रविवार, २८ डिसेंबर, २०२५

*इतिहासातील एक मनोरंजक घटना* स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळेच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.*आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,*तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

मित्र कसे असावेत - 220 आणि 284 या क्रमांकाप्रमाणे - रामानुजन

 


गणितज्ञ रामानुजन यांना जवळचे मित्र नव्हते. कोणीतरी त्यांना त्याचे कारण विचारले.

त्यांनी उत्तर दिले की.... 👇

"जरी मला जवळचे मित्र हवे असले तरी कोणीही माझ्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरू शकले नाही."

जेव्हा रामानुजन यांना तुमचा मित्र कसा असावा? याची विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की, "220 आणि 284 क्रमांकांप्रमाणे!"

समोरील व्यक्ती गोंधळून गेली आणि विचारले की, "मैत्री आणि या संख्यांचा काय संबंध आहे का?"

रामानुजन यांनी त्याला 220 आणि 284 या संख्यांचे विभाजक शोधण्यास सांगितले!

बर्‍याच प्रयत्नाने त्या व्यक्तीने संख्यांचे विभाजक शोधले आणि त्यांची यादी केली.

220 → 1, 2, 4, 5, 10, 11, 20, 22, 44, 55, 110, 220.

284 → 1, 2, 4, 71, 142, 284.

त्यानंतर रामानुजन यांनी त्या व्यक्तीला 220 आणि 284 हे विभाजक वगळण्यास सांगितले आणि उर्वरित विभाजकांची त्या व्यक्तिला बेरीज किती होते ते विचारले.

ती व्यक्ती बेरीज पाहून थक्क झाली.....

 220 → 1 + 2 + 4 + 5 + 10 + 11 + 20 + 22 + 44 + 55 + 110= 284

284 → 1 + 2 + 4 + 71 + 142= 220

रामानुजन यांनी समजावून सांगितले की, "एक आदर्श मैत्री या संख्यांसारखी असावी. एकमेकांना पूरक असावी.  एखादा गैरहजर असतानासुद्धा, दुसर्‍याने अनुपस्थित मित्राचे प्रतिनिधित्व केले पाहिजे!"

माझ्या सर्व 220 आणि 284 सारख्या मित्रांना....
'ग' णि 'त' विषयातील.....
'गं' म 'त' शीर शुभेच्छा....🌷

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

शिक्षकांना टीईटी अनिवार्यच


    टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. टीईटी सक्तीविरोधात फेरविचार याचिका सादर करता येईल का,  यासंदर्भात विधि व न्याय विभागाचा अभिप्रायही मागविला. मात्र हे प्रकरण फेरविचार याचिका सादर करण्यासाठी सुयोग्य नसल्याचे मत त्यांनी दिले आहे. - दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

नागपूर : पाच वर्षाहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत  शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी  ३१ ऑगस्ट २०२६ ची मुदत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे. या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही, असा अभिप्राय विधि व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी  विधानसभेत स्पष्ट केले.

विधान परिषदेत शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ करीत सभात्याग केला. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासंदर्भात समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. टीईटी संदर्भात काँग्रेसचे नितीन राऊत, अमीन पटेल, अस्लम शेख आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात भुसे यांनी शासनाची भूमिका मांडली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता अन्य शाळांमधील शिक्षकांना दोन  वर्षांच्या कालावधीत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. पाच वर्षाहून कमी सेवाकाळ शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे, असे भुसे यांनी नमूद केले.

शिक्षकांचा 'टीईटी'स विरोध असून शिक्षक संघटनांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलनेही झाली.

विधान परिषदेत सभात्याग - टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे, यासंदर्भात किरण सरनाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करता येणार नाही, असा अभिप्राय विधि व न्याय विभागाने दिला असल्याचे  राज्यमंत्री भोयर यांनी सांगितल्यावर सरकारने महाधिवक्त्यांचे कायदेशीर मत मागवावे, अशी सूचना विक्रम काळे यांनी केली. तर, शिक्षक संघटनांनी फेरविचार याचिका सादर केली असून त्यावर निर्णय होईपर्यंत टीईटी सक्तीची अंमलबजावणी होऊ नये, अशी मागणी अभिजीत वंजारी यांनी केली. टीईटीच्या मुद्द्यावर ठोस उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.


गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

SOAR – AI for Educators

 

 शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल

 

SOAR – AI for Educators - Versatile Scientist

SOAR – AI for Educators

SOAR – AI for Educators

A Government of India program under the SOAR initiative, designed to empower educators with future-ready skills in artificial intelligence, generative AI, data science, and cybersecurity.


About the Program

AI for Educators is a comprehensive training program crafted to help teachers understand, adopt, and leverage Artificial Intelligence tools responsibly in the classroom. The course covers foundational and advanced AI concepts, hands-on model deployment, digital literacy, and cybersecurity. It aims to equip educators to integrate AI meaningfully into teaching practices while ensuring ethical and safe use of technology in education.


Program Details

  • Title: SOAR – AI for Educators
  • Training Partner: SOAR
  • Learning Product Type: Skill Course
  • Program By: Government of India
  • Initiative of: SOAR
  • Program: SOAR
  • Domain: Future Skills
  • Occupations: Artificial Intelligence & Big Data Analytics
  • Required Age: Any
  • Minimum Education: Graduate
  • Industry Experience: None required
  • Language: English
  • Certification: Certificate of Completion
  • Assessment Mode: Self-paced assessment
  • QP Code: SSC/N8153
  • NSQF Level: 6
  • Credits: 1.5
  • Capstone Project: No

Course Curriculum

1. AI Toolkit and Guidance for Schools

  • 1.1 Introduction to AI
  • 1.2 Introduction to Generative AI
  • 1.3 AI Toolbox for Trainers
  • 1.4 Responsible Use of AI in Education

2. AI Basics

3. AI in Various Sectors

  • 3.1 AI in Finance
  • 3.2 AI for Business
  • 3.3 AI and Robotics
  • 3.4 AI Research

4. AI Models

  • 4.1 AI Tools and Frameworks
  • 4.2 AI Model Deployment
  • 4.3 Algorithms and AI – Practical Exploration
  • 4.4 Data Analysis & Flowchart Conversion
  • 4.5 Python Fundamentals – Beginner’s Guide
  • 4.6 AI Tools for Flat-File Analysis & Academic Research

5. Generative AI – Safe & Responsible Use for Educators

6. Data Science & Machine Learning for Teachers

7. Cybersecurity Foundations

  • 7.1 Cybersecurity threats, attacks & mitigations
  • 7.2 Cryptography concepts
  • 7.3 Authentication & authorization
  • 7.4 Network-based threats
  • 7.5 Device-level threats
  • 7.6 Application security

8. Cybersecurity Advanced

  • 8.1 Cybersecurity Concepts & Challenges
  • 8.2 Risk Management & Compliance
  • 8.3 Security Architecture & Defense Mechanisms
  • 8.4 Cryptography & Data Protection
  • 8.5 Ethical Hacking & Penetration Testing
  • 8.6 Security Operations & Incident Response

Why Educators Should Take This Course

This program empowers teachers to stay ahead in an AI-driven future. With practical tools, responsible AI guidance, hands-on model deployment insight, and essential cybersecurity awareness, educators can integrate technology confidently into classrooms, design AI-supported lesson plans, and promote safe digital learning environments.


Official Course Link

🔗 SOAR – AI for Educators (Skill India Digital Hub)


Disclaimer

This article summarizes the course based on information available on the Skill India Digital Hub. Course content, structure, assessment method, certification, and eligibility may change. Always verify details from the official Skill India course page before enrolling.

Leave a Comment

19 मे

  .