सोमवार, १२ मे, २०२५

जे इतिहास विसरतात त्यांच्यावर इतिहासाच्या पुनरावृत्तीचे दुर्भाग्य ओढवते. 🙏... विंग कमांडर सुदर्शन यांच्या मुळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी.

 काश्मीर हे नक्की कोणाचे? याबद्दल अनेकांना कुतुहल व औत्स्युक्य वाटत असेल.

तर काश्मीर आहे काश्यप ऋषींचे. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपां पासुन. 'काश्यपः मीर' !

संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. काश्यप हे सद्य वैवस्वत मन्वंतरातील सप्तॠषींपैकी एक. काश्यप गोत्री लोक ही काश्यपांची संतती आहे.

प्रजापती दक्षांच्या तेरा कन्यांचा विवाह काश्यपांसोबत झाला होता. देवता, दानव, यक्ष व नाग हे सर्व काश्यपाचीच संतती आहेत.

मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते. भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे, हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी सतीला हे सरोवर आंदण दिले तेव्हापासुन या सरोवराला  'सतीसार' हे नाव पडले.

जलोद्भव नावाच्या दुष्ट दैत्याने या सरोवराचा आश्रय घेऊन परिसरातील लोकांना त्रस्त करून टाकले होते. परिसरातील लोकांनी काश्यप ऋषींना जलोद्भवाच्या क्रौर्याची व  आतंकाची माहिती देऊन त्यांना यातुन वाचवण्याची प्रार्थना केली. काश्यपांनी त्यांच्या नाग वंशीय 'अनंत नाग' नावाच्या मुलाला बोलावून जलोद्भवाचा आतंक संपवण्याची आज्ञा केली. त्यांनी सरोवरातील पाणी सोडुन देऊन सरोवर कोरडे करायचे व त्यामुळे उघड्यावर पडलेल्या जलोद्भव दैत्यास भगवान श्री विष्णूंच्या हातुन मारावयाची नीती आखली.

याच नीतीनुसार सरोवराच्या पश्चिमेला 'वराहमुख' (सध्याचे बारामुल्ला)  नावाची दरी (घाटी) खोदुन त्याद्वारे सरोवरातील सर्व जल सर्व बाजूंना जमिनीने वेढलेल्या सागरात वहावुन देण्यात आले. या सागराचे नाव होते 'काश्यप सागर' (सध्याचा कॅस्पियन सी). स्वतःचे जल संरक्षण नाहीसे झाल्याचे बघुन जलोद्भव दैत्य सरोवराबाहेर उघड्या मैदानात आला तेव्हा श्री विष्णूंनी त्याचा वध केला.

कोरड्या पडलेल्या या सरोवराच्या ठिकाणी मग वेद उपनिषद आदी शास्त्रांचे अध्ययन केंद्र विकसीत झाले. ज्या जागेत अशा अतिशय समृद्ध संस्कृतीचा उगम व विकास झाला त्या जागेवर वसलेल्या नगराचे नाव आहे 'श्रीनगर'. काश्यपांच्या 'अनंत नाग' नावाच्या मुलाने श्रीनगरच्या बाजूलाच अजून एक शहर वसवले होते जिथे आज 'अनंतनाग' जिल्हाचे मुख्यालय आहे व त्या नगराचे नाव आजदेखील 'अनंतनाग'  आहे.

श्रीनगर हे लवकरच भरभराटीस व प्रसिद्धीस आले. देवी गौरी व गणेश हे नियमितपणे इथे येत असत. गौरींच्या येण्याचा मार्ग 'गौरी मार्ग' म्हणजेच आजचे 'गुलमर्ग' म्हणुन ओळखला जातो. कल्हणाने 'नीलमत पुराणाच्या' संदर्भाने लिहीलेला 'राजतरंगिणी' हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा प्रमाणग्रंथ मानला जातो. जगभरातील विद्वान काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी याच ग्रंथाचा संदर्भासाठी वापर करतात.

ब्रिटीश पुरातत्ववादी एम् ए स्टेन यानी राजतरंगिणीचा तीन खंडांमध्ये सरळ आंग्ल अनुवाद केला आहे.

काश्मीर नक्की आहे तरी कोणाचे?

काश्मीर हे काश्मीरची अधिष्ठात्री देवी, देवी शारदेचे आहे.
"नमस्ते शारदा देवी, काश्मीरपूरवासिनी,
त्वमहे प्रार्थये नित्यम् विद्यादानीच देहिमे".

शारदादेवीला काश्मीरपुरवासिनी म्हटले आहे. काश्मीरी भाषेच्या लिपीला 'शारदा' म्हटले जात असे व काश्मीरातील अध्ययनाच्या अनेक केंद्राना 'शारदा पीठ' म्हणत असत. संपूर्ण काश्मीरलाच कधी काळी 'शारद देश' म्हणुन ओळखला जायचा.

आठव्या शतकात आद्य शंकराचार्य काश्मीरला आले तेव्हा काश्मीर हे शैव  संप्रदायाचे प्रमुख केंद्र होते. गोपालाद्री पर्वत शिखरावरच आद्य शंकराचार्यांनी शिव व शक्तीच्या एकरूपतेचे वर्णन करणाऱ्या 'सौंदर्य लहरी' ची रचना केली. त्या टेकडीलाच आज 'शंकराचार्य टेकडी' म्हणुन ओळखले जाते.

सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या कृष्णगंगा नदी काठी असलेल्या शारदा मंदिराचे सौंदर्य बघुन शंकराचार्यांना तुंगा नदीच्या तीरावर वसलेल्या शृंगेरी येथे तसेच मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली.

शृंगेरीच्या मंदिरातील शारदेची चंदनाची मुळ काष्ठमूर्ती (विग्रह) काश्मीरमधुनच आणण्यात आली आहे.
 
आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसहित काश्मीरात फिरत असताना एक प्रसंग घडला. एका काश्मीरी पंडित जोडप्यानी शंकराचार्यांना काही दिवसांसाठी त्यांचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना केली.

शंकराचार्यांनी त्यांची प्रार्थना मान्य करण्यापूर्वी ते व त्यांचा शिष्य परिवार स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खातील ही अट घातली. ही अट ऐकून त्या जोडप्याला त्यांच्या आदरातिथ्याबद्दल शंका घेतल्यासारखे वाटले परंतू त्यांनी ही अट मान्य केली. सायंकाळी पाकसिद्धीसाठी आवश्यक तो शिधा व इंधनादी देऊन यजमान दाम्पत्य निद्रीस्त झालं. परंतू या सर्वांसोबत ते अग्नी प्रज्वलित करण्यासाठी काही सामान द्यायचे विसरले होते. शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना यजमानांना त्रास देण्याची मनाई केली व त्या रात्री ते काहीही न खाताच झोपलेत.

दुसऱ्या दिवशी शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.

शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.

रामानुजाचार्यांनी अकराव्या शतकात काश्मीरला भेट दिली. केवळ काश्मीरातच उपलब्ध असलेल्या 'ब्रह्मसुत्रां'चा अभ्यास करून 'श्रीभाष्य' लिहीले. रामानुजांना तो ग्रंथ ग्रंथालयात केवळ  वाचण्यासाठी बघण्याची अनुमती मिळाली होती. तिथे कोणतीही टिपण काढण्याची त्यांना अनुमती नव्हती.

रामानुजार्य व त्यांचे शिष्य कुरूत्थलवर प्रतिदिनी ग्रंथालयात जाऊन अक्षर अन् अक्षर पाठ करून घेत. शारदापीठात परतल्यावर सगळे पाठांतर आठवून त्यांनी ग्रंथरचना केली. असे तीन महिने त्यांनी पाठांतर करून व आठवुन 'श्रीभाष्य' ग्रंथ पूर्ण केला. हाच 'श्रीवैष्णवां'चा आद्यग्रंथ आहे.

काश्मीरची अधिष्ठात्री विद्येची देवी श्री शारदा प्रसन्न होवून रामानुजांसमोर प्रकटली व तिने त्यांना हयग्रीवाचे शिल्प आशीर्वाद म्हणुन दिले.

काश्मीर आहे तरी कोणाचे?

तर काश्मीर आहे भट्ट पंडित व विद्वानांचे.

नीलमत पुराणानुसार काश्मीरला 5100 वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. काश्मीरची सगळी लोकसंख्या हिंदू व बौद्ध होती.

जगभर इस्लामी आक्रमक एक एक प्रदेश पादाक्रांत करत असताना लोहाणा वंशाच्या शूर राजांनी भारताच्या पश्चिमी सीमांचे त्यांच्या आक्रमणापासुन यशस्वी संरक्षण केले होते. हे लोहाणा प्रभू रामांचे पुत्र राजा लव यांच्या सैन्यातील खड्गवीर होते. आजचे लाहोर हे रामायण काळातील 'लवपुरी' होते.

जे इतिहास विसरतात त्यांच्यावर  इतिहासाच्या पुनरावृत्तीचे दुर्भाग्य ओढवते.

🙏... विंग कमांडर सुदर्शन

यांच्या मुळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद - श्रीपाद जोशी.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
जास्ती अपेक्षा ठेवणं चुकतंय

 या विषयातले जाणकार लोक खाजगीत एक मस्त योजना सांगायचे पूर्वी, आणि आता आता पॉडकास्ट्स मध्ये व्यक्त होतायत ठामपणे.

 त्यांच्या म्हणण्यानुसार, आहे या परिस्थितीत पाकिस्तानी पंजाब प्रांत इतक्यात तरी घ्यायचा नाही. भारत-पाक युद्ध होईल तेव्हा आपल्या थेट किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेपातून बलुचिस्तान आणि सिंध प्रांत स्वतंत्र होतील. खैबर पख्तून्ख्वा हा प्रांत एकतर स्वतंत्र होईल किंवा अफगाणिस्तानाला जोडला जाईल. आणि पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तान ह्यांना भारतात घेतले जाईल नाहीतर पाकिस्तानकडे तातपुरते तसेच राहू दिले जाईल. चिंधी पाकिस्तान कडे तेव्हा नेमकं असेल काय? तर फक्त पाकिस्तानी पंजाब नावाची फाटकी लंगोट. आणि ती फाटकी लंगोट मुद्दाम तशीच पाकिस्तानच्या ताब्यात ठेवली जाईल. पाकिस्तान अर्थात पाकी पंजाब हा देश तेव्हा लँडलॉक्ड देश होईल आणि आज ज्या सिंध …
👌👍🚩

रविवार, ११ मे, २०२५

प्रत्येक समाजाची खरी कसोटी ही तिथल्या सर्वात दुर्बल घटकांशी तो कसा वागतो यावरून होते

*गंभीर मनोवृत्तीने विचार करता…*

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळेत आयोजित एका समारंभात, एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक भावनिक भाषण दिलं — जे ऐकणाऱ्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलं.

शाळेचं व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केल्यानंतर त्या वडिलांनी विचार मांडला :
"जेव्हा निसर्गाच्या प्रवाहात बाहेरून कोणतीही ढवळाढवळ होत नाही, तेव्हा निसर्गाची व्यवस्था पूर्णत्वाकडे झुकते."
"पण माझा मुलगा, हर्बर्ट, इतर मुलांप्रमाणे शिकू शकत नाही. त्याला गोष्टी समजत नाहीत. मग त्याच्या बाबतीत निसर्गाची व्यवस्था कुठे आहे?"

प्रश्न ऐकून सगळं सभागृह सुन्न झालं. वडील पुढे बोलू लागले:
"माझा विश्वास आहे की, हर्बर्टसारखा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम मूल जेव्हा या जगात येतो, तेव्हा आपल्याला मानवतेचं खरं रूप पाहण्याची संधी मिळते — कारण अशा मुलाला इतर लोक कसे वागवतात, त्यातून ती मानवता प्रकट होते."

त्यांनी एक प्रसंग सांगितला.
एकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, काही मुलं बेसबॉल खेळत होती.
हर्बर्टने वडिलांना विचारलं :
"बाबा, तू काय समजतोस? ते मला खेळायला देतील का?"

वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखा मूल आपल्या संघात नको असेल. पण त्यांना हेही जाणवले की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल.

वडील मुलांपैकी एकाकडे गेले आणि विचारलं,
"हर्बर्टला थोडं खेळता येईल का?"
त्या मुलाने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला,
"आम्ही सहा धावांनी मागे आहोत, आणि आठव्या इनिंगमध्ये खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात घ्या. नवव्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू."

हर्बर्ट हळूहळू स्मितहास्य करत बेंचकडे गेला, संघाचा जर्सी चढवला, आणि त्याचे वडील डोळ्यातून अश्रू वाहत पाहत होते.

हर्बर्टच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं प्रतिबिंब बाकी मुलांनीही पाहिलं — आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यातला अभिमानसुद्धा.

नवव्या इनिंगची सुरुवात झाली. हर्बर्टने हातमोजा घालून उजव्या फील्डमध्ये उभं राहत खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडे कुठलीही बॉल आली नाही, तरी तो फक्त खेळात असल्यानेच इतका आनंदी होता की चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होतं, आणि वडील प्रेक्षकांतून जल्लोष करत होते.

नवव्या इनिंगमध्ये संघाने काही धावा केल्या. आता, दोन बॅट्समन बाद, तिन्ही बेस भरलेले — आणि हर्बर्ट फलंदाजीसाठी तयार होता.

हा निर्णय — हर्बर्टला फलंदाजीची संधी देणं — जिंकायची संधी गमावणं होतं. तरीही त्याला ती संधी दिली गेली.

सर्वांना माहीत होतं की, हर्बर्टला बॅट नीट पकडता येत नाही, तर बॉल मारणं तर दूरची गोष्ट होती.
पण बॉलरला लक्षात आलं — समोरचं संघ हर्बर्टला आनंद देण्यासाठी जिंकण्याची संधी सोडत आहे.

त्याने बॉल अगदी हळू फेकला — जसा हर्बर्टला मारता येईल असा.
पहिल्या प्रयत्नात हर्बर्टने मारण्याचा प्रयत्न केला, पण चुकला.
दुसऱ्यांदा, त्याने बॉल मारला — अगदी सौम्यपणे — आणि बॉल पिचरच्या पुढ्यात थांबला.

पिचरने सहज बॉल पकडून पहिल्या बेसवर फेकून हर्बर्टला आऊट करू शकत होतं. पण त्याने बॉल मुद्दामून पहिल्या बेसमनच्या डोक्यावरून उंच फेकून दिला.

सर्व प्रेक्षक ओरडू लागले:
"हर्बर्ट, पहिल्या बेसकडे धाव घे, धाव घे!"
हर्बर्ट धावत गेला — तो अंतर त्याने कधीच गाठलं नव्हतं.
"दुसऱ्या बेसकडे धाव घे!"

परत एक खेळाडू — सर्वात लहान मुलगा — बॉल पकडतो आणि जाणतो की तो ‘हिरो’ बनू शकतो. पण त्यालाही जाणवतं की हर्बर्टसाठी मोठं काहीतरी घडतंय. त्याने बॉल तिसऱ्या बेसमनच्या डोक्यावरून फेकला.

हर्बर्ट तिसऱ्या बेसवर पोहोचतो. पुढचे धावपटू होमप्लेटवर पोहोचतात.

सर्व मुलं आणि प्रेक्षक ओरडतात :
"होमप्लेटकडे धाव घे!"

हर्बर्ट धावत जाऊन होमप्लेटवर पोहोचतो — हात वर करून उभा राहतो — विजयी हसत. त्याचे वडील त्याचं कौतुक करत उभे असतात.
आणि तेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू त्याला मिठी मारतात — जणू त्यानेच ‘ग्रँड स्लॅम’ मारून सामना जिंकवला!

त्या दिवशी, वडील म्हणाले, डोळ्यातून अश्रू ढाळत —
"या मुलांनी मिळून खऱ्या प्रेमाचं आणि मानवतेचं एक अद्वितीय उदाहरण जगापुढे ठेवलं."

हर्बर्ट पुढचा उन्हाळा पाहू शकला नाही. त्या हिवाळ्यात तो गेला. पण त्याच्या मनात मात्र एकच गोष्ट कायम राहिली — तो एकदा ‘हिरो’ झाला होता.
आईने त्याला आनंदाश्रूंत मिठी मारली होती — आणि त्याच्या वडिलांचं हसतमुख चेहरा त्याला आयुष्यभर पुरेसं होतं.


---

एक छोटंसं शेवटचं सांगणं:
आपण दररोज शेकडो विनोदी मेसेज एकमेकांना पाठवतो. पण जेव्हा आयुष्याचं खरं सौंदर्य सांगणारे, प्रेम आणि माणुसकी शिकवणारे संदेश येतात — ते पुढे पाठवताना आपण थोडं थबकतो.

तुम्ही जर हा मेसेज कोणाला पाठवायचा का, याचा विचार करत असाल — तर ज्या व्यक्तीने तुम्हाला तो पाठवला, त्याला विश्वास आहे की आपल्यामध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून तुमच्या प्रत्येक संपर्कात असलेली व्यक्ती हे ऐकण्याच्या योग्यतेची आहे.

कोणीतरी एक शहाणा माणूस म्हणाला होता:
"प्रत्येक समाजाची खरी कसोटी ही तिथल्या सर्वात दुर्बल घटकांशी तो कसा वागतो यावरून होते."

11 मे तंत्रज्ञान दिवस

तंत्रज्ञान दिनविशेष - साभार - सृष्टिज्ञान मासिक

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

११ मे १९९८ रोजी पोखरण (राजस्थान) येथे पहिली पूर्णतः 'भारतीय' असणारी अणुचाचणी भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली. ही भारताच्या विज्ञान आणि विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे दिग्दर्शित करणारी एक महत्वपूर्ण घटना होती. तिचे स्मरण म्हणून ११ मे हा दिवस 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. - शर्वरी कुलकर्णी

आधुनिक मानवासाठी तंत्रज्ञान हे एक मूलभूत अंग बनत चालले आहे. मानवी जीवन सुलभ आणि वेगवान करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक ठरली आहे. निसर्गात घडणाऱ्या घटनांची सुसूत्रतेने नोंद घेऊन त्यांचा आपल्या जीवनाच्या सुलभतेसाठी वापर करण्यात मानवाने खूप मोठी झेप घेतलेली आहे. एका ठिणगीपासून उत्पन्न झालेल्या आगीचा स्वसंरक्षणासाठी किंवा अन्नपदार्थ बनविण्यासाठी मानवाने केलेला वापर यापासून सुरुवात झालेली ही परंपरा आज अगदी आपल्या आकाशगंगेच्या पलीकडे असणाऱ्या घटनांचा वेध घेण्यापर्यन्त पोहोचलेली आहे.



माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, औद्योगिक ऑटोमेशन, वैद्यकीय उपकरणे, अंतराळ संशोधन, जैवतंत्रज्ञान इ. क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाने क्रांती घडवली आहे. काही दशकांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तंत्रज्ञानाने सहज साध्य झालेल्या आहेत. उदा. मागील काही दशकांमध्ये घडलेली डिजिटल क्रांती ही याचे ठळक

उदाहरण आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जग अगदी एका क्लिकद्वारे संपर्कात आले आहे. शिक्षण, व्यापार, आरोग्य सेवा, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांत डिजिटल पद्धतीने व्यवहार होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि यंत्रमानव (Robotics) हे तर भविष्यातील तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ ठरणार आहेत.

आपल्या रोजच्या जगण्यात असे कोणतेही क्षेत्र उरले नाही जिथे तंत्रज्ञानाने आपला प्रभाव दाखवलेला नाही आणि त्याला मानवी मन देखील त्याला अपवाद नाही. भौतिक जीवन सुलभ होत असतानाच तंत्रज्ञानाने Intellectual Property rights, कायदे, समाजव्यवस्था, पर्यावरण या क्षेत्रांसमोर नवीन आव्हानं उभी केलेली

आहेत. एका क्लिकच्या माध्यमातून जग जवळ येत असतानाच अत्यंत विनाशकारी तंत्र आणि शस्त्र उपलब्धीमुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रश्न देखील आपलं अस्तित्व दाखवू लागले आहेत. अत्याधुनिक शस्त्रक्रिया विकसित होण्यासोबतच निसर्गाचा बिघडलेला तोल आरोग्यासमोर नवीन आव्हानं निर्माण करत आहे. अशा अंतर्गत विरोधाभासाच्या पार्श्वभूमीवर भारत यावर्षीचा तंत्रज्ञान दिवस' उद्याच्या शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान नवोन्मेष (Empowering a Sustainable Tomorrow Through Innovation ) ' अशी सकारात्मक थीम घेऊन साजरा करत आहे. शाश्वत विकासासाठी पूरक अशा उचित तंत्रज्ञान निर्मितीकरीता भारत विश्वाचा मार्गदर्शक बनो याकरिता विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व योद्ध्यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा!

(लेखिका रिसर्च स्कॉलर, भौतिकशास्त्र विभाग, बिट्स पिलानी, के के बिर्ला गोवा कॅम्पस, गोवा येथे कार्यरत आहेत)

मे २०२५ । सृष्टिज्ञान | २१
https://chat.whatsapp.com/Ed4IrKyz55N502uWjWGIBk

अहिल्यादेवी होळकर यांचे जलव्यवस्थापन - साभार - लेखक - पंकज भोसले - सृष्टीज्ञान

मराठ्यांच्या राजवटीत जलव्यवस्थापनासाठी एक मोठं योगदान देणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एक आदर्श प्रशासक व लोककल्याणकारी राजमाता म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. आपल्या समाजाच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर एक आदर्श व्यक्तिमत्वांपैकी सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या मानल्या जातात. पर्यावरण संवर्धन व जलव्यवस्थापनासाठी त्यांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे. - पंकज भोसले

मनुष्य जीवनात म अत्यंत मूलभूत गरज आहे, यासाठी मनुष्याने पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. मध्ययुगीन काळात जलव्यवस्थापन व जलसाठवणूक करण्याकडे विशेष लक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळते. पुरातन लेणी मधील खोदीव दगडांमधील पाण्याचे टाक हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. अनेक लेण्यांमधील या टाक्या लोकवर्गणीतून बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याबद्दलचे शिलालेख आजही तिथे आपण पाहू शकतो. पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी, पाण्याचे वितरण आणि वापराची योग्य योजना करणे आवश्यक असते हे सर्व बऱ्याच काळापासून भारतात चालत आले

पाणी ही

किआ हि

आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनेक गड किल्ल्यांच्या निर्मिती तेथील पाण्याचा साठ पाहून केली. शिवरायांनी केलेला एक उल्लेख म्हणजे "गडावर उदक पाहून गड बांधावा”. आजही अनेक किल्ल्यांवरील हेच पाण्याचे जिवंत स्त्रोत सर्व पर्यटकांची तहान भागवत

आहे. दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पाणी टंचाई भासणार नाही याची योग्य दक्षता घेतली जात असे. भारत हा एक शेतीप्रधान देश आहे आणि हि शेती नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. “शेतकरी सुखी तर प्रजा सुखी प्रजा सुखी तर राजा सुखी” याकरिता राजाने शेतीविषयक धोरणाकडे जास्ती लक्ष दिले पाहिजे जेणेकरून राज्याचा महसूल वाढत जाईल. छत्रपती शिवरायांनी याकरिता तळी, पाटबंधारे, तलाव बांधून प्रजेला पाण्याची योग्य व्यवस्था करून दिली.

मराठ्यांच्या राजवटीत जलव्यवस्थापनासाठी एक मोठं योगदान देणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एक आदर्श प्रशासक व लोककल्याणकारी राजमाता म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. आपल्या समाजाच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर एक आदर्श व्यक्तिमत्वांपैकी सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या मानल्या जातात. पर्यावरण संवर्धन व जलव्यवस्थापनासाठी त्यांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे. अहिल्यादेवी या मुळातच धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांच्या मुद्रेवर देखील 'श्री शंकर आज्ञेवरून' असे लिहिले असून त्यांच्या कारकिर्दीत अनेक शिवमंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला. नर्मदेच्या किनारी वसलेल्या महेश्वरच्या राजयोगीनीने अखंड भारतभर प्रत्येक भाविकाची तृषा भागवण्यासाठी ठिकठिकाणी तलाव, आड, विहिरी, बारव, कुंड बांधून पाण्याची सोय केली. नाशिक मधील रामकुंडाचा जिर्णोद्धार करण्याचा आदेश दिला अश्या प्रकारची पत्र उपलब्ध आहेत. सन १७८८ मधील

पत्रात राजश्री यशवंतराव गंगाधर गोसावी यांना उद्देशून त्या लिहितात “विशेष जनेस्थानी श्रीरामकुंड आहे

वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य स्वरूपाची आहे. सात टप्प्यात असणाऱ्या या बारवेला संरक्षक तटबंदी असून बारावीच्या चारी कोपऱ्यात दिवे लावण्यासाठी कोणाडे आणि माणसाना वस्त्र बदलण्यासाठीच्या खोल्या या आहेत. या बारावीच्या प्रत्येक बाजूस ५६ पायऱ्या असून पूर्वेच्या बाजूला एक महत्त्वाचा शिलालेख कोरलेला आहे. या लेखांमध्ये नमूद केलेल्या तिथीची इंग्रजी दिनांक ७ फेब्रुवारी १७७० येते, लेख पुढील प्रमाणे

त्याचा जिर्णोद्धार इकडून करावा हे मानस यास्तव हे पत्र तुम्हास लेखन केले”. आपल्या संस्कृतीचे पुनरुत्थान करण्यासाठी अग्रस्थानी असणाऱ्या राज्यकर्त्यां म्हणजे अहिल्यादेवी होळकर.

शैवपरंपरेत काशी तीर्थक्षेत्राचे मोठे महत्त्व आहे. औरंगजेबाच्या काळात काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडण्यात आले होते. त्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि काशी नगरीचा संपूर्ण कायापालट हा अहिल्यादेवींनी केला. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार देखील अहिल्यादेवींनी केला. त्याचबरोबर या घृष्णेश्वराच्या मंदिरा जवळच अर्धा किमी अंतरावर 'शिवतीर्थ' या नावाने प्रसिद्ध अशी बारव आहे त्या पवित्र बारवेचा जिर्णोद्धारही केला. ही बारव अत्यंत

श्री शके १६९१ विरोधी संवत्सरी माघ सुदी

नाग बुध दिनी होळकर कुलाल वा लकल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जिर्णोद्धार केला असे व विहिरी

श्रीरस्तु शिवम कल्प हिंदू धर्मशस्त्राप्रमाणे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत निर्माण करणे हे अत्यंत पुण्यप्रद आणि परोपकारी मानले गेले आहे. तलावाचे पाणी पिऊन प्रत्येक जीवप्राणी तृप्त होते, जो असे पाण्याचे स्त्रोत बांधतो त्याच्या सात कुळाचा उद्धार होतो धर्मकार्य करताना अहिल्यादेवींनी घृष्णेश्वरा सारख्या अनेक बारवा, विहिरी या वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या आहेत त्या मध्ये शंभू खांबे निमगाव (नाशिक), पिंपळस (नाशिक), साखरगाव (निफाड), ओझर (नगर), वाफगाव (पुणे), चांदवड येथील रंग महाल (नाशिक) यासारख्या ठिकाणी देखील अहिल्यादेवींनी बारवा व विहिरी बांधून पाण्याची सोय प्रेजेला करून दिली.

अश्याच प्रकारची वैशिष्ठ्यपूर्ण विहीर आपल्याला कसारा घाटात पाहायला मिळते. गोल घुमटाच्या आकाराच्या कसारा घाटातील ही विहीर जवळपास 35 फूट व्यासाची आहे. या विहिरीचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आपले लक्ष वेधून घेते. टोपली सारखे अच्छादन केलेली ही विहीर तेथील वसाहतीला थंडगार पाण्याचा एक उत्तम स्त्रोत आहे. या विशिष्ट रचनेमुळे विहीतील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि पाण्याचा स्तर उन्हाळ्यात देखील टिकून राहतो. डोंगराच्या वरच्या बाजूला चार वसाहती म्हणजे छोटी गावे आहेत या गावातील गावकरी याच पाण्याचा वापर करतात. जुन्या काळामध्ये कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूना या घाटामध्ये विश्रांती मिळावी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्ध वर्तुळाकार इग्लूच्या आकाराचे केलेले वैशिष्ठ्यपूर्ण दगडी बांधकाम हे अहिल्यादेवी यांच्या कालखंडात झाले आहे. विहीरी मध्ये कचरा अथवा जंगली प्राणी पडू नये याची खबरदारी म्हणून अश्या प्रकारचे बांधकाम केले आहे. कडक उन्हाळा असलेल्या भागात तेथील भौगोलिक रचनेचा अभ्यास करून अश्या प्रकारच्या विहिरी अहिल्यादेवी यांनी बांधल्या, हे पण एक आश्चर्यच आहे.

केदारनाथ इथे असलेलं कुंड जमिनीपासुन ३०० फूट उंच आहे. मुळात केदारनाथ सरख्या इतक्या उंचीवर, आजही खडतर प्रवास असलेल्या ठिकाणी बांधकाम साहित्य नेणं हेच किती जिकिरीचं काम, त्यात तिथे इतक्या उंच ठिकाणी भक्कम हौद बांधणं हे त्याहून अवघड काम अहिल्यादेवींनी उत्तम प्रकारे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यात्रेकरूंची स्नान संध्येची आणि दळणवळणाची तसेच तिर्थाटनाला जाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्यादेवींनी भारतातील अनेक पवित्र नद्यांवर घाट बांधले आहेत. बनारस मध्ये दशाश्वमेध घाट, महिलांसाठी विशेष असा मनकर्णिका घाट, अयोध्येमध्ये शरयू घाट, हरिद्वार मध्ये कुशावर्त घाट, मथुरा येथे कालिया देह घाट, प्रयाग व मंडलेश्वर येथे घाट बांधले. दंडिया येथे नर्मदा नदीवर घाट, चौंडी येथे बिना नदीवर घाट, पुणतांबे येथे गोदावरी नदीवर, कुरुक्षेत्र येथे संमत कुंडावर, लक्ष्मी कुंडावर घाट बांधले. अहिल्यादेवींनी सर्वात जास्त घाट हे महेश्वर येथे बांधले. त्यामध्ये अहिल्या घाट, राजराजेश्वर घाट, काशी विश्वेश्वर घाट, सांडबुवा घाट, गवळी घाट, भागीरथी साहेब घाट, सालुमा साहेब घाट, गंगादिन घाट, जमादार घाट, नायक घाट, लक्ष्मीबाई साहेब घाट, टिकाराम जमादार घाट, मातंगेश्वर घाट, मगर घाट, नरसिंग टेकरी घाट, कुंदेश्वर घाट, पंचपेढी घाट, चौथा भानू घाट, इत्यादी घाट बांधले. अहिल्यादेवींनी ही सर्व धर्म कृत्ये आपल्या खाजगी खजिन्यातून केली.

अहिल्यादेवींनी बांधलेल्या सर्व प्रकारच्या विहिरी, बारव, कुप महाराष्ट्रासह भारतभरात विविध ठिकाणी दिसतात. पायऱ्या असलेल्या विहिरी (स्टेपवेल) पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था म्हणून काम करत असत, वाहून जाणार्या पाण्याची साठवणूक करून ते पाणी भूजलात झिरपू देत असत, ज्यामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर तेथील नैसर्गिक स्त्रोतामुळे जिवंत ठेवण्यास मदत होत असे, त्यामुळे कोरड्या हंगामात देखील पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होत असे. पावसाचे पाणी साठवून, पायऱ्यांच्या विहिरींनी भूजल पातळी पुन्हा भरण्यास मदत केली, ज्यामुळे भविष्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा झाला. भौगोलिक रचनेचा उत्तम अभ्यास करून त्या रचनेला उपयुक्त असे बांधकाम अहिल्यादेवी यांच्या कार्यकाळात झालेले आपल्याला पाहायला मिळते. दुष्काळग्रस्त प्रदेशांमध्ये त्यांनी बांधलेल्या पायऱ्यांच्या विहिरी त्यांच्या व्यावहारिक जल व्यवस्थापनासाठी, स्थापत्य सौंदर्यासाठी आणि सांस्कृतिक उत्क्रांतीसाठी महत्त्वाच्या आहेत. कोरड्या विभागात त्यांनी विश्वासार्ह पाण्याचा स्रोत पुरवला, सामुदायिक एकत्र येण्याची ठिकाणे म्हणून काम केले आणि त्या काळातील समृद्ध स्थापत्य आणि कलात्मक परंपरांचे प्रतिबिंब पाडले.

( लेखक - इतिहास संशोधक, प्राचीन खेळांचे संकलक व त्याच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहेत.)

Join to our WhatsApp group 
https://chat.whatsapp.com/Ed4IrKyz55N502uWjWGIBk

19 मे

  .