यापक (१९३८-५२) आणि गुणश्री प्राध्यापक (१९५२-५६); तसेच अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (१९२३-३८) होते.
मेघनाद साहासाहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला (६०००° से. किंवा अधिक) ताऱ्याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्‌भारित अणू) म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते. साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले.
कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळे सुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही.
साहा समीकरणामुळे दिलेल्या दाबाला व तापमानाला तारकेय वातावरणातील आयनीभवनाच्या परिमाणाची आकडेमोड तसेच अणूपासून उत्तरोत्तर इलेक्ट्रॉन वेगळा काढण्याकरिता लागणाऱ्या ऊर्जेची आकडेमोड शक्य झाली. अशा प्रकारे साहा समीकरण तारा आणि अणू यांच्या मूलभूत संबंधाविषयीची पहिली सूत्ररूप मांडणी आहे. 
साहा यांनी १९२० मध्ये ‘सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन’ या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रसिद्घ केला. रेडिओ तरंगांचे प्रेषण, ज्योतींचे संवहन, प्रज्योत आणि स्फोटक विक्रियांची रचना यांमधील समस्या सोडविण्याकरिता साहा यांचा आयनीभवन सिद्घांत उपयुक्त ठरला आहे.
साहा यांनी कोलकाता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. ते या संस्थेचे सन्माननीय संचालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते (१९२७). भारतीय विज्ञान परिषद संस्थेच्या एकविसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९३४). १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून आले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी आपले लक्ष विज्ञानाच्या सामाजिक कार्याकडे वळविले.
साहा यांनी लिहिलेले ग्रंथ : ए ट्रीटाइज ऑन द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी; ऑन ए फिजिकल थिअरी ऑफ द सोलर करोना; ए ट्रीटाइज ऑन हीट; ए ट्रीटाइज ऑन मॉडर्न फिजिक्स आणि माय एक्सपिरिअन्सेस इन रशिया. १९३५ मध्ये त्यांनी इतिहास, संस्कृती व विज्ञान यांना वाहिलेले सायन्स अँड कल्चर  हे नियतकालिक सुरू केले.

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

डॉक्टरकडे जाताय --- एकदा वाचा- डॉ निलेश वंजारी

डाॅक्टरकडे जाताय.......
*ADR  म्हणजे अडवर्स ड्रग रिअक्शन - संपूर्ण  जगामध्ये  मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे.* आपण जी अलोपॅथिक औषधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते.  

सर्वच प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत, मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत,नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य खराब आहे असे UNO 2007 च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी 11लाख लोकांना मधुमेह (Diabetis) होतो.

आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगात खळबळ उडूवून दिली आहे त्या पुस्तकाचे नाव आहे *"ओव्हर डोस अमेरिका"* या पुस्तकाचे लेखक डॉ.जॉन अब्राहमसन या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की,अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य अलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे. लेखक हे सुप्रसिद्ध हॉर्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन चे मानद सदस्य आहेत.

अँटिडिप्रेसंट औषधी, Antiboitics,कोलेस्टेरॉल च्या औषधी यामध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा भयंकर उलट फेर करून सर्व जगाला भ्रमीत केले जात आहे.

आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे *"DEATH BY PRESCRIPTION"* या पुस्तकाचे लेखक सुविख्यात अमेरिकन डॉक्टर *Dr Ray Strand* आहेत.  

आज *संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्टअटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या अलोपॅथिक औषधी आहेत* हे Dr Ray Strand यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे....

*जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत.* इतर कोणत्याही कारणांपेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी  मरणाऱ्यांची संख्या पाचपट जास्त आहे.- Dr.B.M.Hegde (पद्मभूषण) MD, FRCP (London)

लोकांना असे वाटते की, ऑलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारा दरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया धोकादायक व अनिश्चित असतात - डॉ. अतुल गावंडे (HOD, सर्जरी डिपार्टमेंट - बोस्टन युनिव्हर्सिटी)

हेल्थ चेकअपच्या नावाने एक जबरदस्त व्यापार व भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी ऑलोपॅथिक चिकित्सा / औषधी / रक्त - लघवी तपासण्या व हायटेक सर्जरी व टेक्नॉलॉजि आहे तर हे साफ चुकीचे आहे Famous डॉ. B M हेगडे येथे नमूद करतात,की देवाची कृपा आहे की,हे *ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञान फक्त 100-150 वर्ष जुने आहे* & त्यामुळे मानव जात अजून पृथ्वीवर जीवंत आहे.

मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठीक करण्याची अंगभूत क्षमता यांवर अलोपॅथिक डॉक्टरांचा विश्वास नाही. चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नॉलॉजि चा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा  कमविण्याचे साधन बनले आहेत. बायपास, कॅन्सर, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझेरिअन,गर्भाशय काढण्याचे, कृत्रिम गुडघेरोपनाचे ऑपरेशन हे गरज नसतांना सर्रास केले जाणारे व त्याद्वारे प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे.

अलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (Dignosis) च्या बाबतीत अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो.

अनावश्यक रक्त - लघवी तपासणी, X-Ray, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, MRI, एन्डोस्कोपी, अँजिओग्राफी ई.अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. *यापैकी 90% तपासण्यांची रुग्णांना गरज नसते. डॉक्टर स्वतः आपल्या अनुभव व  कौशल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात.* जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. या तपासण्यांमागे 50% पर्यंत कमिशन मिळते हे अमीर खानने सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे. यात काही अपवाद नसतील असे नाही.

अनावश्यक व्हॅक्सिनेशनचा धंदाही फार जोमात आहे.अनेक लसी अनावश्यक असून या  लसींची विश्वासाहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे. औषधी कंपन्या लसीकरणाच्या नावाने अब्जावधी रुपयांचा नफा कमवितात. *मेडिकल सायन्सच्या इतिहासात लाखो लोकांचा बळी या अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे.*

औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. रुग्णांना जास्तीत जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.अनावश्यक औषधांच्या दुष्परीणामामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन रुग्णांचा जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. रुग्ण मात्र याबद्दल अनभिज्ञच राहतात.

Unreasonable  Profit Making हा फंडा मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलनी अवलंबलेला असून,अनावश्यक ऑपरेशनची मालिकाच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे अनेक ऑपरेशनचा दुरुपयोग सर्रास होतांना दिसून येतो. खुप कमाई असल्यामुळे अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलची साखळीच निर्माण होत आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत.

 *रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले जाते (तो तसा नसतांना). त्याला विचार करायला वेळही मिळू न देता महागडी ऑपरेशन e.g. Bypass, Angioplasty करायला भाग पाडले जाते.*

असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला, तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की, सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक उपचार  अथवा  ऑपरेशनमुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे.

व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्रष्ट वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे.

*स्वतः चे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी  सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.*

डॉ निलेश वंजारी, MBBS - Boston University

19 मे

  .