मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

*♻ स्वार्थ/मोह* ♻ =============

बोधकथा#
*♻ स्वार्थ/मोह* ♻
=========================
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या
पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.
कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.
पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता
तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.
पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,
"भाऊ !! .......तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."
कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?"
पुजारीबाबा हो म्हणाले.
त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे.
महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.
पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम
पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''
*तात्पर्यः*
*स्वार्थ,मोह हा वाईट असतो*, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू
लागतो.त्यामुळे नेहमी प्रामाणिक रहा।
〰〰〰〰〰〰〰〰

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

’कारणं’ देणाऱ्यांना चपखल ’उत्तर

आयुष्यात स्वप्नवत वाटणाऱ्या कित्येक गोष्टी सत्यात उतरवण्याची क्षमता आपल्या प्रत्येकांत आहे. याची असंख्य उदाहरणे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतात. काही लोक तर त्यांच्याकडे असलेल्या दुर्बलेतवर मात करुन विजयी होतात. त्यांना हवे ते साध्य करतात. आपल्याकडे असणाऱ्या उणीवेवर मात करत यशस्वी झालेल्या लोकांची उदाहरणे आपल्याला नेहमीच प्रेरित करत असतात. वेळोवेळी ’कारणं’ देवून पळ काढणाऱ्यांसाठी अतिशय चपखल ’उत्तर’देणारी हि उदाहरणं आहेत...   

👉 _*कारणं*_ : माझ्याकडे पैसे नाहीत?

_*उत्तर*_ : इन्फोसिस कंपनीच्या नारायण मुर्तींकडे सुरूवातीच्या काळात पैसे नव्हते. त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकून कंपनी सुरु केली होती.


👉 _*कारणं*_ :  मी गरीब आहे, माझा जन्म खेड्यात झाला.

_*उत्तर*_ :  माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम एका गरीब घरात जन्माला आले होते. पुढे जाऊन त्यांनी केलेलं महान कार्य सर्वानांच माहित आहे.

👉 _*कारणं*_ :  मी बऱ्याच वेळा अपयशी झालो आता प्रयत्न करण्याची हिंमत नाही.

_*उत्तर*_ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष व्हायच्या आधी पंधरा वेळा निवडणूक हरले होते.

👉 _*कारणं*_ :  माझा चेहरा सुंदर नाही.

_*उत्तर*_ :  अभिनेते नाना पाटेकर व मिथुन चक्रवर्ती हे चित्रपटाचे नायक दिसत नाहीत. त्यांचे चेहरे त्यासारखे नाहीत. मात्र त्यांनी हिरो म्हणून केलेल्या भूमिका व त्यांचे यश आपल्याला माहित आहेच.

👉 _*कारणं*_ :  माझे शिक्षण कमी आहे.

_*उत्तर*_ :  महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे शिक्षण फारच कमी होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यलेखनात फार मोठे कार्य केले. त्यांना केवळ तीन दिवस शाळेत जाता आले होते. बहिणाबाई चौधरी यांना अक्षरओळख सुध्दा नव्हती.

👉 _*कारणं*_ :  मी दिवाळखोरीत निघालो आहे, माझ्यावर कोण विश्वास ठेवणार?

_*उत्तर*_ :  प्रसिध्द उद्योजक व फोर्ड कंपनीचे मालक हेन्री फोर्ड त्यांच्या आयुष्यात सातवेळा दिवाळखोर झाले होते. जगातील सर्वात मोठी कोल्ड्रिंक कंपनी पेप्सीको दोनदा दिवाळखोरीत निघाली होती.

👉 _*कारणं*_ :  माझे वय कमी आहे.

_*उत्तर*_ :  शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याची सुरूवात अतिशय कमी वयात केली होती. सचिन तेंडूलकरने अतिशय कमी वयात भारतीय संघात पदार्पण केले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचे वय 21 वर्षाचे होते.

👉 _*कारणं*_ :  माझे वय जास्त आहे, मी म्हातारा झालो.

_*उत्तर*_ :  अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 55 व्या वर्षी नव्याने करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर परत ते यशाच्या शिखरावर पोहोचले. हर्लंड सँडर्सनी वयाच्या साठीनंतर केएफसी (केंटुकी फ्राईड चिकन) सुरु करुन जगभरात त्याचा विस्तार केला.
वरील उदाहरणे पाहिली तर कळते की, या लोकांनी आपल्या कमजोरीवर मात करुन यश मिळवले आहे. आपल्याकडे जे नाही त्याची ते व्यथा करत बसले नाहीत. जे आहे त्यात बेस्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आज त्यांचे नाव घेतले जाते. ग्रामीण, गरीब, श्रीमंत अशा सर्व प्रकारची माणसे यशस्वी होतात. ती शक्ती निसर्गाने त्यांना दिलेली आहे. त्या शक्तीला साकार करण्यासाठीचे मार्ग सापडले की झालं.

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

अध्यात्म आणि आधुनिक शास्त्र

भगवदगीता आणि त्यावरून लिहिलेल्या ज्ञानेश्वरी मधे आत्मा अमर अविनाशी आहे त्याला कोणीही इजा पोहोचवू शकत नाही असं लिहीलेले आहे ते बरोबर आहे.
पण मृत्यूनंतर आपल्या शरीराबाहेर पडतो तो लिंगदेह ह्या वायुरूप देहात आत्मा असतो.
आपल्या इच्छा वासना ह्याच वायुरूप देहात सामावलेल्या असतात.
आता विचार करा सायन्स म्हणते शरीराच्या कुठल्याही भागातून मेंदूत संदेश जायला 3 सेकंद लागतात पण डोळ्यांसमोर अचानक काही आले तर 1 सेकंदाच्या आत आपण पापण्या मिटतो हे कसे.
पाणीसुद्धा 4 अंश ते 0 अंश या तापमानात विसंगत आचरण दाखवते
का
या सगळ्या गोष्टींची समाधानकारक उत्तरे सायन्सकडे नाहीत
डॉक्टर सुद्धा म्हणतात ना आता सगळं देवाच्या हातात
म्हणजेच काहीतरी सुपर नँचरल पॉवर आहे हे मान्य
आपल्याला 400 ते 700 नँनोमीटर मधील गोष्टी दिसतात ज्याला आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतो पण त्याच्याही पलीकडे युव्ही रेज, इन्फ्रारेड, गँमा वेव्हज् एक्सरे वेव्हज् आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत म्हणजे अस्तित्वात नाहीत असं नाहीये.
घुबडाला रात्री आपल्यापेक्षा जास्त दिसते, म्हणजे आपल्यापेक्षा त्याला विषेश दिसते,
आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत हे सायंटिफीकली सिद्ध झालंय
आता दहाव्या दिवशी कावळा शिवतो हे आपण कित्येकदा पाहिलं आहे, जेव्हा नातेवाईक हात जोडून प्रार्थना करतात वचन देतात तेव्हाच कसा कावळा शिवतो
कारण हा लिंगदेह त्या कावळ्याला दिसतो
आणि हे सर्व मृत्यूनंतरचे भोग त्या लिंगदेहाला भोगावे लागतात आत्म्याला नाही
तुम्ही सगळ्यांनी वाचले असेल की क्लासिकल म्युझिक लावले तर गाई दुध जास्त देतात गुजरात मधे हे प्रयोग यशस्वी झालेत
मध्यंतरी मी असं वाचलं की मुतखडा फोडण्यासाठी विशिष्ट हर्टझचा आवाज वापरला आणि अॉपरेशनशिवाय इलाज करायची पद्धत शोधून काढली
आपल्याला 20 ते 20000 हर्टझच्या मधील आवाज ऐकु येतो पण याच्या खालील लिमिटमधे हत्ती एकमेकांशी 2 किलोमीटर पर्यंत संवाद साधतात हे डिस्कव्हरी चँनेलवर दाखविले होते
म्हणजेच आवाज सुद्धा आपण ठराविक मर्यादेतील ऐकु शकतो पण त्याच्या पलीकडे आवाज आहे, आपल्याला ऐकू येत नाही म्हणून ते नाही असं म्हणता येत नाही.
आणि त्याचबरोबर आवाजात शक्ती आहे
मग आपल्या हिंदू धर्मांत जे गायत्री मंत्र, गणेश गायत्री, विष्णु गायत्री, रुद्र गायत्री हे जे मंत्र दिलेले आहेत ते अशाच विशिष्ट लहरींचे आहेत. विविध स्तोत्रे वगैरे लिहीलेली आहेत
पृथ्वीवर 70% पाणी आहे त्याला चंद्राच्या पोझिशन प्रमाणे भरती येते, मग आपल्या शरीरात 70% एवढे द्रव पदार्थ आहेत त्याला या चंद्राच्या पोझिशनमुळे फरक पडत नसेल
if A=B and B=C then A=C
जपानमध्ये पाण्यात क्रिस्टल मिक्स करून म्युझिक लावून चेक केले, क्लासिकल म्युझिक लावल्यानंतर ते बँलन्स झाले म्हणजेच म्युझिक प्रमाणेच हे मंत्र म्हणले तर आपणही आपल्या शरीरातील द्रव बँलन्स करू शकतो, आपला कॉन्शसनेस वाढवू शकतो आपला आपल्यावर ताबा चांगला राहू शकतो
पुर्वीचे ऋषी असेच नामस्मरण जप करून समाधि अवस्थेत जायचे आणि मग या गोष्टींचे ज्ञान मिळवायचे.
मी लिहिलेल्या लिपीचा तुम्हांला अर्थ लावता येतो, बोली भाषेचा ध्वनीचा अर्थ लावता येतो, इथे माध्यम हवा आहे, पण ज्यांना कॉन्शसनेस वाढल्यामुळे दिसण्या ऐकू येण्यापलीकडची रेंज समजत असेल तर ती सिद्धि प्राप्त झाल्यासारखे आहे, मग त्यांनी हवेच्या ऐवजी पृथ्वी हे माध्यम वापरले तर कदाचित् आणखीन विषेश ज्ञान प्राप्त होत असेल जे आपल्याला तेवढी रेंज नसल्यामुळे समजणे पुर्णपणे अवघड होत असेल.
पण या सगळ्या गोष्टी समजायला अभ्यास हवा आपण पहिली ते पंधरावी अभ्यास केल्यानंतर आपल्याला कॉमर्स आर्टस् इंजिनियरींग समजायला लागतं
गावाकडच्या शेतकरी माणसाला सांगितलंस की मला कोरल मधे नाहीतर इलस्ट्रेटरमधे आर्टवर्क करुन दे तीन तासात तर जमेल त्याला?
सीएनसी मशिन ड्रॉइंग दे असं जर एखाद्या शिक्षकाला सांगितलंस तर देईल का तो?
म्हणजेच त्या त्या फिल्डचा अभ्यास हवा
मग अध्यात्माचा अभ्यास पण काही वर्षे केल्यावर ह्या गोष्टी समजू लागतील
कोणते ग्रंथ वाचले उपनिषदे, भगवदगीता, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, निदान हरीपाठ किंवा दासबोध, यावरूनही हा अभ्यास वाढवता येईल.
अल्बर्ट आइनस्टाईन म्हणतो जर आम्ही मनापासून प्रयत्न केले आणि परमेश्वराने मनावर घेतले तर एखादी गोष्ट आम्हांला समजते जी आधीच असते तरी आपण त्याला शोध म्हणतो
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अश्याने भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
विवेकानंदांची देवावर पुर्ण श्रद्धा होती विश्वास होता त्यांनी हिंदू धर्मातील एका परंपरेनुसार रामकृष्ण परमहंसांना गुरु केलं आणि संन्यास घेतला होता
आणि ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या बद्दल मी काय बोलणार त्यांची विठ्ठलभक्ती सर्वमान्य आहे.स्वर्ग नरक ह्या गोष्टी या ज्ञानी संतांना मान्य होत्या.
त्यामुळेच बाकी कुणाच्याही मतांपेक्षा या संतांनी सांगितलेल्यावर माझा दृढविश्वास आहे
ज्याला जसं हवं तशी भक्ती करा हा आपल्या हिंदू धर्मातील विचार मला जास्त योग्य वाटतो
तुम्ही पुजा करा किंवा
आरती करा किंवा
जप करा किंवा
यात्रा करा किंवा
पोथ्या वाचन करा
नामस्मरण करा
तप करा
योग हटयोग करा
प्रपंच करतानाच परमार्थ करा
अगदी प्रत्येक माणसात ईश्वराचे अंश आहेत म्हणून लोकांच्यासाठी सेवा करा
इतके सुक्ष्मपणे त्याबरोबरच सोपे करुन सांगितलेल्यावर माझा विश्वास बसणारच ना
आणि सर्व मार्ग हे एकाच ईश्वराला भजतात हे उदात्त तत्त्वज्ञान सुद्धा हिंदू धर्मातीलच
दूसरा कोणत्याही धर्मात आपला धर्म सोडून वेगळ्या धर्माला मान्यता नाही.

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

एका पारंपरिक हिंदू कुटुंबात जोईता मोडंल यांचा जन्म झाला. जोईता या तृतीयपंथी असल्याने त्यांना लहानपणापासून खूप भेदभाव आणि त्रास सहन करावा लागला. त्यांना याच कारणामुळे पुढे शाळा सोडावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांना भीक मागावे लागले आणि बस स्टँडवरही झोपावे लागले. आता त्या स्वतःला खूप समाधानी मानतात, कारणही तसेच आहे. त्या बनल्या आहेत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश.
29 वर्षीय जोयंतो (पुरुष) यांचा जन्म कोलकाता शहरात झाला. शाळेत त्यांचे जेंडर बद्दल असलेल्या शाळेच्या पूर्तता त्या करण्यास अपयशी ठरल्याने त्यांना इयत्ता 10 वि मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले. एका चॅनेल दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जॉईता यांचा भिकारी तृतीयपंथी ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. एक तृतीयपंथी न्यायाधीश बनण्याचा क्षण तृतीयपंथीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा कौतुकाचा आहे. जॉईतांचा हा प्रवास मुकीच सोपा नव्हता. केवळ विचारांच्या परिवर्तनामुळे आणि मनात असलेल्या जिद्दीमुळेच जीवन जगण्यासाठी भीक मागणे, भीक मागता मागता सामाजिक काम करणे आणि त्याचसोबत आपले शिक्षण सुरू ठेवणे, हे सगळे जॉईताने केले आहे. जॉईता या कोलकाता मध्ये होणाऱ्या भेदभावला कंटाळून उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आल्या आणि परत गेल्याच नाही.सुरुवातीच्या काळात त्यांनी हिजडा म्हणून काम करण्याबरोबर इतर तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी ही लढा दिला. त्यानंतर त्यांनी समाजातील प्रत्येक भेदभाव होणाऱ्या व्यक्तीसाठी लढा उभारला. त्यांनी या सर्व कामांसोबत आपले मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले.2010 साली त्यांना आपले मतदान कार्ड मिळाले. आपल्या जिल्ह्यात मतदान कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी होत्या.
काही वर्षांपूर्वी जॉईता यांनी समाजातील वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी स्वतःची एक संस्थाही चालू केली. जिल्यातील हजारो व्यक्तींना त्यांची संस्था मदत पोहोचवते. आतापर्यंत मिळालेल्या यशा व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या तृतीयपंथीपणामुळे हॉटेल मध्ये रूम न मिळाल्यामुळे बस स्टँड वर झोपावं लागल्याच्या वाईट स्मृतींना TOI ला दिलेल्या मुलाखतीत उजाळा दिला. कोलकाता येथील घर सोडल्यानंतर 10 वर्षांनी आता जुलै मध्ये जॉईता यांची दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी त्या झोपत असलेल्या बस स्टँड पासून त्यांची निवड झालेले न्यायालय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. असे त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलखातीत म्हटले आहे. 8 जुलै या दिवशी जॉईता यांना इस्लामपूर सब-डिव्हिजनल लीगल सर्व्हिस कमिटीने न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतर तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला येऊ न देण्यासाठी जॉईता नेहमी प्रयत्नशील असतात.
जॉईतांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘माझ्या यशाबद्दल मला अभिमान आहे. न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. तृतीयपंथी समाजातील 2-3 टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळावून देता आल्या तर मला माझ्या पदाबद्दल समाधान वाटेल. कारण इतर जे तृतीयपंथी 100-200 रुपयांसाठी सेक्स वर्कर्सचं काम करतात, त्यांनाही या त्रासापासून मुक्तता मिळेल व ते सुखाची झोप घेऊ शकतील.’ त्या पुढे बोलताना म्हणाल्या की ‘मी जरी आता वातावणूकुलीत गाड्यामध्ये फिरत असले तरी माझ्या समाजातील इतर तृतीयपंथीना दिवसा भीक आणि सेक्स वर्कर्स म्हणूनच काम करावे लागत आहे.’

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

नोबल सायन्सचा दीपावली उत्सव


अंतिम क्षणात स्टीव्ह जॉब्जचे विचार

१०० वेळा वाचलो असेन पण पुन्हा १०१ वेळाही सर्व वाचेन असा हा लेख ......

ऍपल (आय-फ़ोन ) चा मालक स्टीव्ह जॉब्ज स्वादुपिंडाच्या कॅन्सर ने २०११ साली मृत्यू पावला.त्याचे हे शेवटचे शब्द ...

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली...
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले...

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा...

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य" " काळ " " समय ".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.

 लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा,आणि माणसं जपायला हवीत.आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!!

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

7 - गणित - प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका - 01



7 - गणित - प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका - 02



Sample Quiz

क्व‍िझ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
क्व‍िझ डाऊनलोड झाल्यानंतर कम्प्रेस्ड फोल्डर अनकम्प्रेस्ड करुन क्विझ रन करा.

वर्गखोल्यांतली बाके काढा! - डॉ. वसुधा कामत, ​ माजी कुलगुरू, श्रीम. ना. रा. ठाकरसी महिला विद्यापीठ

एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसुधा कामत यांचा 'महाराष्ट्र टाइम्स'मधील हा लेख अवश्य वाचा.

वर्गखोल्यांतली बाके काढा!

डॉ. वसुधा कामत, ​ माजी कुलगुरू, श्रीम. ना. रा. ठाकरसी महिला विद्यापीठ

एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत यावर जगातील तज्ञांचे जवळजवळ एकमत असलेली कौशल्ये : समस्यानिराकरण (Problem Solving), विश्लेषणात्मक विचार (Critical thinking), सर्जनशीलता (Creative Thinking), व परस्पर आदानप्रदान किंवा संप्रेषण (Communication). या यादीत कोठेही स्मरण किंवा पाठांतर अशा कौशल्याचा समावेश नाही. काही अपवाद वगळता आमच्या शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये पाठांतर (कधी कधी अर्थशून्य पाठांतर) हेच एकमेव महत्त्वाचे कौशल्य असल्याप्रमाणे आपापल्या वर्गांत त्यावर भर देतात.

अनेक वर्गांत बहुधा शिक्षक बोलण्याचे (कधी कधी फळ्यावर लिहिण्याचे, आणि आता टेकसॅव्ही झाल्यामुळे प्रोजेक्टरच्या साह्याने प्रेझेंटेशन करीत) भाषण देण्याचे काम करीत असतात, तर विद्यार्थी बहुधा ऐकण्याचे, शिक्षकाच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे (जमेल तितके) लिहून घेण्याचे काम करतात. हे असे दिवसाचे अनेक तास, आणि वर्षाचे अनेक दिवस चालत राहते. यातून विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याचे, समस्या सोडविण्याचे, काही नवीन निर्माण करण्याचे, परस्परांबरोबर सामंजस्याने काम करण्याचे कौशल्य कसे काय विकसित होईल?

त्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गात एकमेकांशी चर्चा करण्याची, प्रयोग करून पाहण्याची, नवीन उपाय सुचविण्याची, सुचविलेल्या उपायांचे मूल्यमापन करण्याची संधी दिली पाहिजे.

शिक्षकाने एखाद्या विषयासंबंधात जी माहिती विद्यार्थ्यांना द्यायचे ठरवले आहे ती वर्गात भाषणातून न देता वर्गाबाहेर पाहता/वाचता येईल (घरी, ग्रंथालयात, संगणक प्रयोगशाळेत किंवा विद्यार्थ्याला सोयीच्या ठिकाणी) अशा स्वरूपात द्यावी (भाषणाचा लिहिलेला सारांश, व्हिडीओ (६-८ मिनिटे), ऑडिओ, जर्नलमधील किंवा पुस्तकातील लेखांचा संदर्भ इ.).

विद्यार्थ्याने ही माहिती वाचावी, पाहून/ऐकून समजावून घ्यावी. यानंतर जेव्हा विद्यार्थी वर्गात येतील तेव्हा त्यांना लहान गटात, जोडीने किंवा थोड्याशा मोठ्या गटात (७/८ सदस्यांच्या) काम करण्याची संधी दिली पाहिजे. यासाठी वर्गरचना कशा प्रकारची असावी?

सध्या आपल्या प्राथमिक शाळेपासून विश्वविद्यालयांपर्यंत सर्वत्र वर्गात रांगेत ठेवलेली बाके (जोडलेला बेंच आणि डेस्क) दिसतात. एका बाकावर दोन/तीन मुले. कधी कधी हे बाक एवढे लांबलचक असतात की त्यावर ८/९ विद्यार्थी सहज बसू शकतील. काही महाविद्यालयांमध्ये थिएटरसारखी चढत्या पायऱ्यांवर बाकांची रचना असते. बाकांच्या दोन रांगांमधून शिक्षकाला फिरण्यासाठी थोडीशी जागा! मोठ्या शहरांमध्ये जिथे विद्यार्थीसंख्या खूप मोठी असते तिथेच अशी रचना असेल असे तुम्हाला वाटेल; पण तसे नाही. खेडेगावात जेथे वर्गखोलांची लांबी-रुंदी पुरेशी आहे आणि वर्गात विद्यार्थीसंख्याही ३०/४० पेक्षा जास्त नाही तिथेही बाकांची अशीच रचना!

वर्गातील बाके किंवा बाकांची वर्गखोली हे आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थेचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हरकत नसावी. आपल्या सहाध्यायाचा चेहराही नजरेला पडू नये अशी दक्षता घेणारी ही रचना!

या बाकांच्या रचनेमुळे वर्गात उभे राहून बोलण्यापलीकडे शिक्षकांना दुसरी पद्धती वापरणे कठीण होते. प्रयोग-दिग्दर्शनासारखी (demonstration) एखादी पद्धती विज्ञान विषयासाठी वापरता येईल; परंतु हे सर्व शिक्षकाधिष्ठित. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा यात फारसा विचार होत नाही. शिक्षकाला लिहिण्यासाठी फळा, प्रेझेंटेशनसाठी लॅपटॉप आणि प्रोजेक्टर, नकाशा, तक्ते, पृथ्वीचा गोल, इतर मॉडेल्स अशी सर्व सामग्री असते. विद्यार्थ्यांच्या गट-अध्ययनासाठी यातील कोणत्या गोष्टी उपलब्ध असतात? अर्थात कोणत्याही नाहीत. त्यामुळेच गटातील अध्ययनही नाही.

शिक्षकाने वर्गात गट-अध्ययन पद्धतींचा किंवा सहकारी अध्ययन पद्धतींचा (Co-operative Learning strategies) वापर करायचे ठरवले तर सर्वात प्रथम बदल करावा लागेल तो वर्गरचनेमध्ये, वर्गातील फर्निचरमध्ये.

वर्गरचनेतील लवचिकता (Flexibility in classroom arrangement)

शिक्षणानंतर ही तरुण मुले जेव्हा नोकरी करण्यासाठी एखाद्या संस्थेत, कंपनीमध्ये, उद्योगामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना दिसून येते की इथे गटात काम करायचे आहे. परस्पर विचाराने, एकमेकांना समजून घेऊन, नवीन दृष्टिकोनातून घटनेकडे, प्रक्रियेकडे, उत्पादनाकडे पाहायचे आहे. या मुलांनी १६ ते १८ वर्षांच्या (किंवा १०/१२ वर्षांच्या) शिक्षणप्रक्रियेत यातील बऱ्याचशा गोष्टी अनुभवलेल्या नसतात.
यावर उपाय म्हणजे शाळेत, महाविद्यालयांत, विश्वविद्यालयांत शिक्षकांनी ‘वर्गातील’ आपले बोलणे कमी करून बोलण्याची, चर्चा करण्याची (प्रसंगी वादविवाद करण्याची), प्रयोग करून ताडून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना देणे.

त्यासाठी वर्गातील बाकांच्या जागी खुर्च्या, किंवा जागचे हलविता येण्यासारखे फर्निचर आणले पाहिजे.

वर्गातील विद्यार्थीसंख्या आणि वर्गाचा आकार

वर्गात विद्यार्थीसंख्या किती असावी? संशोधनअभ्यासातून दिसते की ६० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्येच्या वर्गात विद्यार्थीसंख्येचा अध्ययनावर परिणाम होत नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीदेखील ही संख्या ५० ते ६० अशी ठरवलेली असते.

जागतिक बँक, युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यामागे १.१ ते १.३ मी - ‍

२ - -

जागा (carpet area) असावी असे म्हटले आहे. म्हणजे वर्गात ५० विद्यार्थी असल्यास वर्गाचे क्षेत्रफळ ५५ ते ६५ वर्ग मीटर ‍एवढे असावे. AICTEच्या नियमानुसारही इंजिनीअरिंगच्या ६० विद्यार्थीसंख्येच्या वर्गात १.१ ते १.३ वर्ग मीटर जागा प्रत्येक विद्यार्थ्यामागे उपलब्ध असावी.

अशा वर्गात विद्यार्थ्यांना गटात बसण्यासाठी जागा, शिक्षकाची टेबल-खुर्ची ठेवण्यासाठी जागा (खरंतर विद्यार्थी गट-अध्ययन करताना शिक्षकाने प्रत्येक गटाकडे जाऊन निरीक्षण करावे, आवश्यक असल्यास मार्गदर्शन करावे - थेट उत्तरे सांगणे टाळावे - अशी अपेक्षा असल्याने शिक्षकाला एकाच जागी बसण्याची किंवा उभे राहण्याची गरज पडत नाही.) फळा, प्रोजेक्टर लॅपटॉपसाठी जागा, तसेच वर्गाच्या वाचनालयासाठी (पुस्तके ठेवण्यासाठी) जागा उपलब्ध होऊ शकते.

सहकारी/गट अध्ययन पद्धती आणि उद्दिष्टे

अनेक प्रकारच्या सहकारी/गट अध्ययन पद्धतींवर खूप संशोधन झाले आहे. उच्च पातळीवरची उद्दिष्टे साध्य करण्याकरिता या पद्धतींचा उपयोग होतो हे निर्विवाद. बेंजामिन ब्लूम (Benjamin Bloom) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बौद्धिक क्षेत्रातील उद्दिष्टांचे सहा पातळ्यांमध्ये वर्गीकरण केलं.

१. स्मरण २. आकलन ३. उपयोजन ४. विश्लेषण ५. मूल्यमापन व ६. संश्लेषण/नवनिर्मिती.

सर्वात तळाची पातळी ‘स्मरण’ आणि त्यावरची ‘आकलन’. वरच्या पातळीवर जाताना खालच्या पातळ्यांवर प्रभुत्व मिळाले आहे अशी अपेक्षा. आपल्या शिक्षणप्रक्रियेचा भर तळातील या दोन पातळ्यांवर. आकलनापेक्षाही स्मरणावर अधिक. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उद्दिष्ट पातळ्या वरच्या तीन. यांचा कुठेच मागमूस आपल्या बाकांनी भरलेल्या, रांगेत बसविलेल्या वर्गात नसतो.

पदव्युत्तर पदवीवर्गात जिथे सामान्यतः १५ ते ३० विद्यार्थी असतात अशा वर्गांतही बाके दिसतात. श्रीम. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या शैक्षणिक तंत्रविभागात वर्गरचनेवर, वर्गातील लवचिक फर्निचरसंबंधी वेगवेगळ्या आकृतीबंधांचा विचार केला जातो. विद्यापीठाच्या बहुतेक सर्व पदव्युत्तर ‌पदवीवर्गांमध्ये लिहिण्याची सोय असलेल्या खुर्च्या वापरल्या जातात.

आता नवीन तंत्रज्ञानामुळे आपण BYOD (Bring your own device) या दिशेने प्रवास करीत आहोत (विशेषतः विश्वविद्यालयांमध्ये.) BYOD देखील बाकांवर ठेवल्यास परिणामशून्य ठरतील. अनेक महानगरपालिका, नगरपालिका त्यांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब देत आहेत. पुस्तकांचे ओझे बाळगण्याऐवजी सर्व माहिती या टॅबमध्ये भरून दिली जाईल. महत्त्वाचे आहे ते या माहितीवर परिष्करण कसे करायचे, तिचा उपयोग करून समाजासमोरचे प्रश्न कसे सोडवायचे.

आपल्या तरुण पिढीने एकविसाव्या शतकात उपयुक्त ठरणारी उद्दिष्टे साध्य करावीत असे वाटत असेल तर पुढील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल.

१. शिक्षकांना (सर्वच शैक्षणिक पातळ्यांवरच्या) वर्गातील भाषणे कमी करून गट/सहकारी अध्ययन पद्धतींबाबतचे प्रशिक्षण देणे. हे प्रशिक्षण पुन्हा भाषणांच्या माध्यमातून न देता गट/सहकारी अध्ययन पद्धतींद्वारेच दिले पाहिजे तरच शिक्षकांना त्या पद्धतींचा उपयुक्त परिणाम अनुभवता येईल.

या शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या तज्ज्ञांनाही या गट अध्ययन पद्धतींचे प्रशिक्षण द्यावे लागेल. शिक्षणविद्यालयात शिक्षणमहाविद्यालयांतही भाषण-पद्धतीवरच भर असतो. त्यात बदल घडवून आणणे जरूरीचे आहे.

२. वर्गातील बाके (बेंच आणि डेस्क) काढून तेथे लवचिक, जागेवरून हलविता येणारे (लिहिण्यासाठी सोय असलेल्या खुर्च्या किंवा खुर्ची आणि लहानसे टेबल, किंवा खुर्च्या आणि ५/६ विद्यार्थी गोलाकार बसू शकतील अशा आकाराची टेबले) फर्निचर आणणे.

अ) ही गोष्ट खर्चिक आहे कारण आधीचे फर्निचर घेण्यासाठी खर्च झालेला आहे. परंतु योग्य नियोजन केल्यास २/३ वर्षांच्या कालावधीत हळूहळू सर्व फर्निचर बदलता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांचे अध्ययन केंद्रस्थानी मानले पाहिजे.

ब) नव्याने निर्माण होणाऱ्या शाळा/महाविद्यालयात फर्निचर विकत घेताना विचारपूर्वक लव‌चिक/सहज जागेवरून हलविता येणारे फर्निचर विकत घ्यावे.

क) जेव्हा शाळेतील जुने फर्निचर मोडकळीला आल्यामुळे ते टाकून देऊन नवीन फर्निचर करण्याचे ठरते तेव्हा ते लवचिक असेल हे पाहावे.

केवळ फर्निचर बदलून शिक्षकांची मानसिकता बदलेल असे नाही. त्यासाठी प्रशिक्षण द्यावेच लागेल. पण प्रशिक्षित शिक्षकांना लवचिकb वर्गरचना सहकारी/गट अध्ययन पद्धती वापरण्यास अधिक प्रेरित करेल यात शंका नाही.

सौजन्य:- महाराष्ट्र टाईम्स

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

3. सूर्यनमस्कार संकल्प

श्रीसूर्यनारायणप्रीत्यर्थ नमस्काराख्यं कर्म करिष्ये।
ध्येय: सदा सवितृमण्डलमध्यवर्ती
नारायण: सरिसिजासनसंन्निविष्ट:।
केयूरवानमकरकुण्डलवान् किरीटी
हारी हिरण्मयवपुर्धुतशंखचक्र:॥
ॐ मित्राय नम:।
ॐ रवये नम:।
ॐ सूर्याय नम:।
ॐ भानवे नम:।
ॐ खगाय नम:।
ॐ पूष्णे नम:।
ॐ हिरण्यगर्भाय नम:।
ॐ मरीचये नम:।
ॐ आदित्याय नम:।
ॐ सवित्रे नम:।
ॐ अर्काय नम:।
ॐ भास्कराय नम:।
मित्ररविसूर्यभानुखगपूष्णहिरण्यगर्भ
मरीच्यादित्यसवित्रर्कभास्करेभ्यो नम:।
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वंति दिने दिने।
जन्मान्तरसहस्त्रेषु दारिद्यं नोपजायते॥

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

स्नानविधी

गंगे यमुने चैव गोदावरि सरस्वति।

नर्मदे सिंधु कावेरि जलेस्मिन् सन्निधिं कुरु॥

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

1. प्रात:स्मरण

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम्॥
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले।
विष्णूपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे॥

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

7th Science 01 The Living World - Adaptations and Classifications

देवीमाहात्म्य : रचना, इतिहास आणि परंपरा

देवीमाहात्म्य हा देवीच्या लीला वर्णन करणारा ग्रंथ देवीभक्तांकरिता अतिशय पूजनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. मार्कण्डेय पुराणात समाविष्ट केले गेलेले हे १३ अध्यायांचे देवीमाहात्म्य, चण्डीपाठ आणि दुर्गासप्तशती या दोन नावांनीदेखील ओळखले जाते. या देवीमाहात्म्याच्या उगम आणि परंपरेची माहिती.
पुरातन या शब्दावरून पुराण हा शब्द आला असावा असे एक मत आहे. प्राचीन काळातील कथांचा समावेश या पुराणग्रंथांमध्ये असतो. एखादी कथा अगर उदाहरण जुने झाल्याने आता त्याचा दाखला देणे योग्य नाही असे सुचविताना ‘पुराणातील वानगी पुराणातच ठेवा’ असे वाक्य मराठीभाषक वापरतात. यावरून प्राचीन काळातील (धार्मिक) गोष्टी सांगणारा ग्रंथ म्हणजे पुराण होय, अशी कल्पना सर्वसामान्यांच्या मनात असते, असे म्हणता येईल. पुराण या नावाने अनेक ग्रंथ प्रसिद्ध असले तरी त्यातील १८ ग्रंथ विशेष प्रसिद्ध असून त्यांना महापुराणे असे म्हणतात. या पुराण ग्रंथांची निर्मिती साधारणपणे १८०० ते १२०० वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते. त्यातही मत्स्य, मार्कण्डेय, कूर्म, विष्णू इत्यादी पुराणे अधिक प्राचीन मानली जातात. पुराण प्रकारात मोडणारी थोडय़ा नंतरच्या काळात तयार झालेली १८ उपपुराणेदेखील प्रसिद्ध आहेत.
जुन्या काळातील कथा म्हणजे पुराण असा समज सामान्यपणे असला तरी विष्णुपुराणामध्ये पुराण कशाला म्हणायचे, ते पुढील व्याख्येमध्ये नेमके सांगितले आहे-
सर्गश्च प्रतिसर्गश्च
वंशो मन्वन्तराणि च ।
वंशानुचरितं चेति पुराणं पञ्चलक्षणम् ॥
सर्ग (सृष्टीची निर्मिती कशी झाली याविषयीच्या कथा), प्रतिसर्ग (सृष्टीचा नाश अथवा प्रलय कसा होतो याविषयीच्या कथा), ऋषी आणि देवतांचे वंश, विविध मनू आणि त्यांच्यामधील काळातील (मन्वंतर) कथा आणि राजेलोकांचे वंश या पाच गोष्टी पुराणाची म्हणजे पुराणाची पाच लक्षणे होत. थोडक्यात, एखाद्या ग्रंथात यापकी काही किंवा सर्व प्रकारच्या हकिगती असल्या म्हणजे तो ग्रंथ पुराण असल्याचे मानता येते. म्हणजेच पुराण हा एक विशिष्ट असा साहित्य प्रकार आहे.
१८ महापुराणांची रचना वेदव्यासांनी केल्याचे भारतीय परंपरा सांगते. त्या पुराणांची नावे आणि रचना पाहिली असता विशिष्ट देवतेचे माहात्म्य कथन करण्याकरिता पुराणे निर्माण झाली असावीत असे म्हणता येते. तसेच विशिष्ट राजवंशांची माहिती विशिष्ट पुराणांमध्ये येत असल्याने ती ती पुराणे त्या त्या राजवंशांचे राज्य ज्या परिसरात होते, तिथे निर्माण झाली असावीत, असेही काही संशोधकांचे मत आहे. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, मार्कण्डेय, पद्म, वायू, भविष्य, ब्रह्म, ब्रह्माण्ड, ब्रह्मवैवर्त, विष्णु, अग्नि, नारद, भागवत, स्कन्द, िलग आणि गरुड ही १८ पुराणांची नावे पाहता त्यांचा मुख्यत: वैष्णव आणि शैव परंपरांशी असणारा जवळचा संबंध सहज लक्षात येतो.
मार्कण्डेय पुराण
यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे मार्कण्डेय पुराण हे प्राचीन पुराणांपकी एक असल्याचे मानले जाते. मार्कण्डेय ही व्यक्तिरेखा तसे पाहता शैव आणि वैष्णव दोन्ही परंपरांशी संबंधित आहे. अल्पवयात होऊ घातलेला अपमृत्यू मार्कण्डेयाने शिवभक्ती करून टाळल्याची कथा जशी प्रसिद्ध आहे, तसेच विष्णूने त्याला प्रलयाचे घडविलेले दर्शन आणि त्या प्रलयातही एका वडाच्या पानावर लीलया तरंगणाऱ्या बालरूपातील परमात्म्याचे मार्कण्डेयाने बालमुकुन्दाष्टक रचून केलेले स्तवनदेखील प्रसिद्ध आहे. याच मार्कण्डेयाच्या नावाने ओळखले जाणारे पुराण हेदेखील काही इतर पुराणांप्रमाणे विशिष्ट अशा देवतेच्या पंथाचे (वैष्णव अगर शैव) मानले जात नाही, हे विशेष होय. महाभारताच्या कथानकाशी या पुराणाचा जवळचा असणारा संबंध आणि पुराणग्रंथाच्या उपरोक्त व्याख्येशी बऱ्यापकी प्रामाणिक असलेली संहिता यामुळे संशोधकांना त्याचे प्राचीनत्व सहज पटते.
असे हे मार्कण्डेय पुराण एकूण १३७ अध्यायांचे आहे. मार्कण्डेयाला व्यासांच्या चार शिष्यांपकी एकाने, जैमिनीने विचारलेल्या प्रश्नापासून या पुराणाचा प्रारंभ होतो. महाभारताचे सखोल अध्ययन करूनही ज्यांची उकल झाली नाही, अशा गोष्टींविषयी हे प्रश्न आहेत. मार्कण्डेय मात्र स्वत: जैमिनीचे शंकासमाधान करण्याऐवजी त्याला विन्ध्य पर्वतात निवास करणाऱ्या चार बुद्धिमान पक्ष्यांचा सल्ला घेण्याचे सुचवितात. जैमिनीच्या त्या पक्ष्यांशी झालेल्या संवादातून मग योगशास्त्र, धर्मशास्त्र, कर्मसिद्धान्त, पाप-पुण्याची फळे, स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना इत्यादी नानाविध गोष्टी मार्कण्डेय पुराणाने उलगडून दाखविल्या आहेत. या पुराणात ८०व्या अध्यायापर्यंत आणि नंतर ९४वाव्या अध्यायापासून पुढे खुद्द मार्कण्डेयाचा संवाद आला आहे. या संवादात, मध्येच अध्याय क्रमांक ८१ ते ९३ अशा एकूण तेरा अध्यायाचे देवीमाहात्म्य येते. त्यावरून हे देवीमाहात्म्य (जे कदाचित मुळात एक स्वतंत्र ग्रंथ असू शकेल) मार्कण्डेय पुराणात मागाहून घालण्यात आले असावे, असा तर्क अभ्यासकांनी केला आहे. देवीमाहात्म्याचा विचार केला तर असे दिसते की ते शैव किंवा वैष्णव अशा कोणा एका पुरुषदेवतेच्या संप्रदायाशी संबंधित नसून ते स्वतंत्रपणे अस्तित्व राखून आहे. तसेच शाक्त संप्रदायाशी त्याचा संबंध असला तरी ते केवळ शाक्त परंपरेतच पूजनीय आहे, असे मात्र नाही. कदाचित मार्कण्डेय पुराणसुद्धा विशिष्ट संप्रदायातील नसल्याने देवीमाहात्म्याचा अंतर्भाव करण्याकरिता पुराणपरंपरेला ते योग्य वाटले असावे.
देवीमाहात्म्याची प्राचीनता
देवीमाहात्म्याचा अंतर्भाव मूळ मार्कण्डेय पुराणाच्या संहितेत मागाहून झाला असावा हे मत मान्य केले, तरी देवीमाहात्म्य फार अर्वाचीन नाही, असेही संशोधकांना वाटते. देवीमाहात्म्याची स्वतंत्र हस्तलिखितेही मोठय़ा प्रमाणावर सापडतात. उपलब्ध नोंदींनुसार त्यातील सर्वात प्राचीन हस्तलिखित नेपाळमधील असून ते दहाव्या शतकातील आहे. राजस्थानमधील जोधपूरजवळच्या दधिमती माता मंदिरात (जे दहिया ब्राह्मणांशी संबंधित आहे) असणाऱ्या पुरातन शिलालेखात देवीमाहात्म्यातील सुप्रसिद्ध असा ‘सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते॥’ हा श्लोक सापडला आहे. लेखातील उल्लेखाप्रमाणे २८९ व्या वर्षी हा लेख कोरला गेला. देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांच्या मते लेखाच्या अक्षरवटिकेवरून हे वर्ष गुप्तकालगणनेतील मानले पाहिजे. त्यामुळे लेखाचा काळ इ. स. ६०८ ठरतो. यावरून असा तर्क करता येतो की, देवीचा महिमा या काळात प्रसृत होऊ लागला होता. याच दरम्यान कधीतरी मार्कण्डेय पुराणाशी देवीमाहात्म्याचा संबंध जोडला गेला असावा. ब्रह्मविष्णुमहेशात्मक त्रिदेव, जे विश्वाची उत्पत्ती-स्थिती-लय होण्यास कारणीभूत आहेत, त्यांचे महत्त्व पुराण काळात अनन्यसाधारण वाढल्याचे दिसते. त्यांच्या पत्नी अथवा शक्ती (सहकारिणी) मानल्या जाणाऱ्या पार्वती-लक्ष्मी-सरस्वती या त्रिदेवींचे महत्त्वही या काळात होतेच. शाक्त पंथाच्या दृष्टिकोनातून विचार करता मूळ शक्ती एकच असून त्या शक्तीचीच विविध रूपे म्हणजे इतर सर्व देवता होत. याच विचाराशी साम्य दर्शविणारी तीन देवतांची चरिते (कथा) देवीमाहात्म्यात ग्रंथित केली आहेत.
देवीमाहात्म्याची विषयवस्तू
देवीमाहात्म्यामध्ये एकूण १३ अध्याय आहेत. यामध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवतांनी असुरांचे निर्दालन केल्याच्या कथा संकलित केलेल्या आहेत. शिवाची सहकारिणी म्हणून पार्वतीचा उल्लेख असला, तरी त्या शिवाचे भरव अथवा काल म्हणून प्रसिद्ध असणारे जे रौद्र स्वरूप आहे, त्याची सहकारिणी म्हणून भरवी अथवा काली या देवतेचा उल्लेख येतो. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथात महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती अशा देवतात्रयीचे मुख्यत: वर्णन केले गेले असावे. मात्र देवीमाहात्म्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वराच्या सहकारिणी म्हणून या तीन देवी महत्त्वाच्या नसून त्या स्वत:च स्वतंत्र, स्वयंसिद्ध देवता म्हणून महत्त्वाच्या मानल्या आहेत. ही विषयाची पाश्र्वभूमी देखील पहिल्या अध्यायापासून विशद होत जाते. अनेकदा या तीनही देवतांचा संबंध या ना त्या मार्गाने विष्णूशी जोडलेला दिसतो. उदाहरणार्थ, प्रथम चरितामधील महाकाली म्हणजे विष्णूची योगनिद्रा आहे. मध्यम चरितामधील महिषमर्दनिी तर साक्षात महालक्ष्मी म्हणूनच ओळखली जाते. तसेच उत्तम चरितामधील देवता महासरस्वती असली, तरी युद्धानंतर सर्व देव तिची नारायणी म्हणून स्तुती करतात. यावरून असे सुचवावेसे वाटते की जरी देवीमाहात्म्य हा ग्रंथ आदिशक्तीचे एक स्वतंत्र देवता म्हणून असलेले स्थान अधोरेखित करीत असला, तरी तो काहीसा आदिशक्तीच्या विष्णूशी संबंधित असणाऱ्या अंशाकडे झुकल्यासारखे वाटते.
देवीमाहात्म्याच्या प्रथम चरितात मार्कण्डेयांच्या संवादामध्ये सावर्णिनामक मनूचा उल्लेख येतो. या मनूच्या काळातील, म्हणजेच सावर्णिमन्वन्तरातील कथा सांगत असता, प्रथम सुरथ राजाचा उल्लेख मार्कण्डेय करतात. सुरथाच्या राज्यावर परचक्र आले असता तो एकाकी अवस्थेत आपल्या घोडय़ावर बसून वनामध्ये जातो. मेधा (संस्कृतमध्ये मेधस्) नावाच्या एका मुनींच्या आश्रमामध्ये पोहोचून तेथे काही दिवस मुक्काम केला असता राजाच्या मनात सतत आपल्या राज्याविषयीच विचार येत असतात. आपले अधिकारी प्रजेची नीट काळजी घेतील का, परक्या राजाच्या हाताखाली माझा प्रधान, माझे नोकरचाकर कसे बरे काम करीत असतील, वायफळ खर्च करून माझा खजिना ते रिकामा तर करून टाकणार नाहीत ना इत्यादी असंख्य चिंता त्याचे मन पोखरत असतात. त्याच दरम्यान मेधा मुनींच्या आश्रमातील समाधी नावाच्या एका वैश्याशी राजाची गाठ पडते. या वैश्याचे घरदार आणि सर्व संपत्ती लाटून त्याच्या बायका-मुलांनीच त्याला घराबाहेर काढलेले असते. आश्रमात राहात असता तोही सतत माझी मुले आता तरी सुखात असतील ना, बायका खुशीत दिवस घालवतील ना, आता ती सर्व मंडळी सदाचाराचे पालन करतात की अजूनही दुर्वर्तनीच आहेत, इत्यादी विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. राजा त्याला विचारतो की, ज्या कुटुंबियांनी तुलाच घराबाहेर काढले, त्यांची काळजी करायची तुला गरजच काय? त्यावर तो वैश्य म्हणतो की, मी माझ्या मनाला खूप समजावले, परंतु मनात सतत घरच्यांचेच विचार येत राहतात.
शेवटी एकदा ते दोघे मेधा मुनींना भेटले असता राजा आपली शंका त्यांना विचारतो. तो म्हणतो ‘माझ्या गेलेल्या राज्याची काळजी इथे आश्रमात राहूनही अखंडपणे करीत आहे. या वैश्याची कथाही माझ्यासारखीच आहे. तोही जी मंडळी त्याच्याशी वाईट वागली, त्यांच्याच चिंतेत सतत व्यग्र असतो. असे आमच्या बाबत का घडते आहे?’
मेधा त्यावर म्हणतात, तुम्हा दोघांची स्थिती त्या पक्ष्यांसारखी झालेली आहे जे स्वत: भुकेने व्याकूळ झाले असूनही आपल्या पिल्लांच्या तोंडात घास भरवितात. महामायेची मोह नावाची शक्ती अत्यंत अद्भुत आहे. त्या मोहाच्या तावडीत सापडलेल्याची काय गत होईल ते सांगता येत नाही. यावर राजा आणि वैश्य महामायेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा प्रकट करतात. त्यावर मेधा म्हणतात, भगवान विष्णूची शक्ती असणारी महामाया हे सर्व विश्व चालवते. महान अशा विद्वान लोकांच्या चित्तालाही संमोहित करून मोहाधीन करणारी ही महामाया प्रसन्न झाली असता मात्र मनुष्यांना मोक्ष प्रदान करते-
ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा।
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति॥
तया विसृज्यते विश्वं जगदेतच्चराचरम्।
सषा प्रसन्ना वरदा  नृणां भवति मुक्तये॥
मेधा स्पष्ट करतात की, ही महामाया जरी मूलत: अव्यक्त स्वरूपात असली, तरी देवतांच्या साहाय्यासाठी ती अनेकवार प्रकट होते. देवीमाहात्म्यात या तिच्या अनेक प्रकटनांपकी पहिले अगदी थोडक्यात वर्णन केले आहे. आतापर्यंतचा उपरोक्त कथाभाग आणि देवीचे पहिले प्रकटन सांगणारी कथा पहिल्याच अध्यायात संपते. म्हणजेच प्रथम चरित केवळ एकाच अध्यायाचे आहे. प्रथम चरितात देवीचे हे पहिले प्रकटन योगनिद्रा स्वरूपात पुढीलप्रमाणे मांडलेले दिसते- शेषावर शयन करणाऱ्या विष्णूच्या कानातील मळापासून उत्पन्न झालेले मधू आणि कैटभ हे दोन असुर एकदा ब्रह्मदेवालाच ठार करण्यास उद्युक्त झाले. त्यावेळी ब्रह्मदेवाने विष्णूच्या डोळ्यांत घर करून असणाऱ्या (हरिनेत्रकृतालया) योगनिद्रेची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन योगनिद्रेने विष्णूस जागे केले आणि मग विष्णूने मधुकैटभांना ठार मारले.
मध्यम चरित हे प्रथम चरितापेक्षा मोठे असून त्यामध्ये एकून तीन अध्याय (अध्याय २ ते ४) आहेत. महिष नावाच्या असुराच्या छत्राखील एकजूट झालेल्या असुरांनी देवतांशी शंभर वष्रे युद्ध करून देवतांचा दारूण पराभव केला आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले. पदच्युत झालेल्या देवांची पदे असुरांनी आपल्याकडेच घेतली. त्यांचा राजा अर्थातच महिषासुर होता. सर्व देवतांनी विष्णू आणि शिवाकडे धाव घेऊन कोसळलेल्या संकटाविषयी त्यांना सांगितले. विष्णू आणि शिव सर्व हकिगत ऐकून रागावले असता त्यांच्या मुखातून महान तेज बाहेर पडले आणि त्यामध्ये इतरही देवतांच्या तेजाची भर पडली. त्यातून एका स्त्रीची आकृती साकार झाली. तिला या सर्व देवतांनी वस्त्रालंकार, विविध आभूषणे आणि आपापली आयुधे दिली आणि युद्धाकरिता सज्ज केले.
दुसऱ्या अध्यायामध्ये पुढे देवीने असुरसन्याचा, त्यातील प्रमुख असुरांचा आणि महिषाचा सेनापती असलेल्या चिक्षुराचा नाश कसा केला याची कथा येते तर तिसऱ्यात तिने महिषाला कसे ठार मारले ते सांगितले आहे. देवीने केलेला महिषाचा वध ही प्राचीन भारतातील असंख्य शिल्पकारांनी ठिकठिकाणच्या मंदिरांवर शिल्पांकित केलेली सुप्रसिद्ध कथा आहे. महिषाने विविध रूपे घेऊन देवीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. अंतत: तिने महिष रूपात त्याला पकडून त्रिशूळाचा वार केला असता एक शेवटचा प्रयत्न म्हणून तो मनुष्यरूप धारण करतो. महिषमुखातून मनुष्यदेह घेऊन बाहेर पडू पाहणाऱ्या असुराचा देवी शिरच्छेद करते, असे देवीमाहात्म्य सांगते. चौथ्या अध्यायात देवांनी केलेली महिषमर्दनिीची स्तुती आहे. शेवटी देवी त्यांना असे आश्वासन देते की त्यांना आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा ती प्रकट होऊन असुरांविरुद्ध देवांना साहाय्य करेल.
देवीमाहात्म्याचे यापुढील सर्व अध्याय मिळून आकाराने सर्वात मोठे असलेले ‘उत्तम चरित’ बनते. उत्तम चरितातील मुख्य कथा जरी शुंभ आणि निशुंभ या जुळ्या असुरांच्या वधाची असली तरी त्या अनुषंगाने देवीने इतरही अनेक असुरांचा संहार केला होता, ती सर्व वर्णने येथे सविस्तर सांगितली आहेत.
उत्तम चरिताच्या प्रारंभी (अध्याय ५) शुंभ आणि निशुंभ या दोघांनी देवांवर मिळवलेल्या विजयाची आणि त्यांना स्वर्गातून पदच्युत केल्याची कथा येते. यापूर्वी देवीने दिलेल्या (असुरांच्या संहारासाठी प्रकट होऊन देवांना मदत करण्याच्या) आश्वासनाची आठवण काढून देव हिमालयात जातात आणि देवीची स्तुती करतात. या ठिकाणी देवांनी या विश्वामध्ये विविध रूपांत नांदणाऱ्या देवीच्या विविध स्वरूपांना ‘या देवी सर्वभूतेषु’ या शब्दांनी सुरू होणाऱ्या श्लोकांद्वारे नमन केले आहे. हे श्लोक सुप्रसिद्ध असून त्यांचे स्वतंत्रपणेही अनेकदा पठण केले जाते. देवांकडून स्तुती केली जात असता गंगेवर स्नानाकरिता आलेली पार्वती ही स्तुती ऐकून देवांना तुम्ही कोणाची स्तुती करता, असा प्रश्न करते. तेव्हाच तिच्या शरीरातून शिवा प्रकट होते आणि सांगते की हे देव माझीच स्तुती करत आहेत, मीच अंबिका आणि कौशिकी या नावांनी ओळखली जाते. पार्वतीच्या शरीरातून शिवेचे निर्गमन झाल्यावर पार्वती काळी पडते आणि काळ्या वर्णामुळे काली या नावाने संबोधली जाऊ लागते.
इकडे अत्यंत सुस्वरूप अशा अंबिकेच्या रूपाची महती चण्ड आणि मुण्ड या असुरांकरवी शुंभ आणि निशुंभ या असुरबंधूंच्या कानावर पडते. तिच्याशी लग्न करण्याच्या कामनेने शुंभ दूतास रवाना करतो, तो दूत अंबिकेला शुंभाचा निरोप पोहोचवतो. अंबिका मात्र उलट असा निरोप पाठवला की माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असणे ठीक आहे. परंतु माझी अशी प्रतिज्ञा आहे की जो मला युद्धात हरवेल, त्याच्याशीच मी लग्न करेन. त्यामुळे तुमच्या असुरराजालाही माझ्याशी युद्ध करूनच मला जिंकावे लागेल. त्यानंतरच ही इच्छा पूर्ण होऊ शकते.
सहाव्या अध्यायामध्ये दूताने अंबिकेचा निरोप कथन केल्यावर पुढे काय घडले त्याचे वर्णन येते. असा निरोप ऐकून शुंभ साहजिकच चिडतो आणि धूम्रलोचनाला ससन्य जाऊन देवीस पराभूत करून खेचून आणण्यास फर्मावतो. मात्र घडते उलटेच- देवी धूम्रलोचनाचेच भस्म करते आणि तिचे वाहन, सिंह, असुरसन्याचा नाश करतो. याने अधिक क्रोधित होऊन शुंभ चण्ड आणि मुण्ड या असुरांना पाठवतो. यावेळी काली त्या दोन्ही असुरांचा शिरच्छेद करते. देवीमाहात्म्य असे सांगते की कालीने चण्ड आणि मुण्ड या दोन असुरांना मारल्याने ती चामुण्डा या नावाने प्रसिद्ध झाली.
यानंतर सातव्या अध्यायामध्ये शुंभाने पाठवलेल्या महासन्याशी देवीने दिलेल्या लढय़ाचे विस्तृत वर्णन येते. अंबिका, तिचा सिंह आणि काली त्वेषाने असुरसन्याशी लढत असता, त्यांच्या मदतीस अन्य देवांच्या शक्ती धावून आल्या. हंसवाहक विमानात आसनस्थ असलेली ब्रह्माणी, बलावर बसलेली त्रिशूलधारिणी माहेश्वरी, मोरावर स्वार झालेली कौमारी, गरुडारूढ वैष्णवी, वराहस्वरूप धारण केलेली वाराही, नारीदेह व सिंहमुख असणारी नारसिंही आणि गजारूढ वज्रहस्ता ऐन्द्री या त्या सात शक्ती होत. त्याच वेळी अंबिकेच्या शरीरातून महाभयंकर अशी चण्डिका प्रकट झाली. तिने शिवास आपला दूत म्हणून शुंभ आणि निशुंभाची भेट घेऊन त्यांना ‘पराभव मान्य करून निमूटपणे पाताळात निघून जा’ असा निरोप देण्यास सांगितले. देवी शिवाला आपला दूत करते, याद्वारे ती शिवाहून श्रेष्ठ असल्याचे सूचित केले गेले आहे. या प्रसंगामुळे तिला शिवदूती (शिव जिचा दूत आहे अशी) हे नामाभिधान प्राप्त झाले. अर्थातच शिवाचे हे दौत्य वाया गेले, हे सांगायला नकोच. असुरांतर्फे रक्तबीज लढण्याकरिता आला, ज्याचे रक्त जमिनीवर सांडले असता प्रत्येक थेंबातून पुन:पुन्हा असंख्य रक्तबीज तयार होत होते. देवीने कालीस आज्ञा केली की तिने तिचा अक्राळविक्राळ जबडा वासून मारलेल्या प्रत्येक रक्तबीजाचे सर्व रक्त प्राशन करावे, जेणेकरून ते जमिनीवर पडणार नाही आणि नव्याने रक्तबीजांची निर्मिती होणार नाही. त्यानुसार रक्तबीजाचे सर्व रक्त प्राशन करून कालीने रक्तबीजासही हतवीर्य केले, आणि शेवटी अंबिकेकडून त्याचा नाश झाला.
निशुंभाने देवीवर केलेल्या स्वारीचे वर्णन नवव्या अध्यायात आहे. घनघोर युद्ध करून देवीने निशुंभाच्या हृदयावर शूलाघात केला असता त्यातून पुन्हा एक पुरुष प्रकट होतो, ज्याचा ती शिरच्छेद करते. दहाव्या अध्यायात निशुंभापाठोपाठ येणाऱ्या शुंभाशी देखील तिचे भयंकर युद्ध होते, जे केवळ पृथ्वीवरच नव्हे तर आकाशातही चालते. शेवटी देवी शुंभास जमिनीवर आपटते आणि तो उठला असता त्रिशूलाने ठार मारते. अकराव्या अध्यायामध्ये देवतांनी केलेली स्तुती आहे. या अध्यायाचे नाव नारायणीस्तुती असे आहे. या अध्यायाच्या अखेरीस देवीने देवांना पुन्हा आश्वस्त केले असून पुढे होऊ घातलेल्या आपल्या रक्तदन्तिका, शताक्षी, शाकम्भरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी अशा स्वरूपांविषयी काही भविष्यकथन केले आहे.
बाराव्या अध्यायात देवीने देवांना आपली पूजा कशा प्रकारे केली जावी, याविषयी मार्गदर्शन केले आहे. अर्थातच देवीमाहात्म्याचे श्रवण करणे हादेखील उपासनेचा एक श्रेष्ठ मार्ग असल्याचे देवीने सांगितले आहे. हा उपदेश जरी देवतांकरिता असला, तरी एका परीने तो मानवाकरिताच आहे, कारण देवीमाहात्म्याचं वर्णन केलेल्या पद्धतीने मनुष्यही तिची पूजा करू शकतात.
तेराव्या अध्यायात देवीच्या या सर्व चरितांची जोडणी पुन्हा मूळच्या कथाबंधाशी करण्यात आली आहे. मेधा मुनींद्वारे सांगितली गेलेली ही तीन चरिते ऐकून राजा आणि वैश्य देवीची मातीची मूर्ती बनवून तिची उपासना करतात. तीन वर्षांनंतर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन चण्डिका प्रकट होते आणि दोघांनाही वर देते. वैश्याला त्याचे ममत्व सुटून मोक्षगती प्राप्त होते. सुरथ राजाला त्याचे राज्य प्राप्त होते, परंतु देवी त्याला असे सांगते की पुढील कल्पांती तोच मनू म्हणून जन्म घेणार असून त्यावेळी तो सावर्णी या नावाने प्रसिद्ध होईल. आपल्याला विविध पुराणांमध्ये एकूण चौदा मनूंचे वर्णन सापडते. त्यांपकी सावर्णी हा आठवा मनू होय.
चण्डीपाठाची परंपरा
मार्कण्डेय पुराणातील हे १३ अध्यायांचे देवीमाहात्म्य एकूण ७०० श्लोकांचे असल्याने त्याला देवीसप्तशती अथवा दुर्गासप्तशती (आणि अनेकदा नुसतेच ‘सप्तशती’) म्हटले जाते. त्यामध्ये चण्डी अथवा चण्डिका या देवतेचे माहात्म्य असल्याने त्याला चण्डीपाठ असे संबोधून त्याचे पारायण करण्याची परंपरा आहे. केवळ शाक्त पंथीयांकरिताच नव्हे तर बहुतांश िहदूंकरिताही भगवद्गीतेप्रमाणेच अतिपूजनीय ठरलेला हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.
घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत, म्हणजेच नवरात्रीच्या काळात, देवीमाहात्म्याचे पठण करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये असते. मात्र देवीमाहात्म्य वाचण्याच्याही काही पारंपरिक पद्धती आहेत. संपूर्ण सप्तशतीचा पाठ करण्याऐवजी स्वतंत्र चरिते विशिष्ट पद्धतीने वाचली जातात. एकच चरित वाचावयाचे झाल्यास मध्यम चरित (महिषासुरवधाची कथा सांगणारे अध्याय २ ते ४) वाचावे. दोन चरिते वाचावयाची असल्यास प्रथम आणि मध्यम ही चरिते वाचता येतात. अन्यथा तीनही चरिते (संपूर्ण सप्तशती) वाचावी लागतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर प्रथम अथवा उत्तम चरित स्वतंत्रपणे वाचू नये, अशी परंपरा आहे. तसेच उत्तम चरित वाचण्याकरिता प्रथम आणि मध्यम ही दोन्ही वाचली जाणे गरजेचे आहे. प्रथम चरिताची देवता महाकाली असून ऐं हे तिचे बीज आहे. मध्यम चरिताची देवता महालक्ष्मी असून ह्रीं हे तिचे बीज आहे. तसेच उत्तम चरिताची देवता महासरस्वती असून तिचे बीज क्लीं असे आहे. सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी आणि अंती त्या त्या देवतेच्या बीजाचा उच्चार केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक चरिताच्या प्रारंभी त्या त्या देवतेचे ध्यान दिलेले आहे.
या ग्रंथाचा तंत्रमार्गानुसार सविस्तर पाठ करण्याकरिता मात्र केवळ सप्तशती म्हटली जात नाही तर त्यापूर्वी आणि नंतर इतरही अनेक सूक्ते / स्तोत्रे विधिवत म्हणणे अपेक्षित असते. तांत्रिक पद्धतीनुसार सप्तशती यंत्राची स्थापना करून प्रथम त्याची पूजा करावी लागते. चण्डीकवच, अर्गलास्तोत्र आणि कीलकस्तोत्र यांचा पाठ केला जातो. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीनही देवतांशी संबंधित असणारा आणि त्या देवतांच्या बीजांनी युक्त असा ‘ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे’ हा नवार्णव मंत्र म्हणून सुविख्यात असणारा मंत्र जपला जातो. वैदिक आणि पौराणिक परंपरेतील रात्रिसूक्तांचे पठण केले जाते. या विधींनंतर मग देवीसप्तशतीचा पाठ केला जातो. यानंतर वैदिक आणि तांत्रिक देवीसूक्त, प्राधानिकरहस्य, वैकृतिकरहस्य आणि मूíतरहस्य अशी तीन स्तोत्रे म्हटली जातात. त्यानंतर काही उत्तरविधी करून पूजेचे समापन होते. देवीपूजनामध्ये समाविष्ट असणारी कुञ्जिकास्तोत्र, देवीक्षमापनस्तोत्र आणि दुर्गापदुद्धारस्तोत्र हीदेखील महत्त्वाची स्तोत्रे आहेत.
देवीची उपासना करण्याचा एक प्रकार म्हणजे देवीसप्तशतीमधील श्लोकांचा वापर करून होम करणे हा होय. होमाकरिता किती वेळा पाठ केला जाणार, त्यावर नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी इत्यादी प्रकारचे उत्तरोत्तर मोठे होत जाणारे होम करता येतात. त्यांच्यासाठीही वेगळा विधी आचरावा लागतो.
सप्तशतीमधील मंत्र
देवीमाहात्म्यात म्हणजे सप्तशतीमध्ये एकूण ७०० श्लोक आहेत, हे आपण वर पाहिले. देवीभक्तांमध्ये या ग्रंथातील हरएक श्लोकात मंत्रत्व असल्याची मान्यता आहे. सप्तशतीमधील ठरावीक श्लोकाचा विशिष्ट कार्याकरिता जप केला असता ते ते कार्य सिद्धीस जाते असे देवीभक्त मानतात. उदाहरणार्थ ज्ञानिनामपि.. (१.५५) हा श्लोक वशीकरणासाठी;  शब्दात्मिका सुविमल.. (४.१०) हा श्लोक सुखप्राप्तीसाठी; मेधासि देवि विदिता.. (४.११) हा श्लोक वाक्सिद्धीसाठी; दुग्रे स्मृता हरसि.. (४.१७) हा श्लोक दारिद्रय़निवारणासाठी; शूलेन पाहि नो देवि.. (४.२४) हा श्लोक अपमृत्युनाशार्थ; करोतु सा न: शुभहेतु.. (५.८१) हा श्लोक सर्वकामनापूíतकरिता; यस्माच्चण्डं च मुण्डं च.. (७७.२७) हा श्लोक देवीच्या कृपाप्राप्तीकरिता; देवी शूलेन वज्रेण.. (८.६०-६१) हे दोन श्लोक शत्रुनाशार्थ; देवि प्रपन्नाíतहरे प्रसीद.. (११.३) हा श्लोक मनीषापूर्तीसाठी; त्वं वैष्णवीशक्ति.. (११.५) हा श्लोक संमोहनारकरिता; विद्या समस्ता तव.. (११.६) हा श्लोक विद्याप्राप्तीसाठी; सर्वमंगलमांगल्ये.. (११.१०) हा श्लोक अभीष्टसिद्धीसाठी, हिनस्ति दैत्यतेजांसि.. (११.२७) हा श्लोक बालग्रहशांतीकरिता; रोगानशेषान्.. (११.२९) हा श्लोक रोगनाशासाठी; उपसर्गा: शमं यान्ति.. (१२.१७) हा श्लोक दु:स्वप्नपीडानाशासाठी आणि स्तुता संपूजिता.. (१२.४१) हा श्लोक पुत्रप्राप्तीसाठी वापरता येतो.
या परंपरेचा विचार करता एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे मूळ देवीमाहात्म्यामध्ये उपरोक्त श्लोक काहीशा वेगळ्या संदर्भामध्ये आले असतील, तरी ते स्वतंत्रपणे काढून, सुटे सुटे घेऊन वाचल्यास त्यांच्यामधून जो अर्थ निष्पन्न होईल, त्यानुसार त्या त्या श्लोकांचे फल सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, आपण पूर्वी पाहिलेल्या ‘ज्ञानिनामपि चेतांसि’ या श्लोकामध्ये महामायेच्या मोहशक्तीची जाणीव करून देण्यात आली आहे, आणि असे सांगितले आहे की ज्ञानीजनांच्या चित्तासही ती मोहात पाडू शकते. या श्लोकाचा उपयोगही परंपरेने वशीकरणासाठी सांगितला आहे, ज्यामध्ये चित्त मोहून घेणेच अभिप्रेत असते. ‘दुग्रे स्मृता हरसि’ या श्लोकाच्या उत्तरार्धात दारिद्रय़दु:खभयहारिणी का त्वदन्या (दारिद्रय़, दु:ख आणि भयाचे हरण करणारे तुझ्याहून अन्य कोण आहे?) असे देवीस उद्देशून म्हटले आहे, आणि त्याचा विनियोगही दरिद्रता जाऊन धनप्राप्ती व्हावी याकरिता करावा असे परंपरा सांगते. तसेच ‘सर्वमंगलमांगल्ये’ या श्लोकातच देवीला सर्वार्थसाधिका म्हणून संबोधले आहे आणि परंपरेने त्याचा विनियोगही अभीष्टसिद्धिकरिता सांगितला आहे. थोडक्यात परंपरेने सुचविलेले सप्तशतीमधील मंत्रात्मक श्लोकांचे विनियोग अन्वर्थक असेच आहेत.
देवीमाहात्म्याच्या आवृत्ती
मार्कण्डेय पुराणातील मूळ संस्कृत देवीमाहात्म्य हे अनेक प्रकाशनांतर्फे प्रकाशित करण्यात आले असून ते बाजारात सहज उपलब्ध होते. वर्णेकरकृत देवीमाहात्म्याची आवृत्ती जुनी, परंतु विधिविधानांची आणि मंत्रांची सविस्तर माहिती देणारी आहे. सार्थसप्तशती नावाचा ग्रंथ उत्तमश्लोक नामक देवीभक्ताने लिहिला असून त्यामध्ये प्रत्येक अध्यायातील कथेचे प्रसंगोचित वर्णन आणि आध्यात्मिक मार्गाचे निरूपण केलेले आहे. मूळ संस्कृत देवीमाहात्म्याप्रमाणेच या ग्रंथाचे वाचनही करण्याची पद्धत आहे.

गांधी जी ने गिनाए , सात सामाजिक पाप

- अरविन्द सीसोदिया
वर्तमान भारतीय राजनीति का मूल स्त्रोत स्वतंत्रता के आन्दोलन के दौरान उपजा कांग्रेस नामक दल ही बना जो आज तमाम सिद्धांतों  और नैतिकताओं को छोड़ चुका है और उसी के प्रभाव से भारत की तमाम राजनीति भी दूषित हुई..! सामाजिक न्याय के रास्ते में जो अनैतिक्तायें आती हैं , उन्हें गांधीजी ने सात सामाजिक पाप के नाम से समय रहते गिनाया था !  वे जो आज भी प्रासंगिक हैं जिनकी आज भी उपयोगिता है ..! नीचे उन्हें दिया जा रहा है ..! महात्मा गांधी ही पुन्य तिथि पर इनका अनुशरण भारतीय राजनीति करे तो यह बापू को सबसे बड़ी श्रधांजलि होगी !
मोहनदास करमचंद गांधी (2 अक्तूबर 1869 - 30 जनवरी1948) भारत एवं भारतीय स्वतंत्रता आंदोलन के एक प्रमुख राजनैतिक एवं आध्यात्मिक नेता थे।सत्‍य के मूल्‍यों की सार्थकता और अहिंसा को महात्‍मा गांधी द्वारा दशकों पहले आरंभ किया गया और ये मान्‍यताएं आज भी सत्‍य हैं। विभिन्‍न संस्‍कृतियों और धर्मों के आदर से हम एक दूसरे की बात सुनें, आपस में बोलें और सभी की प्रशंसा करें। एक अनोखी लोकतांत्रिक व्‍यवस्‍था वह है जहां प्रत्‍येक के लिए चिंता, प्रमुख रूप से निर्धनों, महिलाओं और वंचित वर्ग के समूहों, को आदर  पूर्वक  संबोधित किया जाए।
सत्‍याग्रह और अहिंसा की विचारधारा को वैश्विक समुदाय में भी उच्‍च प्रतिष्‍ठा प्राप्‍त है, इसलिए संयुक्‍त राष्‍ट्र में गांधी जी के जन्‍म दिवस, 2 अक्‍तूबर को 'अंतरराष्‍ट्रीय अहिंसा दिवस' के रूप में अपनाया है। इससे पता लगता है कि हमारे राष्‍ट्र पिता का यह संदेश समय की सीमाओं से परे आने वाले लंबे समय तक अनेक संस्‍कृतियों में मान्‍यता पाता रहेगा।महात्‍मा गांधी ने लोगों की स्थिति में सुधार लाने के लिए सत्‍याग्रह का उपयोग किया और वे इन क्षेत्रों में सामाजिक न्‍याय लाने के लिए निरंतर कार्य करते रहे जैसे सार्वत्रिक शिक्षा, महिलाओं के अधिकार, साम्‍प्रदायिक सौहार्द, निर्धनता का उन्‍मूलन, खादी के उपयोग को प्रोत्‍साहन आदि।
गांधी जी ने सात सामाजिक पाप गिनाए, जो इस प्रकार हैं :
१- सिद्धांतों के बिना राजनीति
२- परिश्रम के बिना संपत्ति
३- अंतरात्‍मा के बिना आनंद
४- चरित्र के बिना ज्ञान
५- नैतिकता के बिना वाणिज्‍य
६- मानवता के बिना विज्ञान
७- त्‍याग के बिना पूजा

19 मे

  .