बुधवार, ६ एप्रिल, २०२२

आधुनिक म्हणी

आधुनिक म्हणी

१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीन सेव्हर्स फार ! 
२) आपलाच कीबोर्ड नि आपलाच माऊस |
३) सेलेरॉन गेले पेंटियम आले ।
४) विंडोज दाखव नाही तर इन्स्टॉलेशन कर ! 
५) उचलला पॉइंटर आणि लावला आयकॉनला |
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटाचे अंतर असते!
७) माऊसला मॉनिटर साक्ष ! 
८) फोर एट सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा!
९) लॅपटॉपचे बिऱ्‍हाड पाठीवर
१०) घरोघरी पेंटियमचे पीसी 
११) आपला तो पीसी दुसऱ्याचे ते मशीन
१२) व्हायरसच्या मनात अँटीव्हायरस !
१३) स्त्रीच वय, पुरुषाचा पगार, कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नये !
१४) बड़ा सी.पी.यू पोकळ डेटा ! 
१५) अडला कॉम्प्युटर यू.पी.एस.चे पाय धरी !
१६) मनी बसे ते मॉनिटरवर दिसे !
१७) नावडतीचा पीसी स्लो ! 
१८) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पचास् ।
१९) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सीडीचे |
२०) नेटवर्किंगमध्ये सेलेरॉन शेजारी पेंटियम जोडला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला |
२१) सीडींचा बाजार व्हायरसचा सुकाळ !
२२) वरून पेंटियम आतून फोर एट सिक्स ! 
२३) हाइडिस्कमध्ये नाहीच तर फ़्लॉपीत कोठून येणार.
२४) घरोघरी मायक्रोसॉफ्टचाच विंडो !
२५) सॉफटवेअर नको पण व्हायरस आवर ।
२६) हा मदरबोर्ड आणि हा प्रोसेसर ! 
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !
२८) डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .