रविवार, २४ डिसेंबर, २०१७

हिंदू विश्व प्रार्थना सर्वांना म्हणता आलीच पाहिजे

।। अथ मंत्र पुष्पांजली ।।


ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|
ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:
अर्थ : देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन केले.
यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते.
जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत
ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव)
प्राप्त करते झाले.

ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने |
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
स मे कामान्कामकामाय मह्यम्|
कामेश्वरो वैश्रवणो ददातु|
कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम:
अर्थ : आम्हाला सर्वकाही (प्रसहय़) अनुकूल घडवून आणणा-या
राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर
कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची)पूर्ति प्रदान करो.

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं
पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं
अर्थ : आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे.
आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे.
येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित
असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

समंतपर्यायीसार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति
अर्थ : आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या
पृथ्वीवर आमचे एकसंध दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत
 म्हणजे परार्ध वर्षपर्यंत सुरक्षित राहो.

तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति।
अर्थ : या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी
 हा श्लोकक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद
असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

ॐ विश्व दकचक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतोबाहुरुत
विश्वतस्पात संबाहू ध्यानधव धिसम्भत त्रैत्याव भूमी जनयंदेव एकः।

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥
नाना सुगंध पुष्पांनी यथापादो भवानीच
पुष्पांजलीर्मयादत्तो रुहाण परमेश्वर

ॐ भूर्भुव: स्व: भगवते श्री सांबसदाशिवाय नमः।
मंत्र पुष्पांजली समर्पयामि।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .