गणितज्ञ रामानुजन यांना जवळचे मित्र नव्हते. कोणीतरी त्यांना त्याचे कारण विचारले.
त्यांनी उत्तर दिले की.... 👇
"जरी मला जवळचे मित्र हवे असले तरी कोणीही माझ्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरू शकले नाही."
जेव्हा रामानुजन यांना तुमचा मित्र कसा असावा? याची विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की, "220 आणि 284 क्रमांकांप्रमाणे!"
समोरील व्यक्ती गोंधळून गेली आणि विचारले की, "मैत्री आणि या संख्यांचा काय संबंध आहे का?"
रामानुजन यांनी त्याला 220 आणि 284 या संख्यांचे विभाजक शोधण्यास सांगितले!
बर्याच प्रयत्नाने त्या व्यक्तीने संख्यांचे विभाजक शोधले आणि त्यांची यादी केली.
220 → 1, 2, 4, 5, 10, 11, 20, 22, 44, 55, 110, 220.
284 → 1, 2, 4, 71, 142, 284.
त्यानंतर रामानुजन यांनी त्या व्यक्तीला 220 आणि 284 हे विभाजक वगळण्यास सांगितले आणि उर्वरित विभाजकांची त्या व्यक्तिला बेरीज किती होते ते विचारले.
ती व्यक्ती बेरीज पाहून थक्क झाली.....
220 → 1 + 2 + 4 + 5 + 10 + 11 + 20 + 22 + 44 + 55 + 110= 284
284 → 1 + 2 + 4 + 71 + 142= 220
रामानुजन यांनी समजावून सांगितले की, "एक आदर्श मैत्री या संख्यांसारखी असावी. एकमेकांना पूरक असावी. एखादा गैरहजर असतानासुद्धा, दुसर्याने अनुपस्थित मित्राचे प्रतिनिधित्व केले पाहिजे!"
माझ्या सर्व 220 आणि 284 सारख्या मित्रांना....
'ग' णि 'त' विषयातील.....
'गं' म 'त' शीर शुभेच्छा....🌷

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा