माझा मुलगा २५ वर्षांचा आहे. कमावता आहे. पगार चांगला, त्याला गुंतवणूक सल्ला काय देऊ, असा प्रश्न विचारणारा एका वडिलांचा मेल आला. (हे प्रश्न पंचविशीच्या मुलांना पडले तर मला जास्त आनंद होईला) तर त्याचं हे उत्तर सोपं सांगतो, क्रिकेटचा नियम, तुम्ही ओपनर असाल तर तुम्हाला जास्त ओव्हर्स खेळायला मिळतात. बेंटिंगचं प्रेशर कमी असतं, उचलून मारता येतं. समजा, गेलीच विकेट तर नंतर येणारे खेळाडू मॅच नेऊ शकतात, ढुकुटुकूचं प्रेशर नसतं.
तेच गुंतवणुकीच्या बाबतीत. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकं तुमच्यावरचं प्रेशर कमी, ताण कमी, संधी जास्त धोके पत्करण्याची शक्यता जास्त चुकलं काही तर दुरुस्त करता येतं. त्यामुळे नियम एकच साधा सोपा, स्टार्ट अल. त्यासाठी काय करता येईल?
१. थोड़े, पण नियमित- तरुण आहात, हातात खर्चायला जास्त पैसे असावेत असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे जी काही रक्कम गुंतवायची ठरवाल ती अंदाज घेऊन ठरवा, त्यात सातत्य ठेवा. सातत्य ठेवलं तरच स्कोअर मोठा होतो.
२. कमी रक्कम पण वर्षे जास्त अनेक तरुणांना वाटतं की आपल्याला पगार कमी, त्यातून आपण फार कमी रक्कम गुंतविणार मग काय उपायोग, पगार वाढला की पाहू हे साफ चूक. कमी रक्कम असेल तरी चालेल, तुमच्या हातात वर्षे जास्त आहेत. रक्कम कमी तर कमी, पण गुंतवा नियमित, जास्त वर्षे,
३. रिटायरमेंटचं काय?- वय २४ पण नाही आणि रिटायरमेंटचं काय सांगता, असं जर तुम्हाला वाटत असेल
तर ते चूक, खासगी नोकरी करणाऱ्यांनी आपल्या निवृत्तीनंतरच्या पैशाचं नियोजन नोकरी लागल्याच्या पहिल्या दिवसापासूनच करायला हवे.
४. तुमचं लक्ष्य काय? म्हणजे तुम्हाला अजून उच्च शिक्षण घ्यायचं आहे. करिअर बदलायचं आहे. स्वतःचं लग्न, कार, घर, घरातल्या अन्य जबाबदाऱ्या यासाठीच्या पैशाचं नियोजन करा, त्याप्रमाणे वचत गुंतवणूक करा. हे जमलं तरच तुमचे छोटे आणि मोठे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होतील आणि आपण कमावत असलेल्या पैशातून काहीतरी खऱ्या अर्थाने कमावलं असं वाटेल. आता अजून एक मोठा मंत्र म्हणजे 'जस्ट डू इट' लोक फिनांशियल प्लॅनिंगविषयी बोलतात खूप करीत काहीच नाहीत. त्यामुळे छोट का होईन, पण सुरू करा, 'जस्ट डू इट' हे विसरू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा