भारतीय संस्कृती 'सत्यम्, शिवम्, सुंदरम्' चा शोध घेणारी आहे.
रविवार, ९ जून, २०१३
शनिवार, ८ जून, २०१३
शुक्रवार, ७ जून, २०१३
गुरुवार, ६ जून, २०१३
How To Make Colored Soap Bubbles
Here's How:
- If you are making your own bubble solution, mix the detergent and water.
- Add the sodium hydroxide and indicator to the bubble solution. You want enough indicator so that the bubbles will be deeply colored. For each liter of bubble solution (4 cups) this is about 1-1/2 to 2 teaspoons of phenolphthalein (red) or thymolphthalein (blue).
- Add sodium hydroxide until you get the indicator to change from colorless to colored (about half a teaspoon should do the trick). A little more sodium hydroxide will result in a bubble that stays colored longer. If you add too much, the color of the bubble won't disappear when exposed to air or rubbed, though you can still react it with club soda.
- You may find it necessary to dissolve the indicator in a small amount of alcohol before mixing it with the bubble solution. You can use pre-made indicator solution, adding the sodium hydroxide to the indicator rather than diluting with water.
- You've essentially made disappearing ink bubbles. When the bubble lands, you can make the color vanish by either rubbing the spot (reacting the liquid with air) or by adding a little club soda. Fun!
- If you have disappearing ink, you could mix it with bubble solution to make disappearing ink bubbles.
Tips:
- Please don't drink the bubble solution! Unused bubble solution may be stored for later in a sealed container or disposed of by pouring it down the drain.
- These are bubbles intended for 'blowing bubbles', not for bathing.
- Sodium hydroxide is a strong base. Avoid direct contact with this ingredient. If you do get some on your hands, rinse them immediately with water.
- Phenolphthalein and thymolphthalein change from red or blue to uncolored around pH=10. If you look on the indicator chart, you can see there are several less common indicators that would change color rather than disappear at this pH.
What You Need
- Liquid Dishwashing Detergent (or other detergent)
- Water
- or Commercial Bubble Solution
- Sodium Hydroxide
- Phenolphthalein
- Thymolphthalein
- Club Soda (optional)
बुधवार, ५ जून, २०१३
बुक शेल्फ : उत्तम अभ्यासासाठी
मे महिना संपत आला की वेध लागतात ते शाळेचे, अभ्यासाचे.. नवी पुस्तके, वह्या, अभ्यासक्रम, शिक्षक.. पण तरीही अभ्यास करायचा म्हटला की एक प्रकारचं जडत्व येतं.. खेळणं म्हटलं की जशी सुरसुरी येते तशी अभ्यास करायचा आहे असे म्हटले की नक्कीच होत नाही, कारण बहुधा अभ्यास ही आपल्यासाठी 'एंजॉय' करण्याची बाब नसतेच मुळी.. पण हाच अभ्यास मनोरंजक, सोपा आणि उत्साहवर्धक पद्धतीने करता येऊ शकेल का? अमोल कडू यांनी इयत्ता दहावीपासून ते अगदी आयएएससारख्या आव्हानात्मक परीक्षेचा अभ्यास मनोरंजक आणि रम्य कसा करता येईल याचा वेध घेणारे पुस्तक लिहिले आहे- 'अभ्यास करावा नेटका'!
अभ्यासासाठी एकाच जागेवर बसावे का? गाणी-संगीत ऐकत अभ्यास होतो का? सलग किती वेळ अभ्यास करता येऊ शकतो? अभ्यासाचं नियोजन कसं करावं? टाचणं कशी काढावीत? मित्रांसह अभ्यास करता येतो का? अशा आपल्याला आवडणाऱ्या (आणि अर्थातच आपल्या पालकांच्या शंकांचं समाधान करणाऱ्या) अनेक प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोप्या शब्दांत आणि मार्मिक अर्कचित्रांसह या पुस्तकात देण्यात आली आहेत. आपल्या अभ्यासाच्या सवयी या आपण उत्तम निरीक्षण करू शकतो की श्रवण करू शकतो की उत्तम लेखन करू शकतो यावर अवलंबून असतात. अमोल कडू यांनी ही विभागणी स्पष्ट करून पुढे कोणत्या प्रकारासाठी कोणती अभ्यासपद्धती लाभदायक ठरू शकेल याचे विश्लेषण केले आहे. त्यासाठी त्यांनी चक्क १८ प्रश्नांची एक प्रश्नावली दिली आहे.
एकदा पद्धती ठरली की पुढचा टप्पा नियोजनाचा. लेखकाने नियोजनपूर्व, लघु मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे नियोजन असे नियोजनाचे तीन भाग पाडले आहेत आणि त्यादृष्टीने मार्गदर्शन केले आहे. नियोजन साधलं तरी खरं गमक आहे ते त्याच्या काटेकोर अंमलबजावणीत आणि अभ्यासाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा घटक म्हणजे एकाग्रता. या पुस्तकातील सर्वात उत्तम भाग कोणता असा प्रश्न विचारला तर नि:संशयपणे भाग तिसरा असे उत्तर द्यावे लागेल. एकाग्रतेवरील भाष्य हे लहानात लहान मुलापासून मोठय़ात मोठय़ा माणसापर्यंत कोणालाही कळू शकेल आणि 'वळूही' शकेल इतक्या सोप्या शब्दांत मांडले आहे. तीच बाब अभ्यासासाठी आदर्श वातावरण कोणते, या प्रकरणाचीही. यातही अभ्यास करतेवेळी संगीत ऐकता येते का आणि मला कोणते संगीत आवडते यापेक्षाही अभ्यास करताना संगीत का ऐकायचे, या प्रश्नाचा कडू यांनी उत्तम ऊहापोह केला आहे. किंबहुना या प्रश्नाच्या उत्तरात संगीताचा वेगळाच आयाम पुढे येतो.
सामान्यपणे शालेय स्तरावर आपल्याला टाचणे काढण्याची सवय नसते, पण उत्तरोत्तर जसा आवाका वाढत जातो तशी टाचणे आवश्यक ठरतात. पण ही टाचणे काढायची कशी? त्यासाठी शास्त्रीय पद्धती आहेत का? असल्यास कोणत्या आणि त्यांचा वापर कसा करता येतो? या प्रश्नांची उत्तरे सहाव्या प्रकरणात मिळतात. अभ्यासाची उजळणी आणि अभ्यास लक्षात ठेवण्याच्या प्रभावी पद्धती यांचा समावेश या पुस्तकाची उपयुक्तता वाढवतो.
सध्या स्पर्धा परीक्षांचा जोर आहे. अगदी इयत्ता बारावीपासून ते थेट प्रशासकीय सेवांपर्यंत- अगदी पीएच.डी. प्रवेशापर्यंत स्पर्धा परीक्षा देतच पुढे सरकावे लागते. या परीक्षांचे अविभाज्य अंग म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आणि नकारात्मक गुणपद्धती. याबाबतही अमोल कडू यांनी या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. स्पर्धापरीक्षांमधील नेमके आव्हान कोणते आणि या परीक्षा देणे का आवश्यक आहे, याचा सकारात्मक दृष्टिकोन कडू यांनी पुस्तकात छान दिला आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा मग ती विद्यापीठीय असो किंवा स्पर्धा परीक्षेच्या पुढील टप्प्यांवरील असो, दीघरेत्तरी प्रश्न सोडविण्याचेही एक विशष कौशल्य आहे आणि निबंध लेखनाचेही. विशेषत: आजच्या प्रचंड गतीच्या युगात निबंधलेखन आणि स्वत:चे पृथक्करण व्यक्त करणारी दीघरेत्तरे लिहिण्याचा अनेकांना आळस असतो. मात्र ही प्रक्रिया रंजक करता येऊ शकते हे कडू यांचे पुस्तक वाचताना 'जाणवते'!
पुस्तक - 'अभ्यास करावा नेटका'
लेखक - अमोल कडू
प्रकाशन - नवता बुक वर्ल्ड
पृष्ठे - २००
मूल्य - १८०/-
ग्रीन मॅन
एक दिवस राजू नदीवरून रमतगमत शाळेतून घरी येत होता. त्याला नदीत एक सोनेरी मासा दिसला. त्याने तो पकडला आणि धावतपळत घरी आणला. राजूने मासा एका पाण्याच्या भांडय़ात ठेवला. आई म्हणाली, 'सोनेरी मासा आहे म्हणून त्याचे नाव 'सोनू' ठेवू.' राजू आता सारखा सोनूजवळच बसायचा. शाळेत जाताना त्याला रोज चुरमुरे, फुटाणे, कणकेचे छोटे गोळे द्यायचा. आईच्या हातचे कणकेचे गोळे सोनूलाही खूप आवडत.
राजू शाळेतून घरी आला की सोनू जोरजोरात कल्ले हलवायचा, सोनूला खूप आनंद व्हायचा. बघता बघता पंधरा दिवस लोटले. सोनू मोठा झाला. त्याला ते भांडे पुरेनासे झाले. मग आईने मोठे भांडे आणले. सोनूचा रंग अजूनच चमकू लागला. त्याचे कल्ले थोडे मोठे झाले, खवले मोठे दिसू लागले. दुसरे भांडेही त्याला लहान पडू लागले. आईने तिसरे मोठे भांडे दिले. बघता बघता महिना लोटला. सोनू मोठा होत होता. आई म्हणाली, 'राजू, आता याला नदीत सोडायला हवं.' काकुळतीला येत राजू म्हणाला, 'आई काहीतरी कर ना! मी नाही सोनूला सोडणार'. सोनू जोरात कल्ले हलवू लागला. 'बघ आई, त्यालाही नाही जायचंय!' राजू म्हणाला.
राजू दिवसभर विचार करत होता. तो आज जेवलादेखील नव्हता. सोनूचं काय करावं त्याला प्रश्न पडला होता. आई म्हणाली, 'राजू, तू त्याला रोज नदीवर भेटायला जात जा. त्याला रोज चणे, चुरमुरे, कणकेचे गोळे देत जा.' राजू जड अंत:करणाने सोनूला सोडायला गेला. राजूने सोनूला नदीत सोडले. तो रडतरडत सोनूला म्हणाला, 'सोनू, नीट राहा, स्वत:ची काळजी घे, कुणाच्या जाळ्यात पकडला जाणार नाहीस याची दक्षता घे. जातो मी, तुला रोज भेटायला येईन.'
बघता बघता सहा महिने लोटले. राजू रोज सोनूला भेटायला जायचा. त्याला चणे, चुरमुरे, कणकेचे गोळे द्यायचा. एक दिवस राजू सोनूला भेटायला गेला तर सोनू रडायला लागला. राजूने विचारलं, 'काय झालं?' सोनू म्हणाला, 'आज मी मरता मरता वाचलो. शहरातून मुलांची ट्रिप आली होती. त्यांनी प्लॅस्टिकचे ग्लास, पिशव्या नदीत फेकल्या. त्यातली एक पिशवी माझ्या घशात अडकली. माझा जीव गुदमरला, पण इतक्यात एक चमत्कार झाला. एक ग्रीन मॅन आला. त्याने माझ्या घशात अडकलेली पिशवी काढली आणि मी वाचलो. राजू आश्चर्याने म्हणाला, 'ग्रीन मॅन? कोण आहे हा ग्रीन मॅन?' 'तो बघ तिकडे झाडाखाली उभा आहे.' राजूने मागे वळून पाहिलं. ग्रीन मॅन लांब पाय टाकत राजूकडे येत होता. राजू म्हणाला, 'ग्रीन मॅन, आज तू माझ्या सोनूला वाचवलंस. तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत.' तो म्हणाले, 'उपकार कसले, ते माझं कर्तव्यच आहे.' राजू म्हणाला, 'मला स्पायडर मॅन, सुपरमॅन माहीत आहेत, पण ग्रीन मॅन माहीत नव्हता.' त्यावर ग्रीन मॅन म्हणाला, 'ऐक माझी कथा. मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. आमची थोडीशी शेती आहे. मी रोजच शेतावर जातो. आमच्या शेतावर एक बाभळीचं झाड आहे. एक दिवस माझ्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मला वाटलं काय करायचंय हे काटेरी, खुरटे झुडूप, म्हणून कुऱ्हाड उचलली आणि झाडावर मारणार इतक्यात आकाशवाणी झाली. 'थांब! हे झाड तुला खुरटं आणि काटेरी वाटतंय ना, पण ते फार गुणी आहे. त्याच्यात लवणशीलता असल्यामुळे नापीक जमिनीवरसुद्धा उगवतं आणि नापीक जमीन शेतीलायक सुपीक बनवतं.' मी हातातली कुऱ्हाड टाकून दिली. पुन्हा आवाज आला, 'आजपासून तू ग्रीन मॅन आहेस. पर्यावरणाचा तोल ढासळला आहे. प्रदूषण खूप झालं आहे. तुला निसर्गाचं रक्षण करायचं आहे. हा तुझा हिरवा पोशाख. यावर नदी, जंगल, झाडे, ओढे, प्राणी यांची चित्रे आहेत. त्यांचे तुला रक्षण करायचे आहे. हा काटेरी मुकूट तू डोक्यावर घाल, तो तुझे रक्षण करेल. हा पोशाख घाल आणि चल कामाला लाग.' मी हिरवा पोशाख घातला. मुकूट नीट बसवला आणि इकडेच आलो. माशाच्या घशातली पिशवी काढली, त्याला वाचवलं.'
ग्रीन मॅन आपली कथा सांगत असताना नदीच्या मध्यातून एक स्त्री रडत रडत येऊ लागली. तिच्या अंगावर प्लॅस्टिकचे कागद चिकटले होते. तिच्या साडीची लक्तरे झाली होती. तिच्या तोंडावर काळे डाग पडले होते. राजूने आणि ग्रीन मॅनने विचारलं, 'तू कोण आहेस?' 'ओळखलं नाहीत ना मला. मी तुमची लोकमाता, जीवनदायी नदी आहे.' 'तुझे हे इतके ओंगळवाणे रूप कसे झाले?'
'ऐका माझी कहाणी.. प्लॅस्टिकचा अतिवापर, कारखान्यातील घातक रसायनेमिश्रितपाणी, शहरांतील, गावांतील गटारातले पाणी माझ्यात सोडले जाते. प्लास्टिक, निर्माल्य, सर्व घाण माझ्या प्रवाहात सोडतात. माझे पाणी दूषित होते. पाण्यात असलेले जलचर, मासे यांची प्रचंड हानी होते. त्यामुळे कित्येक माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. पावसाळ्यात मी अगदी फणफण करत वाहते, याचे कारण माहीत आहे का? माझ्या काठावरील माती, वाळू यांच्या प्रचंड उपशामुळे माझा काठ उद्ध्वस्त होत आहे. म्हणून मला पूर येतो. पूर ओसरला की रोगराई, साथीचे रोग होतात. माझी बाळं म्हणजे ओढे, तलाव यांना बुजवून मोठमोठय़ा गगनचुंबी इमारती बांधल्या जातायत. त्यामुळे पाणी झिरपण्याचं प्रमाण कमी झालंय. जंगलतोडीमुळे मातीची धूप होते. माझी खोली कमी होते आणि त्यामुळे मी पाणी वाहून नेणारा फक्त प्रवाह बनले आहे. माझ्या काठावरील पाणथळ कमी झाले आहे. कोटोन संपले आहे. पाणी आणि जमीन यांच्या सीमारेषेवरील दलदलीचा, गाळाने भरलेला उथळ पाण्याचा काठ राहिला आहे. येथेच मासे, जलचर अंडी घालतात. पण काठ उद्ध्वस्त झाल्यामुळे मासे, जलचर कमी झाले आहेत. अजून सांगण्यासारखं खूप आहे,' नदी म्हणाली.
नदीची ही कहाणी ऐकून गणपतीची मूर्ती नदीतून वर आली. राजूला आणि ग्रीन मॅनला आश्चर्य वाटलं. दोघांनी त्याला नमस्कार केला. ते म्हणाले, 'तू आमचा सुखकर्ता, दु:खहर्ता. तू आमचा तारक.' 'कसला झालो आहे तारक, मी तर मारक झालो आहे. प्लॅस्टर ऑफ परिसच्या मूर्ती बनवता, त्यांना कृत्रिम रंग लावता, अनंत चतुर्दशीला माझे विसर्जन करता. निर्माल्य, प्लास्टिकच्या वस्तू, सजावटीचा थर्माकोल सर्व नदीत फेकता. त्यामुळे अक्षरश: चोवीस तासाच्या आत मासे, जलचर मरतात. तेच दूषित पाणी तुम्ही पीता. मी कसला तारक मी तर मारक.'
हे सर्व ऐकून ग्रीन मॅन आणि राजू चिंतित झाले. ग्रीन मॅन म्हणाला, 'राजू काहीतरी केलं पाहिजे.' 'ग्रीन मॅन, तू एकटा अपुरा आहेस. या कामी सर्वाचे सहकार्य हवे. आपण लोकांच्यात जागृती करू या. प्लास्टिकचा वापर करायचा नाही. निर्माल्य नदीत टाकायचे नाही. 'एक गाव एक गणपती,' याचं महत्त्व सर्वाना पटवून देऊ. घातक रसायने नदीत सोडायला अटकाव करू.'
दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि घोषणा केली- 'चला कामाला लागू, झाडे वाचवू, नद्या वाचवू, जंगले वाचवू, पर्यावरण वाचवू, प्रदूषण कमी करू.'
मंगळवार, ४ जून, २०१३
Mansson
you can find this story on- http://www.loksatta.com/maharashtra-news/monsoon-upto-karwar-on-the-threshold-of-state-124216/ Read it on Loksatta mobile app
बारावीनंतरचे वैशिष्टय़पूर्ण तांत्रिक अभ्यासक्रम
बारावीत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, अॅनेस्थिशिया टेक्नॉलॉजी यासारख्या वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमांची तसेच एमएस्सी - बीएड् या एकात्मिक अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती-
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम अॅण्ड नॅचरल गॅस मंत्रालयाने राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेस इंडियन इन्स्टिटय़ूट-आयआयटी सारखाच सेन्टर ऑफ एक्सलन्सचा दर्जा केंद्र सरकारने दिला आहे. या संस्थेला स्वत:ची पदवी देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. या संस्थेला ओएनजीसी, आयओसील, ओआयएल, जीएआयएल, बीपीसीएल, एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रांतील वायू आणि नैसर्गिक गॅस कंपन्यांनी सहकार्य केले आहे.
संस्थेचे अभ्यासक्रम -
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन केमिकल इंजिनीअरिंग
या अभ्यासक्रमाला खEE-ADVANCED-2013 च्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान शाखेत ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ जुल २०१३. पोस्टाने अर्ज मिळण्याची शेवटची तारीख- १८ जुल २०१३. अर्जाची फी एक हजार रुपये. या रक्कमेचा डिमांड डठाफ्ट राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, रायबरेली या नावानं पाठवावा. पत्ता- राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, रातापूर चौक, २२९३१६, दूरध्वनी-०५३५-२७०४२५८ ईमेल admissions@ rgipt.ac.in वेबसाइट- www.rgipt.ac.in
इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी :
सिक्कीम- मनिपाल युनिव्हर्सिटिअंतर्गत येणाऱ्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे निवासी स्वरूपातील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत -
* बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग
* बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
* बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग
* बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी
* बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग
* बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन अॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड
इन्स्ट्रमेन्टेंशन इंजिनीअरिंग. या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी JEE- MA IN 2013 च्या गुणांचा आधार ज्या विद्यार्थ्यांना घ्यावयाचा नसेल त्यांना मनिपाल युनिव्हर्सिटि ऑनलाइन टेस्ट (MU-OET) किंवा सिक्कीम- मनिपाल इन्स्टिटय़ूट ऑफलाइन टेस्ट द्यावी लागेल. प्रवेशासाठी JEE- MA IN 2013 च्या गुणांचा आधार घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ जून २०१३पर्यंत अर्ज करता येतील. JEE- MA IN 2013 मध्ये मिळालेल्या गुणांद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेचा अर्ज स्वतंत्रपणे भरून JEE- MA IN 2013 मध्ये मिळालेले गुण आणि अखिल भारतीय रँकिंग संस्थेला कळवावे. हे कौन्सिलिंग ४ जुल २०१३ रोजी घेतले जाईल. पत्ता- सिक्कीम- मनिपाल इन्स्टिटय़ूट, माजितर, रँग्पो, सिक्कीम- ७३७१३६, दूरध्वनी- ०३५९२-२४६४६६, ई-मेल- admissions.smu@smu.edu.in वेबसाइट- www.smu.edu.in
बॅचलर ऑफ सायन्स इन अॅनेस्थेशिआ टेक्नॉलॉजी :
या संस्थेचे अभ्यासक्रम-
* बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग. प्रवेशजागा- ७७ अर्हताफिजिक्
स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी या विषयांसह
बारावीमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण, कालावधी- चार वर्षे
* बॅचलर ऑफ सायन्स इन रेडिओग्राफी.
प्रवेशजागा- १० अर्हता- फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयोलॉजी, मॅथेमॅटिक्स आणि इंग्रजी या विषयांसह बारावीमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण, कालावधी- तीन वर्षे
* बॅचलर ऑफ सायन्स इन अॅनेस्थेशिआ टेक्नॉलॉजी.
प्रवेशजागा- ६. अर्हता- फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी या विषयांसह बारावीमध्ये सरासरीने ४५ टक्के गुण, कालावधी- तीन वर्षे. संस्थेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरता येतो. पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अॅण्ड न्युरो सायन्स, पोस्ट बॉक्स क्रमांक-२९००, हौसर रोड, बंगलोर५६००२९, दूरध्वनी- ०८०-२६९९५०१३. वेबसाइट- www.nimhans.kar.nic.in ई-मेल- academic@nimhans.kar.nic.in
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी :
वेल टेक, चेन्नईचे अभ्यासक्रम -
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इंजिनीअरिंग फिजिक्स
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी
* बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन बायोइन्फम्रेटिक्स
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोनॉटिकल इंजिनीअरिंग
या संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरता येतो. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. साधारणत: २३ जून २०१३ पर्यंत प्रक्रिया सुरू राहील. पत्ता- वेल टेक रंगराजन डॉ. सागुंथला राव इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, चेन्नई-६०००६२, तामीळनाडू, दूरध्वनी- ०४४-२६८४०२४९ वेबसाइट- www.veltecuniv.edu.in ई-मेल- admission@veltecuniv.edu.in
एम.एस्सी.-बी.एड. :
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग,
नवी दिल्लीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या म्हैसूर स्थित रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन या संस्थेने मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन हा नवा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम १२ सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पुढील तीन विषयांमध्ये करता येतो-
* मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन इन फिजिक्स
* मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन इन केमिस्ट्री
* मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बॅचलर ऑफ एज्युकेशन इन मॅथमॅटिक्स.
महाविद्यालयीन प्राध्यापकांचे करिअर करण्यासाठी हे
अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात. अर्हता- बारावी विज्ञान खेत ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत देण्यात येते. या अभ्यसक्रमांना अखिल भारतीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या परीक्षेमध्ये सीबीएसई- सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातील.
अर्ज व माहितीपत्रकाची किंमत खुल्या संवर्गासाठी ५०० रुपये आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गासाठी ३०० रुपये. या रकमेचा डिमांड डठाफ्ट प्रिंन्सिपल आरआयई, म्हैसूर या नावे काढून पाठवावा लागेल.
अर्ज संस्थेच्या www.riemysore.ac.in या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतो. संस्थेला अर्ज मिळण्याची शेवटची तारीख- १ जुल २०१३. पत्ता- रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन म्हैसूर, दूरध्वनी-०८२१-२५१४५१५ ई-मेल- riemysore@rediffmail.com
सोमवार, ३ जून, २०१३
आजचा सुविचार
विद्यादान हे अन्नदानापेक्षा मोठे आहे. कारण अन्नाने क्षणिक तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभर आनंद मिळतो.
रविवार, २ जून, २०१३
आजची सुविचार
जाईचा मंडप आपल्या घरापुरता घातला तरी चालेल परंतु मायेचा मंडप शेजा-यांच्या घरापर्यंत घालावयास विसरु नका.
करदर्शन
कराग्रे वसते लक्ष्मीः करमूले सरस्वती ।
करमध्ये तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥
उपरोक्त श्लोक समजून म्हटला तर तो मानवाच्या जीवनात प्रेरणादायक ठरेल. लक्ष्मी, विद्या किंवा भगवान प्राप्त करणे ही मानवाच्या हातातील गोष्ट आहे, असा उत्साही अर्थ ह्या श्लोकात लपलेला आहे.
हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असे सांगितले आहे. माणसाचे जवळ जवळ सर्वच उद्योग बोटांच्या अग्रभागाने होतात म्हणून तेथे लक्ष्मीचा वास आहे असे सांगितले आहे.
हाताच्या मूळ भागात सरस्वती म्हणजे विद्या आहे. सरस्वती मूळात आहे ह्याचा अर्थ कोणत्याही कार्याच्या पायात ज्ञान असले पाहिजे. खऱ्या ज्ञानाशिवाय संपत्ती किंवा परमेश्वर काहीच मिळत नाही.
मानवाला वित्त किंवा विद्या ह्यांची नशा चढते. तो उन्मत्त बनतो. हाताच्या मध्यभागात गोविंद वसतो असे सांगून लक्ष्मी आणि सरस्वती मध्ये आपल्या शास्त्रकारांनी समन्वय साधला आहे. भगवंताच्या उपस्थितीमुळे माणसाला वित्तमद किंवा विद्यामद चढत नाही. रावणाच्या जीवनात भगवान नसल्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही असूनही त्याचे जीवन दैवी न बनता राक्षसी बनले. आपल्या हाताची सर्व बोटे असमान आहेत, पण त्यांना जर हाताच्या मध्यभागी आणले तर समान भासतात. त्याचप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर प्रभु बरोबर जोडण्यात आले तर त्या समानता निर्माण करतात.
शिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असे एकही कार्य न करता, रोज मी केवळ सत्कर्मच करीन असा विचार सकाळी केला पाहिजे.
शनिवार, १ जून, २०१३
-
टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप क...
-
शिक्षण मंत्रालय 'विकसित भारत बिल्डथॉन २०२५' मुळे नवनिर्मितीच्या पुनर्जागरणाला चालना मिळेल आणि तरुण नवप्रवर्तक आत्मनिर्भर भारताचे च...
-
शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल SOAR – AI for Educators - Versatile Scientist ...