रविवार, १८ ऑगस्ट, २०१३
राजकीय
you can find this story on- http://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-impose-pressure-on-cm-irrigation-scheme-vinod-tawde-176655/
Read it on Loksatta mobile app
शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३
मजा येईल एकदा वाचा
माणसाला सोडवता येणार नाही असा कुठलाच प्रश्न असत नाही असे जॉन केनेडी साहेब म्हणून गेले खरे, पण असे काही प्रश्न असतात की त्यांची उत्तरे सापडत, सुचत नाहीत.
- मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपर पेक्षा कमी का ?
- एशियाडमधला प्रवासी साध्या एसटीतल्या माणसाकडे अशा 'हुडूत' नजरेने का बघतो ?
- तांबडा सिग्नल पडलेला असताना आपल्या मागचा वाहनवाला हॉर्न का वाजवत असतो ?
- लहान बाळाशी बोलताना मोठी माणसे बोबडे का बोलतात ?
- उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाही ?
- बशीत ओतून चहा प्यायला तर येडाच आहे अशा नजरेने माणसे आपल्याकडे का पाहतात ?
- मीच म्हणून तुमच्याशी संसार केला अशी प्रत्येक बाई आपल्या नव-याला का म्हणते ?
- हॉटेलात इडली सांभारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची ?
- अज्ञानात सुख असते असे म्हणताना माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो ?
- कॉम्प्युटर बंद करण्यासाठी स्टार्टवर का क्लिक करावे लागते ?
- प्रत्येक साबण स्त्रियांचे सौंदर्य खुलवतो, मग आजूबाजूच्या सर्व स्त्रिया सुंदर का नाहीत ?
- दोन शेजारिणी खूप काम पडलयं असं म्हणत दारात उभं राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात ?
- जाहिरातीत दाढी केल्यावर गालावर हात फिरवायला बाईच का लागते ?
- अनुभवी डॉक्टर्सही प्रॅक्टीस का करतात ?
- आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतरांचा जन्म कोणासाठी झाला आहे ?
- बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतील बिल्डिंग का म्हणतात ?
- फ्री गिफ्ट म्हणजे काय ?
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३
मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३
सोमवार, १२ ऑगस्ट, २०१३
रविवार, ११ ऑगस्ट, २०१३
खरे लक्ष्मीपूजन
एखाद्या देशाची प्रगती जर मोजायची झाली तर फक्त त्या देशाचे आर्थिक - औद्योगिक वा संरक्षण क्षेत्रातील काम पाहता उपयोगाचे नाही. त्या देशात शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा, जन्म-मृत्यू दर, व्यावसायिक संधी यांचे प्रमाण टक्केवारी पाहून मगच तो देश प्रगत म्हणावा वा नाही हे ठरविले जाऊ शकते. भारतात सध्या प्रगतीची घोडदौड चालू आहे असे म्हटले जाते. परंतु हे चित्र कितपत खरे व किती फसवे हे पाहावयास गेले तर स्तंभित करणारे वास्तव सामोरे येते.
गेली अनेक शतके, सहस्त्रके भारतात परंपरेनुसार दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. कोट्यवधी भारतीय लोक दीपावलीला दिव्यांची आरास करून मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात लक्ष्मीची पूजा करतात. वर्षात इतर सणावारांना दुर्गा देवी, सरस्वती यांचीही पूजा होते. ज्ञान, समृद्धी, स्थैर्य व वीरतेची ही पूजा असते. स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज भारतात रूढ आहे. परंतु हे सर्व करताना घरातील व समाजातील स्त्रीला मिळणारी दुय्यम दर्जाची विपरीत वागणूक हे विरोधी चित्र भारतात ठायीठायी दिसते.
जगात लिंगभेद हा नवा नाही. गेली अनेक शतके तो चांगला मुरलेला, रुजलेला असून त्याची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत याचा अंदाजच बांधणे कठीण आहे. रशिया असो वा मोरोक्को, चीन असो वा अमेरिका, भारत असो वा जपान.... जगाच्या कानाकोपर्यांत हा लिंगभेद त्या त्या समाजाचा व विचारसरणीचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे. नव्या संसाधनांनी, आचार-विचार-सुधारणा-तंत्रज्ञानाने त्या परिस्थितीत फरक पडायला हवा असे म्हटले तरी चित्र खरोखरी तितके चांगले अथवा आशादायी दिसत आहे का?
मुळात लिंगभेद ह्या शब्दाला बरेच पैलू व स्तर आहेत. स्त्री व पुरुष यांच्यात फरक करणे व तो फरक जोपासणे म्हणजे लिंगभेद इतके ते साधेसुधे उरलेले नाही. या फरक करण्याच्या मनोवृत्तीचे पडसाद कसे, कोणत्या पद्धतीने दिसून येतात यांचा हा थोडक्यात धांडोळा :
१. जन्मण्याचा हक्क : स्त्रियांना अनेकदा जन्मण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. सध्या भारतातील स्त्री:पुरुष टक्केवारी पाहिली तर किती स्त्रियांची भ्रूणावस्थेतच नामोनिशाण मिटवले जाते याची कल्पना येईल. मात्र हे चित्र फक्त भारतापुरतेच नव्हे तर जगातील अनेक देशांसाठी लागू आहे. स्त्री गर्भ राहू नये यासाठीचे उपाय, स्त्री गर्भ राहिल्यास तो नष्ट करणे, स्त्री जन्माला आल्यास तिच्या गळ्याला नख लावणे यांचा यात समावेश होतो. आकडेवारी सांगते की, भारतात १ ते ५ वर्षाच्या वयातील किमान १ लाख ३२ हजार मुली दरवर्षी लिंगभेदाच्या कारणामुळे मृत्युमुखी पडतात. आज भारतात १००० पुरुषांमागे केवळ ९३३ स्त्रिया जन्म घेऊ शकतात.
२. मृत्यूचे प्रमाण : आफ्रिका व आशियातील अनेक देशांमध्ये स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. स्त्रियांना पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. तसेच कुपोषण, अपुरी वैद्यकीय मदत, स्त्रियांची हिंसा अशा कारणांमुळे आजही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडतात. मुलगी जन्माला आल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करणे, तिला सोडून देणे, मुलगी झाल्यावर आईला नैराश्याचे झटके येणे, तिने आत्महत्या करणे हेही प्रमाण जास्त दिसते. जगातील एकूण लापता किंवा हरविलेल्या महिलांमधील तब्बल ८० टक्के महिला या भारत व चीनमधील आहेत!!
३. मूलभूत सोयींचा अभाव : शिक्षणासारख्या अतिशय मूलभूत गोष्टीपासून वेगवेगळ्या कारणांमुळे आजही स्त्रियांना मुकावे लागते. आकडेवारीनुसार भारतात ७५ टक्के पुरुष तर फक्त ५४ टक्के स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळते. भारतासारख्या देशात मुली लहान वयातच धाकट्या भावंडांचे पालनपोषण, घरकाम, मोलमजुरी, दूरच्या ठिकाणाहून पाणी भरणे अशा कारणांमुळे शाळा व शिक्षणापासून पारख्या राहतात. शाळेत जायचे तरी शाळा लांब अंतरावर असणे, त्यासाठी चालत जायला लागणे, सुरक्षित वातावरणाचा अभाव, स्वच्छतागृहांची कमतरता, स्त्री शिक्षिकांची संख्या कमी असणे या कारणांशिवाय घरात मुलीला परकी, खालच्या दर्जाची वागणूक व तिच्या शिक्षणाबद्दलची उदासीनता या सर्व कारणांचा त्यात मोठा हात आहे.
४. सुसंधीची कमतरता : स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येणारा आणखी एक अडसर म्हणजे त्यांना अनेक क्षेत्रांमध्ये पुरेसा वाव न मिळणे, संधीचा अभाव असणे. तसेच प्राथमिक - माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध नसणे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज चमकत असल्या तरी त्या क्षेत्रात त्यांना पुरेशी संधी आहे का, तसे पूरक वातावरण आहे का याबद्दल पाहू गेल्यास आढळेल की त्या क्षेत्रात आजही त्यांना म्हणाव्या तितक्या संधी उपलब्ध नाहीत. किंवा बढतीला, त्या क्षेत्रातील उत्तमोत्तम सुसंधीना त्यांना वाव नाही. सैन्य, राजकारण, वाणिज्य - अर्थकारण, खेळ इत्यादी अनेक क्षेत्रात स्त्रिया आपला ठसा उमटवत असल्या तरी त्यांची संख्या तुरळक आहे.
५. व्यावसायिक स्तरावर लिंगभेद : नोकरी, बढती, व्यवसायाच्या क्षेत्रात सामोरा येणारा लिंगभेदही गंभीर स्वरूपाचा आहे. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी अपुर्या स्वच्छता सुविधा व मूलभूत सुविधा, त्याच दर्जाच्या कामाला /पदाला इतर पुरुष सहकार्यांपेक्षा कमी पगार, बढतीच्या संधी नाकारल्या जाणे, शोषण, निम्नस्तरीय वागणूक, चारित्र्यहनन यांसारख्या गोष्टी अर्थार्जन करणार्या स्त्रियांना सहन कराव्या लागतात.
६. मालकी हक्काबाबत असमानता : स्त्रियांच्या नावे जमीन-जुमला, घर, इस्टेट करण्याची तयारी नसल्यामुळे, त्यांचा हक्क डावलण्याच्या प्रथेमुळे आजही स्त्रियांच्या नावे केलेल्या, त्यांच्या मालकीच्या इस्टेटी, जमिनी, घरे, उद्योग-व्यवसाय कमीच दिसून येतात. त्याचा परिणाम असा होतो की वाणिज्य क्षेत्रात, व्यापार-उदीम, आर्थिक घडामोडींच्या क्षेत्रात स्त्रीचा आवाजच दबला जातो. पुरुषाला (केवळ तो पुरुष लिंगाचा असल्यामुळे) मिळालेले मालकी हक्क स्त्रीला न मिळाल्यामुळे ती या क्षेत्रात व पर्यायाने सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात कमी पडते. तिथे तिच्या अस्तित्वाचा ठसा उमटवण्यास तिला अडचणी येतात.
७. घरातील लिंगभेद : स्त्रियांना घरात निम्न दर्जाची वागणूक, त्यांचे आरोग्य - पोषण यांकडे दुर्लक्ष, शारीरिक - भावनिक - मानसिक शोषण, घरातील स्त्रीच्या एकटीच्या वाट्याला घरकाम - अर्थार्जन - मुलांचे पालन-पोषण यांची संमिश्र जबाबदारी यातूनही पूर्वापार चालत आलेला लिंगभेद सामोरा येतो. मुली जन्मल्यावर त्याबद्दल शोक करणे, घरातील स्त्रिया- मुलींना घराच्या चार भिंतींत ठेवणे, त्यांना संकोची-लाजाळू बनण्यास प्रवृत्त करणे, त्यांच्या आरोग्य, शारीरिक समर्थतेकडे दुर्लक्ष, घरातील मुलांना चांगल्या दर्जाचे अन्न देणे, मुलींना शिळे - उरलेले अन्न देणे, मुलांना अगोदर जेवायला देणे, मुलींना सर्वात शेवटी जेवायला देणे, मुलाच्या आजारपणात वैद्यकीय उपचार - औषधपाणी करणे, मुलीचे आजारपण घरगुती उपायांनी धकवून नेणे अशा अनेक तर्हांनी हा लिंगभेद आढळतो.
प्रथा-परंपरांचे हे वळसे इतके जबरदस्त असतात की स्त्रियाही अनेकदा या स्त्री-विरोधी वागणुकीचे समर्थन करताना दिसून येतात. पर्यायाने कुपोषित राहिलेल्या किंवा नाजूक तब्येतीच्या स्त्रिया/ मुली गर्भार अवस्थेत/ बाळंतपणानंतर येणार्या आजारांना बळी पडू शकतात. माता जर कुपोषित असतील तर अर्भकांचे जन्मतः वजनही कमी असू शकते, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते, ती लवकर आजारी पडू शकतात, त्यांच्या अवयवांची वा मेंदूची वाढ खुंटलेली असू शकते व त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो.
स्त्रियांप्रती हिंसाचार, कौटुंबिक हिंसा हे प्रमाणही बर्याच मोठ्या प्रमाणात आढळते. इतके, की २००२ साली घेतलेल्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या राष्ट्रीय स्तरावरील एका सर्वेक्षणात ५६ टक्के स्त्रियांनी कौटुंबिक हिंसाचाराचे समर्थन केलेले आढळून आले! हुंडा, हुंड्यापायी छळ, हुंडाबळी हे प्रकारही समाजाच्या मानसिकतेत इतके घट्ट रुजले आहेत की त्यांची पाळेमुळे खणून त्यांना समूळ नष्ट करणे गरजेचे आहे.
भारतात कायदा, संविधान यांनी स्त्रीला समान दर्जा दिला आहे. तिचे हक्क अबाधित राहावेत, तिला वेळोवेळी सर्व सुविधा-सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहेत. परंतु या सर्व सोयी, तरतुदी प्रत्यक्षात उतरणेही तेवढेच गरजेचे आहे. आज संसदेत स्त्रियांसाठी ३३ टक्के आरक्षण असतानाही तिथे फक्त १० टक्केच स्त्रिया त्या जागा भरू शकल्या आहेत. स्त्रियांना स्वतःचे मूलभूत हक्क, अधिकार व जबाबदारी यांची जाणीव होणे हेही महत्त्वाचे आहे.
भारतातील सुशिक्षित समाजातही आजच्या घडीला एकट्या स्त्रियांना कर्जे नाकारली जातात. बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवणारी स्त्री जर घर सांभाळू शकत नसेल तर ती आजही अयशस्वी म्हणून मानली जाते. राजकीय स्तरावर पाहिले तर स्त्री राजकारण्यांनी केलेल्या चुकांचे जेवढे भांडवल केले जाते तेवढे पुरुष राजकारण्यांच्या त्याहीपेक्षा गंभीर चुकांचे केले जात नाही. स्त्रीची प्रतिमा म्हणजे फक्त पत्नी, माता व कन्या या भूमिकांमध्येच बंदिस्त राहते व तीच प्रतिमा प्रसारमाध्यमांतून वारंवार पुढे येत राहते आणि जनमानसांत ठसत जाते.
समाजातील स्त्रियांबद्दलची, स्त्री-जन्माबद्दलची विचारधारा, आकस बदलणे अत्यावश्यक आहे. स्त्रीबद्दलची परंपरागत साचेबद्ध कल्पना, तिचे स्थान दुय्यम ठेवण्याची पराकाष्ठा हे सर्व संपुष्टात आले पाहिजे. स्त्रियांना घरी, समाजात, धर्मात, राजकारणात व संस्कृतीत, सर्वत्र दुय्यम दर्जाची वागणूक देणे व त्यांना त्याच दृष्टिकोनातून बघणे थांबवले गेले पाहिजे. बाईने जात्याच शालीन, विनम्र, क्षमाशील, संकोची, तडजोडीस तयार वगैरे असले पाहिजे हाही मोठा गैरसमज आहे. तसेच बायका प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे वेळी कमकुवत ठरतात, कच खातात किंवा भावनिक होतात हा पूर्वग्रह दूर केला पाहिजे. अन्यथा केवळ दुर्गा- लक्ष्मी-सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून काहीही साध्य होणार नाही. घरातील स्त्रियांना समान वागणूक द्या. मुलगा व्हावा म्हणून व्रतवैकल्ये - नवस - उपासतापास करणार्या माता, नातू मिळाला नाही म्हणून सुनेचा छळ करणार्या सासवा भारतात कमी नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे. स्त्रीला शिकवा, तिला समान संधी द्या, तिचे आरोग्य - शिक्षण - स्वास्थ्य उत्तम राखण्याची काळजी घ्या, तिच्या खांद्याला खांदा लावून काम करा, घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तिची साथ द्या, घरी वा समाजात तिची हेटाळणी होईल असे वागू नका, तिला सन्मानाने जगू द्या....त्यातून होणारी प्रगती ही खरी प्रगती असेल.
स्त्रियांना जगात सक्षम होण्यास सर्वतोपरी साहाय्य करणे, स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक पुरुषप्रधान विचारसरणीत बदल घडवून आणणे, स्त्रियांना समान वागणूक देणे ही लक्ष्मीची खरीखुरी पूजा असेल.

समाप्त.
पसायदानातील प्रक्षिप्त ओवी
बहुतेक धर्मग्रंथांच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते. म्हणजे त्या ग्रंथाचे श्रवण केल्याने काय लाभ होतो ते लिहिलेले असते. 'दासबोधा'च्या प्ररंभीच त्याची फलश्रुती लिहिली आहे: "नासे अज्ञान, दु:ख,भ्रांती । शीघ्रचि होते ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फलश्रुती, इये ग्रंथीं।"
ज्ञानेश्वरीत अशी कसली फलश्रुती सांगितलेली नाही. ग्रंथसमाप्तीच्या वेळी ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाकडे कृपाप्रसाद मागतात, ते सर्वश्रुत पसायदान अनेकांना मुखोद्गत आहे. ते असे:
पसायदान हे एक अपूर्व आणि उदात्त असे मागणे आहे. 'आता विश्वात्मके देवे...' या ओवीपासून या दानयाचनेची उदात्तता ओवीगणिक वाढत जाते. ती 'किंबहुना सर्व सुखी' या सातव्या ओवीत परिसीमा गाठते. इथे किंबहुनाचा अर्थ 'याहून अधिक काही मागण्याचे कारणच उरले नाही' असा होतो. या ओवीनंतर आता सर्वात्मक देवाचे दानप्रसादवचन व्हावे हे क्रमप्राप्त वाटते. पण तसे न होता,
आणि ग्रंथोपजीविये॥ विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्टविजये। होवावे जी ॥८॥>>
ही ओवी येते आणि रसभंग होतो. पसायदानाचा अर्थ समजून घेत, ते लक्षपूर्वक ऐकताना ही आठवी ओवी मला नेहमी खटकते. त्रैलोक्यातील यच्चयावत सर्वजण सुखी व्हावेत असे दान मागितल्यावर आणखी काही मागायचे राहते का? सातव्या ओवीतील 'किंबहुना' शब्दावरून आता मागणे संपले असा अर्थ सुस्पष्टपणे प्रतीत होतो. यानंतर ग्रंथोपजीवी लोकांसाठी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे काही विशेष मागणी करतील हे संभवत नाही. 'किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिही लोकी' असे मागून झाल्यावर, "हां! आणखी एक राहिलेच. इथले ते ग्रंथोपजीवी (आहेत ना) त्यांना दृष्टादृष्ट भयावर विजय मिळावा हो!", असे ज्ञानेश्वर म्हणतील का? छे:! पसायदानातील ही ओवी प्रक्षिप्तच असली पाहिजे.
या ओवीची प्रक्षिप्तता दर्शविणारे कळीचे दोन शब्द पसायदानात आहेत.ते म्हणजे १)किंबहुना २) आठव्या ओवीतील आरंभीचा शब्द 'आणि'. 'किंबहुना' या संस्कृत शब्दाचा अर्थ ,'बहुना किम्?' यापेक्षा अधिकाचे काय प्रयोजन ? - म्हणजे याहून अधिक मागण्याचे काही कारणच उरले नाही असा होतो. म्हणजे तो तसा आहेच. किंबहुना शब्दावरून सातव्या ओवीत मागणे संपले हे स्पष्ट होते. तर आठव्या ओवीतील 'आणि' या आरंभीच्या शब्दावरून मूळ पसायदानात भर घातली जात आहे हे दिसते. ओवी क्र.२ ते ७ यांत अधिकाधिक व्यापक होत जाणारी जी सात दाने मागितली आहेत त्यांच्या पंक्तीत आठव्या ओवीतील संकुचित याचना विशोभित दिसते. ती सात दाने अशी:
या सर्व गोष्टींचा विचार करता - आणि ग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।दृष्टादृष्ट विजये । होवावे जी ॥८॥ - ही ओवी प्रक्षिप्त ठरते.
सोनोपंत दांडेकरांच्या सार्थ ज्ञानेश्वरीत या ओवीचा अर्थ असा दिला आहे:--
"आणि या मृत्युलोकात विशेंषेकरून हा ग्रंथच ज्यांचे जीवन होऊन रहिला असेल, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे."
साखरे महाराजांनी या ओवीचा अर्थ :
"आणि विशेषकरून या ग्रंथावरच ज्यांची उपजीविका असेल त्यांना इहलोकीचे तसेच परलोकीचे सुख प्राप्त होवो." असा दिला आहे.
या दोन्हीत 'हा ग्रंथ' याचा अर्थ ज्ञानेश्वरी असा दिसतो. हे दोन्ही सांप्रदायिक अर्थ संदिग्ध आणि न पटणारे आहेत. ते जरी खरे धरले तरी त्यांतील दानयाचना अगदीच संकुचित आहे, हे उघड दिसते.
....
आता या आठव्या ओवीतील 'ग्रंथोपजीवी' आणि 'दृष्टादृष्ट' या सब्दांचे अर्थ पाहू.
ग्रंथोपजीवी:-- पुस्तकव्यवहारांवर ज्यांचा योगक्षेम चालतो असे व्यावसायिक लोक. सांप्रतकाळीं प्रकाशक, पुस्तकविक्रेते, लेखक. (रद्दी दुकानदारांचा यात समावेश करणे योग्य ठरेल काय? असो.)
{अवांतर:-- लेखनाच्या मानधनावर ज्यांची उपजीविका चालते अशा मराठी लेखकांची संख्या नगण्य आहे. मराठी लेखकांना मिळणार्या मानधनाविषयी एक अटकळ अशी आहे की लेखकांना मानधन देण्याच्या रीतीचा प्रकाशनव्यवसायात जेव्हा प्रारंभ झाला तेव्हापासून आजपर्यंत यच्चयावत सर्व मराठी लेखकांना मिळालेले एकूण सर्व मानधन हे हॅरी पॉटर पुस्तकमालिकेच्या लेखिकेला मिळालेल्या एकूण मानधनाच्या साधारणपणे ४२% भरावे. अवांतर समाप्त.}
पूर्वीच्या काळातील ग्रंथोपजीवी कोण? त्याकाळी मुद्रणकला ज्ञात नव्हती. पण ग्रंथनिर्मिती होत असे. गावातील एखादा धनिक या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती करून घेई. त्यासाठी सुवाच्य हस्ताक्षर असलेल्या लेखनिकाची नेमणूक करीत असे. गावातील देवळात पठणासाठी (वाचण्यासाठी) ही प्रत उपलब्ध होत असे. पाठक/निरूपक ग्रंथाचे वाचन करीत. ते ऐकण्यासाठी श्रोते देवळात जमत. अशा प्रकारे ग्रंथाचा प्रसार होई. पाठकांना त्यांच्या कामाप्रीत्यर्थ काही धन,वस्तू इ. प्राप्ती होई. याप्रमाणे ग्रंथलेखनिक आणि ग्रंथपाठक, निरूपक, प्रवचनकार हे त्या काळचे ग्रंथोपजीवी होते असे म्हणता येते.
ओव्या लिहिता लिहिता तो ओवी छंद एखाद्या लेखनिकाच्या मनात भिनतो. भाषा मनात घोळते. मग तो एखाद दुसरी ओवी स्वत: रचून आपल्या हस्तलिखितात घुसडतो. याप्रमाणे ग्रंथात प्रक्षेपण होऊ शकते. ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या ओव्या नकलून काढताना आपणासाठी काहीतरी विशेष मागावे असे वाटून कोण्या लेखनिकाने 'आणि ग्रंथोपजीविये...' ही ओवी प्रक्षिप्त केली असावी. अंगात ओवी छंद भिनला पण त्याच्या मनाला पसायदानाच्या उदात्ततेचा स्पर्श झाला नाही.
दृष्टादृष्ट:---
या शब्दाचे तीन अर्थ संभवतात.
१) नजरानजर, डोळ्याला डोळा भिडविणे. हा अर्थ इथे प्रस्तुत नाही म्हणून सोडून देऊ.
२) दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे, ऐहिक, या जगातले, वास्तविक. उदा.: घरदार, शेतीवाडी, आसन, भोजन, शय्या इ. अदृष्ट म्हणजे इथे न दिसणारे, पण परलोकात आहेत असे मानीव (मनोकल्पित) उदा.: स्वर्ग, नंदनवन, अमृत, अप्सरा, कामधेनू इ. यावरून दृष्टादृष्टविजय = या सर्व भोगांचा निग्रहपूर्वक त्याग.
३) दृष्ट:- दृश्य स्वरूपातील भय. उदा. चोर, हिंस्त्र श्वापदे, साप इ. तर अदृष्ट:- अदृश्य स्वरूपातील भय. उदा. भूत, पिशाच्च, समंधइ. भूतबाधेसाठी 'अदृष्टाची भीती' असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. यावरून दृष्टादृष्टविजय = या भयांपासून मुक्ती.
'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी'(लेखक म.वा.धोंड) या पुस्तकात '...आणि ग्रंथोपजीविये' हा लेख आहे. त्यात वरील क्र. ३) चा अर्थ गृहीत धरून आठवी ओवी प्रक्षिप्त नाही, असे समर्थन केले आहे. या प्रतिवादाचे कारण असे की 'श्री ज्ञानेश्वर' या पुस्तकात लेखक माधव दामोदर अळतेकर यांनी 'ही आठवी ओवी प्रक्षिप्त आहे की काय?' अशी शंका व्यक्त केली आहे. यावर म.वा.धोंड यांचा युक्तिवाद असा की लेखनिक, पाठक, निरूपक, प्रवचनकार या ग्रंथोपजीवींद्वारेच लेखकाचा ग्रंथ जनसामान्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांचे हे महत्त्व जाणून ज्ञानदेवांनी त्यांच्यासाठी विशेष दान मागितले आहे. यांतील पूवार्ध खरा असला तरी निष्कर्ष पटण्यासारखा नाही.
माझ्या मते या ओवीचा अन्वय आणि अर्थ पुढीलप्रमाणे:
"आणि विशेषें ग्रंथोपजीविये इये लोकीं दृष्टादृष्टविजये होवावे जी."
"आणि विशेषेकरून, ग्रंथांच्या प्रती लिहून उपजीविका चालविणार्या (आम्हांसारख्या) ग्रंथोपजीवींना दृष्ट संकटे तसेच अदृष्ट भीती यांची बाधा होऊ नये."
(ओवी प्रक्षिप्त मानून प्रक्षेपकाच्या दृष्टिकोनातून अर्थ लिहिला आहे.) वरील दोहोपैकी कोणताही अर्थ घेतला तरी ते मागणे संकुचितच ठरते. ते अन्य सात मागण्यांच्या पंक्तीत बसत नाही.
या सर्व ऊहापोहाचा निष्कर्ष असा की (माझ्या मते) ही ओवी प्रक्षिप्त आहे. ती ज्ञानेश्वरांनी रचलेली नाही.

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे।..........................................................................................
तोषोनी मज द्यावे । पसायदान हे ॥१॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रति वाढो।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥२॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥३॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मंदियाळी।
अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥४॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥
चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन।
ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतू ॥६॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिही लोकीं।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥७॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्ट विजये । होवावे जी ॥८॥
येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥९॥
पसायदान हे एक अपूर्व आणि उदात्त असे मागणे आहे. 'आता विश्वात्मके देवे...' या ओवीपासून या दानयाचनेची उदात्तता ओवीगणिक वाढत जाते. ती 'किंबहुना सर्व सुखी' या सातव्या ओवीत परिसीमा गाठते. इथे किंबहुनाचा अर्थ 'याहून अधिक काही मागण्याचे कारणच उरले नाही' असा होतो. या ओवीनंतर आता सर्वात्मक देवाचे दानप्रसादवचन व्हावे हे क्रमप्राप्त वाटते. पण तसे न होता,
आणि ग्रंथोपजीविये॥ विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्टविजये। होवावे जी ॥८॥>>
ही ओवी येते आणि रसभंग होतो. पसायदानाचा अर्थ समजून घेत, ते लक्षपूर्वक ऐकताना ही आठवी ओवी मला नेहमी खटकते. त्रैलोक्यातील यच्चयावत सर्वजण सुखी व्हावेत असे दान मागितल्यावर आणखी काही मागायचे राहते का? सातव्या ओवीतील 'किंबहुना' शब्दावरून आता मागणे संपले असा अर्थ सुस्पष्टपणे प्रतीत होतो. यानंतर ग्रंथोपजीवी लोकांसाठी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे काही विशेष मागणी करतील हे संभवत नाही. 'किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिही लोकी' असे मागून झाल्यावर, "हां! आणखी एक राहिलेच. इथले ते ग्रंथोपजीवी (आहेत ना) त्यांना दृष्टादृष्ट भयावर विजय मिळावा हो!", असे ज्ञानेश्वर म्हणतील का? छे:! पसायदानातील ही ओवी प्रक्षिप्तच असली पाहिजे.
या ओवीची प्रक्षिप्तता दर्शविणारे कळीचे दोन शब्द पसायदानात आहेत.ते म्हणजे १)किंबहुना २) आठव्या ओवीतील आरंभीचा शब्द 'आणि'. 'किंबहुना' या संस्कृत शब्दाचा अर्थ ,'बहुना किम्?' यापेक्षा अधिकाचे काय प्रयोजन ? - म्हणजे याहून अधिक मागण्याचे काही कारणच उरले नाही असा होतो. म्हणजे तो तसा आहेच. किंबहुना शब्दावरून सातव्या ओवीत मागणे संपले हे स्पष्ट होते. तर आठव्या ओवीतील 'आणि' या आरंभीच्या शब्दावरून मूळ पसायदानात भर घातली जात आहे हे दिसते. ओवी क्र.२ ते ७ यांत अधिकाधिक व्यापक होत जाणारी जी सात दाने मागितली आहेत त्यांच्या पंक्तीत आठव्या ओवीतील संकुचित याचना विशोभित दिसते. ती सात दाने अशी:
- दुर्जनांचे दुष्ट विचार जाऊन त्यांच्या ठिकाणी सत्कृत्यांविषयी आवड निर्माण व्हावी.
- सर्व प्रणिमात्रांची परस्परांशी मैत्री जडावी.
- पापाचा अंधार नाहीसा होऊन जगात स्वधर्मसूर्याची पहाट उजाडावी.(म्हणजे प्रत्येकाला आपल्या कर्तव्यकर्माची जाणीव व्हावी.)
- प्रत्येक प्राणिमात्राला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही लाभावे.
- जगातील सर्व माणसांना ईश्वरनिष्ठ संत सदैव भेटावे.
- सर्व माणसांनी सज्जनांशी नाते जोडावे.
- त्रैलोक्यातील सर्वजण सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची (परब्रह्म परमात्म्याची) अविरत भक्ती करावी.[याहून अधिक काय मागायचे?]
या सर्व गोष्टींचा विचार करता - आणि ग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।दृष्टादृष्ट विजये । होवावे जी ॥८॥ - ही ओवी प्रक्षिप्त ठरते.
सोनोपंत दांडेकरांच्या सार्थ ज्ञानेश्वरीत या ओवीचा अर्थ असा दिला आहे:--
"आणि या मृत्युलोकात विशेंषेकरून हा ग्रंथच ज्यांचे जीवन होऊन रहिला असेल, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे."
साखरे महाराजांनी या ओवीचा अर्थ :
"आणि विशेषकरून या ग्रंथावरच ज्यांची उपजीविका असेल त्यांना इहलोकीचे तसेच परलोकीचे सुख प्राप्त होवो." असा दिला आहे.
या दोन्हीत 'हा ग्रंथ' याचा अर्थ ज्ञानेश्वरी असा दिसतो. हे दोन्ही सांप्रदायिक अर्थ संदिग्ध आणि न पटणारे आहेत. ते जरी खरे धरले तरी त्यांतील दानयाचना अगदीच संकुचित आहे, हे उघड दिसते.
....
आता या आठव्या ओवीतील 'ग्रंथोपजीवी' आणि 'दृष्टादृष्ट' या सब्दांचे अर्थ पाहू.
ग्रंथोपजीवी:-- पुस्तकव्यवहारांवर ज्यांचा योगक्षेम चालतो असे व्यावसायिक लोक. सांप्रतकाळीं प्रकाशक, पुस्तकविक्रेते, लेखक. (रद्दी दुकानदारांचा यात समावेश करणे योग्य ठरेल काय? असो.)
{अवांतर:-- लेखनाच्या मानधनावर ज्यांची उपजीविका चालते अशा मराठी लेखकांची संख्या नगण्य आहे. मराठी लेखकांना मिळणार्या मानधनाविषयी एक अटकळ अशी आहे की लेखकांना मानधन देण्याच्या रीतीचा प्रकाशनव्यवसायात जेव्हा प्रारंभ झाला तेव्हापासून आजपर्यंत यच्चयावत सर्व मराठी लेखकांना मिळालेले एकूण सर्व मानधन हे हॅरी पॉटर पुस्तकमालिकेच्या लेखिकेला मिळालेल्या एकूण मानधनाच्या साधारणपणे ४२% भरावे. अवांतर समाप्त.}
पूर्वीच्या काळातील ग्रंथोपजीवी कोण? त्याकाळी मुद्रणकला ज्ञात नव्हती. पण ग्रंथनिर्मिती होत असे. गावातील एखादा धनिक या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती करून घेई. त्यासाठी सुवाच्य हस्ताक्षर असलेल्या लेखनिकाची नेमणूक करीत असे. गावातील देवळात पठणासाठी (वाचण्यासाठी) ही प्रत उपलब्ध होत असे. पाठक/निरूपक ग्रंथाचे वाचन करीत. ते ऐकण्यासाठी श्रोते देवळात जमत. अशा प्रकारे ग्रंथाचा प्रसार होई. पाठकांना त्यांच्या कामाप्रीत्यर्थ काही धन,वस्तू इ. प्राप्ती होई. याप्रमाणे ग्रंथलेखनिक आणि ग्रंथपाठक, निरूपक, प्रवचनकार हे त्या काळचे ग्रंथोपजीवी होते असे म्हणता येते.
ओव्या लिहिता लिहिता तो ओवी छंद एखाद्या लेखनिकाच्या मनात भिनतो. भाषा मनात घोळते. मग तो एखाद दुसरी ओवी स्वत: रचून आपल्या हस्तलिखितात घुसडतो. याप्रमाणे ग्रंथात प्रक्षेपण होऊ शकते. ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या ओव्या नकलून काढताना आपणासाठी काहीतरी विशेष मागावे असे वाटून कोण्या लेखनिकाने 'आणि ग्रंथोपजीविये...' ही ओवी प्रक्षिप्त केली असावी. अंगात ओवी छंद भिनला पण त्याच्या मनाला पसायदानाच्या उदात्ततेचा स्पर्श झाला नाही.
दृष्टादृष्ट:---
या शब्दाचे तीन अर्थ संभवतात.
१) नजरानजर, डोळ्याला डोळा भिडविणे. हा अर्थ इथे प्रस्तुत नाही म्हणून सोडून देऊ.
२) दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे, ऐहिक, या जगातले, वास्तविक. उदा.: घरदार, शेतीवाडी, आसन, भोजन, शय्या इ. अदृष्ट म्हणजे इथे न दिसणारे, पण परलोकात आहेत असे मानीव (मनोकल्पित) उदा.: स्वर्ग, नंदनवन, अमृत, अप्सरा, कामधेनू इ. यावरून दृष्टादृष्टविजय = या सर्व भोगांचा निग्रहपूर्वक त्याग.
३) दृष्ट:- दृश्य स्वरूपातील भय. उदा. चोर, हिंस्त्र श्वापदे, साप इ. तर अदृष्ट:- अदृश्य स्वरूपातील भय. उदा. भूत, पिशाच्च, समंधइ. भूतबाधेसाठी 'अदृष्टाची भीती' असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. यावरून दृष्टादृष्टविजय = या भयांपासून मुक्ती.
'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी'(लेखक म.वा.धोंड) या पुस्तकात '...आणि ग्रंथोपजीविये' हा लेख आहे. त्यात वरील क्र. ३) चा अर्थ गृहीत धरून आठवी ओवी प्रक्षिप्त नाही, असे समर्थन केले आहे. या प्रतिवादाचे कारण असे की 'श्री ज्ञानेश्वर' या पुस्तकात लेखक माधव दामोदर अळतेकर यांनी 'ही आठवी ओवी प्रक्षिप्त आहे की काय?' अशी शंका व्यक्त केली आहे. यावर म.वा.धोंड यांचा युक्तिवाद असा की लेखनिक, पाठक, निरूपक, प्रवचनकार या ग्रंथोपजीवींद्वारेच लेखकाचा ग्रंथ जनसामान्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांचे हे महत्त्व जाणून ज्ञानदेवांनी त्यांच्यासाठी विशेष दान मागितले आहे. यांतील पूवार्ध खरा असला तरी निष्कर्ष पटण्यासारखा नाही.
माझ्या मते या ओवीचा अन्वय आणि अर्थ पुढीलप्रमाणे:
"आणि विशेषें ग्रंथोपजीविये इये लोकीं दृष्टादृष्टविजये होवावे जी."
"आणि विशेषेकरून, ग्रंथांच्या प्रती लिहून उपजीविका चालविणार्या (आम्हांसारख्या) ग्रंथोपजीवींना दृष्ट संकटे तसेच अदृष्ट भीती यांची बाधा होऊ नये."
(ओवी प्रक्षिप्त मानून प्रक्षेपकाच्या दृष्टिकोनातून अर्थ लिहिला आहे.) वरील दोहोपैकी कोणताही अर्थ घेतला तरी ते मागणे संकुचितच ठरते. ते अन्य सात मागण्यांच्या पंक्तीत बसत नाही.
या सर्व ऊहापोहाचा निष्कर्ष असा की (माझ्या मते) ही ओवी प्रक्षिप्त आहे. ती ज्ञानेश्वरांनी रचलेली नाही.
शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३
काळी शाई खरेच काळी असते काय?
अजून तुम्ही शाईचे पेन वापरत असाल तर काळी शाई खरेच काळ्या रंगापासून बनवलेली आहे काय हे शोधून काढण्यासाठी एक सोपा प्रयोग करून पहायचा आहे. या प्रयोगातून तुम्हाला रंग कसे वेगळे करायचे हेसुद्धा समजेल. रंगीत गोळ्यांमधील रंग एकच आहे की निरनिराळे रंग मिसळून गोळीवरील रंग बनला आहे हेसुद्धा याच प्रयोगातून समजेल.
साहित्य - पाच काळ्या शाईची फाउंटन पेन्स. बॉल पॉइंट पेन नको. कारण बॉलपॉइंट पेनची शाई पाण्यामध्ये विरघळत नाही. जाड पेपर नॅपकिन किंवा टिश्यू पेपर, कातरी, पाणी, उंच काचेचा पारदर्शक ग्लास. काळी पेनची शाई उपलब्ध न झाल्यास बडीशेपेच्या रंगीत गोळ्या. हा प्रयोग रंग कसे तयार झाले आहेत हे शोधण्यासाठी आहे.
सर्वात आधी पेपर नॅपकिनचे अडीच सेमी रुंदीचे तुकडे कापून घ्या. लांबी सुमारे 15 सेमी असावी. एका कडेपासून सुमारे 2 सेमी अंतरावर शिसपेन्सिलची एक रेघ आखून घ्या. ज्याचे रंग तुम्हाला वेगळे करून पहायचे आहेत त्याचे पाण्यातील मिश्रण या रेघेवर आपल्याला ठेवायचे आहे. काळी शाई भरलेले पेन तुमच्याकडे असल्यास शिसपेंसिलीच्या रेघेवर पेनचे नीब टेकवा. शाई कागदावर ओढली जाईल. फार मोठा शाईचा ठिपका येणार नाही याची काळजी घ्या. शाईचा ठिपका आपण पंचिंग मशीनने कागदाला छिद्र पाडतो त्याहून मोठे व्हायला नको. ओढली गेलेली शाई कोरडी होईपर्यंत थांबा. आण्खी एकदा पेनचे नीब कोरड्या ठिपक्यावर टेकवा. बडीशेपेच्या वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या पाण्यात विरघळवा. प्रत्येक रंगाच्या गोळीचे द्रावण वेगवेगळे ठेवा. घरातील लाकडी टूथपिक रंगीत गोळीच्या पाण्यात बुडवा आणि शाईच्या ठिपक्याशेजारी सुमारे 3 सेमी अंतरावर रंगीत गोळीच्या पाण्याचे ठिपके नॅपकिनवर उमटूद्या. एकाच नॅपकिनवर तुम्हाला दोन्ही प्रयोग करता येतील. ठिपके कोरडे झाल्याशिवाय त्यावर दुसरा ठिपका द्यायचा नाही याची काळजी घ्या. प्रत्येक रंगासाठी वेगेळी टूथपिक वापरा नाहीतर रंगांचे मिश्रण तयार होईल.
पेपर नॅपकिनवरील ठिपके कोरडे झाले म्हणजे उंच ग्लासमध्ये 1-5 सेमी पाणी घाला. ग्लासच्या कडेस पाणी लागायला नको. पाणी थेट तळाशी गेले पाहिजे. ज्या नॅपकिनच्या कडेस आपण रंग वेगळे करण्यासाठी ठिपके दिले आहेत त्याच्या विरुद्ध बाजूस छिद्र पाडून त्यात एक दोरा ओवा. आता ठिपके दिलेली बाजू ग्लासच्या तळाकडे पण पाण्यात बुडेल अशी ठेवा. रंगीत ठिपका पाण्याच्या पातळीच्या वर रहायला हवा. विरुद्ध बाजूचा दोरा ग्लासच्या काठावरून बाहेर घ्या. ग्लासवर झाकण लावा.
थोड्या वेळात नॅपकिन खालून ओला व्हायला लागेल. पाणी जसे वर चढेल तसे रंग वेगळे होत आहेत हे तुम्हाला दिसेल. सु 10-12 सेमी कागद ओला झाला म्हणजे तो बाहेर काढा. कागद उन्हामध्ये किंवा सावलीत कोरडा करा. काळ्या शाईच्या ठिपक्यामध्ये दोन किंवा तीन वेगेवेगळे रंग आहेत हे तुम्हाला दिसेल , तसेच बडीशेपेच्या गोळीवरील रंग त्यातल्यात्यात हिरवा, जांभळा, पारवा किती रंगांनी बनले आहेत ते तुम्हाला कळेल. या प्रयोगाचे नाव वर्णलेखन (क्रोमॅटोग्राफी) रंग वेगळे करण्यासाठी आपण कागद वापरला आहे म्हणून याला पेपर क्रोमॅटोग्राफी असे म्हणतात. हिरव्या पानातील क्लोरोफिल किती रंगानी बनले आहे हे शोधून काढा आणि मला कळवा. फक्त पाने खलबत्त्यामध्ये बारीक करून त्यामध्ये पाणी घाला. द्रावण फिल्टर कागदातून गाळून घ्या आणि त्या द्रावणाचे ठिपके कागदावर द्या म्हणजे झाले.

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३
आजही अण्णा भाऊ..
'लोकशाहीर' अण्णा भाऊ साठे यांची आज ११३ वी जयंती. त्यानिमित्त हा लेख, त्यांच्या साहित्यिक कार्याचे मूल्यमापन आजही का महत्त्वाचे ठरते याविषयीच्या चर्चेची सुरुवात करून देणारा..
'ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूनं नि निष्ठेनं मी चित्रित करणार आहे नि करीत आहे.'
पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणाऱ्या व आपल्या वरील विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेनं राहणाऱ्या लोकशाहीर, साहित्यिक कॉ.अण्णा भाऊ साठे यांची १ ऑगस्टला जयंती आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ हे कामगार-कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर म्हणून अधिक नावाजले. परंतु तथाकथित प्रस्थापित ब्राह्मणी साहित्य-संस्कृतीच्या ठेकेदारांनी व त्यांच्या समीक्षकांनी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा साहित्यिक म्हणून उचित गौरव व सन्मान केला नाही. त्यांच्या वाटय़ाला १९६० च्या दशकापर्यंत म्हणजे दलित-आंबेडकरी-प्रगत साहित्याच्या चळवळीच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे, कॉ. अमर शेख व शाहीर कॉ. द. ना.गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. परंतु या तिघांचेही भव्य उचित स्मारक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ५० वर्षांनंतरही झालेले नाही. या कालखंडात अखिल भारतीय म्हणविणारी अनेक मराठी साहित्याची संमेलने झाली. परंतु त्यापकी एकाही साहित्य संमेलनाला अण्णा भाऊ साठे वा अमर शेखांना ना सन्मानाने निमंत्रित केले, ना त्यांच्या साहित्यावर चर्चा केली. वरील साहित्यिकांच्या वाटय़ाला जी उपेक्षा आली, त्याचे एक कारण ते कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित होते व दुसरे म्हणजे ते ज्या जातवर्गीय समाजातून आले होते व त्यांनी ज्या दलित-शोषित, कष्टकरी जातवर्गीयांची वेदना, दाहक जीवन वास्तव आपल्या साहित्यातून मांडले व प्रस्थापित समाजव्यवस्थेवर, संस्कृतीवर आपल्या लेखनातून, गाण्यातून जे आसूड ओढले ते सत्तेवरील प्रस्थापित राज्यकर्त्यांना व त्यांची पालखी वाहणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्रातील मक्तेदारांनाही रुचणारे नव्हते.
त्या संदर्भात अण्णा भाऊ आपल्या 'वैजयंता' कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हणतात, 'जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते, हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षांवर अढळ विश्वास आहे.' अण्णा भाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते. त्याबाबत ते एका ठिकाणी म्हणतात, 'जे मी स्वत: जगलो आहे, पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे, तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या साहित्यातील बऱ्याच व्यक्तिरेखा मला प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत. '
अण्णा भाऊंच्या साहित्यातील वैविध्य, भाषेवरील पकड पाहिली की कोणीही अचंबित होईल एवढे सामथ्र्य त्यांच्या लेखणीत आहे. सुरुवातीस 'लोकयुद्ध', 'युगांतर'मध्ये त्यांनी वृत्तांत लेखन, मुलाखती, लेख लिहिले. 'वाट्टेल ते' आणि 'हवे ते' ही सदरे लिहिली. 'मराठा'सारख्या दैनिकातही लेखन केले. पहिली कथा कम्युनिस्ट पक्षाच्या 'मशाल' साप्ताहिकात लिहिली.
कथांमधून काळाशी सुसंगती
अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले. त्यांच्या 'बंडवाला' या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे. 'रामोशी' या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे. 'कोंबडीचोर'मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे. 'बरबाद्या कंजारी' या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे. अण्णा भाऊंच्या 'गजाआड' या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात. 'जिवंत काडतूस' या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात. अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वष्रे मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगर या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे, त्यांचा जीवनसंघर्ष अण्णा भाऊंच्या 'चिरागनगरची भुतं' या संग्रहातील कथांत आढळतो. 'मरीआईचा गाडा' या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचेही चित्रण अण्णा भाऊंच्या 'वळण', 'सापळा' या कथांमध्ये आढळते. दलितांनी मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावणे, त्याचे मांस खाणे थांबवावे असा संदेश डॉ. बाबासाहेबांनी दिला होता. त्या संदेशामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती, अनेक गावांत दलितांना बहिष्काराला तोंड द्यावे लागले होते. अनेक दलितांना मृत मांस खाण्याच्या जुन्या सवयी सोडणेही जड जात होते. या द्वंद्वाचे चित्रणही अण्णा भाऊंच्या 'वळण', 'सापळा'सारख्या कथांत आढळते. भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण 'उपकाराची फेड' या कथेत पाहायला मिळते.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. 'फकिरा' या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या 'फकिरा'मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. 'वैजयंता' कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. 'माकडीचा माळ' ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही.
त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाडय़ांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना बंगालचा दुष्काळ, तेलंगणा संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील मुंबईची लावणी, माझी मना, कामगार चळवळीवरील 'एकजुटीचा नेता' ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बíलनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील 'चिनी जनांची मुक्तिसेना' गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले 'जग बदल घालूनी घाव-सांगुनी गेले मला भीमराव' हे गाणे अशी अनेक गाणी, कवने, पोवाडय़ांतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
पुरोगामित्वाची परंपरा.. शिवरायवंदन!
अण्णा भाऊंनी आपल्या पुरोगामी-समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण-गवळण ढाच्यातही (form) आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजासारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल-टवाळी चालायची तिलाही त्यांनी काट दिला. अण्णा भाऊंनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाटय़ातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी, िहदी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि 'महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की' असा गौरव केला.
अण्णा भाऊ साठेंच्या या क्रांतिकारक विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने ते जेव्हा मुंबईच्या 'माटुंगा लेबर कॅम्प' या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा विकसित झाला. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते / कार्यकत्रे कॉ.आर. बी. मोरे, कॉ. के. एम. साळवी, कॉ. शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये कॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर कॉ. अमर शेख व शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला. अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित कॉ. स. ह.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने, कॉ. वा. वि. भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाटय़संग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णा भाऊंच्या 'शाहीर' या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे. अण्णा भाऊंच्या 'इमानदार' नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित 'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन'(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात अभिनेते कॉ .ए. के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर कॉ.अण्णा भाऊंना 'इप्टा'चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णा भाऊंच्या 'फकिरा' कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही 'इप्टा'च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अण्णा भाऊंमधील लेखक-कलावंत जपण्याचे व फुलविण्याचे काम कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यां कॉ. जयवंताबाई या त्यांच्या द्वितीय पत्नीने अपार त्याग व काबाडकष्ट करून अखेपर्यंत केले. त्यांना त्यांच्या दोन मुली शांताबाई व शकुंतलाबाई यांचीही साथ लाभली. त्याची नोंद मात्र संबंधितांनी घेतली नाही व उचित सन्मान केला नाही याची खंत आहे.
* लेखक सांस्कृतिक व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप क...
-
शिक्षण मंत्रालय 'विकसित भारत बिल्डथॉन २०२५' मुळे नवनिर्मितीच्या पुनर्जागरणाला चालना मिळेल आणि तरुण नवप्रवर्तक आत्मनिर्भर भारताचे च...
-
शाळेचे संगणकिकृत वेळापत्रक बनवून मिळेल SOAR – AI for Educators - Versatile Scientist ...