शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

अध्यात्म आणि आधुनिक शास्त्र

भगवदगीता आणि त्यावरून लिहिलेल्या ज्ञानेश्वरी मधे आत्मा अमर अविनाशी आहे त्याला कोणीही इजा पोहोचवू शकत नाही असं लिहीलेले आहे ते बरोबर आहे.
पण मृत्यूनंतर आपल्या शरीराबाहेर पडतो तो लिंगदेह ह्या वायुरूप देहात आत्मा असतो.
आपल्या इच्छा वासना ह्याच वायुरूप देहात सामावलेल्या असतात.
आता विचार करा सायन्स म्हणते शरीराच्या कुठल्याही भागातून मेंदूत संदेश जायला 3 सेकंद लागतात पण डोळ्यांसमोर अचानक काही आले तर 1 सेकंदाच्या आत आपण पापण्या मिटतो हे कसे.
पाणीसुद्धा 4 अंश ते 0 अंश या तापमानात विसंगत आचरण दाखवते
का
या सगळ्या गोष्टींची समाधानकारक उत्तरे सायन्सकडे नाहीत
डॉक्टर सुद्धा म्हणतात ना आता सगळं देवाच्या हातात
म्हणजेच काहीतरी सुपर नँचरल पॉवर आहे हे मान्य
आपल्याला 400 ते 700 नँनोमीटर मधील गोष्टी दिसतात ज्याला आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतो पण त्याच्याही पलीकडे युव्ही रेज, इन्फ्रारेड, गँमा वेव्हज् एक्सरे वेव्हज् आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत म्हणजे अस्तित्वात नाहीत असं नाहीये.
घुबडाला रात्री आपल्यापेक्षा जास्त दिसते, म्हणजे आपल्यापेक्षा त्याला विषेश दिसते,
आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत हे सायंटिफीकली सिद्ध झालंय
आता दहाव्या दिवशी कावळा शिवतो हे आपण कित्येकदा पाहिलं आहे, जेव्हा नातेवाईक हात जोडून प्रार्थना करतात वचन देतात तेव्हाच कसा कावळा शिवतो
कारण हा लिंगदेह त्या कावळ्याला दिसतो
आणि हे सर्व मृत्यूनंतरचे भोग त्या लिंगदेहाला भोगावे लागतात आत्म्याला नाही
तुम्ही सगळ्यांनी वाचले असेल की क्लासिकल म्युझिक लावले तर गाई दुध जास्त देतात गुजरात मधे हे प्रयोग यशस्वी झालेत
मध्यंतरी मी असं वाचलं की मुतखडा फोडण्यासाठी विशिष्ट हर्टझचा आवाज वापरला आणि अॉपरेशनशिवाय इलाज करायची पद्धत शोधून काढली
आपल्याला 20 ते 20000 हर्टझच्या मधील आवाज ऐकु येतो पण याच्या खालील लिमिटमधे हत्ती एकमेकांशी 2 किलोमीटर पर्यंत संवाद साधतात हे डिस्कव्हरी चँनेलवर दाखविले होते
म्हणजेच आवाज सुद्धा आपण ठराविक मर्यादेतील ऐकु शकतो पण त्याच्या पलीकडे आवाज आहे, आपल्याला ऐकू येत नाही म्हणून ते नाही असं म्हणता येत नाही.
आणि त्याचबरोबर आवाजात शक्ती आहे
मग आपल्या हिंदू धर्मांत जे गायत्री मंत्र, गणेश गायत्री, विष्णु गायत्री, रुद्र गायत्री हे जे मंत्र दिलेले आहेत ते अशाच विशिष्ट लहरींचे आहेत. विविध स्तोत्रे वगैरे लिहीलेली आहेत
पृथ्वीवर 70% पाणी आहे त्याला चंद्राच्या पोझिशन प्रमाणे भरती येते, मग आपल्या शरीरात 70% एवढे द्रव पदार्थ आहेत त्याला या चंद्राच्या पोझिशनमुळे फरक पडत नसेल
if A=B and B=C then A=C
जपानमध्ये पाण्यात क्रिस्टल मिक्स करून म्युझिक लावून चेक केले, क्लासिकल म्युझिक लावल्यानंतर ते बँलन्स झाले म्हणजेच म्युझिक प्रमाणेच हे मंत्र म्हणले तर आपणही आपल्या शरीरातील द्रव बँलन्स करू शकतो, आपला कॉन्शसनेस वाढवू शकतो आपला आपल्यावर ताबा चांगला राहू शकतो
पुर्वीचे ऋषी असेच नामस्मरण जप करून समाधि अवस्थेत जायचे आणि मग या गोष्टींचे ज्ञान मिळवायचे.
मी लिहिलेल्या लिपीचा तुम्हांला अर्थ लावता येतो, बोली भाषेचा ध्वनीचा अर्थ लावता येतो, इथे माध्यम हवा आहे, पण ज्यांना कॉन्शसनेस वाढल्यामुळे दिसण्या ऐकू येण्यापलीकडची रेंज समजत असेल तर ती सिद्धि प्राप्त झाल्यासारखे आहे, मग त्यांनी हवेच्या ऐवजी पृथ्वी हे माध्यम वापरले तर कदाचित् आणखीन विषेश ज्ञान प्राप्त होत असेल जे आपल्याला तेवढी रेंज नसल्यामुळे समजणे पुर्णपणे अवघड होत असेल.
पण या सगळ्या गोष्टी समजायला अभ्यास हवा आपण पहिली ते पंधरावी अभ्यास केल्यानंतर आपल्याला कॉमर्स आर्टस् इंजिनियरींग समजायला लागतं
गावाकडच्या शेतकरी माणसाला सांगितलंस की मला कोरल मधे नाहीतर इलस्ट्रेटरमधे आर्टवर्क करुन दे तीन तासात तर जमेल त्याला?
सीएनसी मशिन ड्रॉइंग दे असं जर एखाद्या शिक्षकाला सांगितलंस तर देईल का तो?
म्हणजेच त्या त्या फिल्डचा अभ्यास हवा
मग अध्यात्माचा अभ्यास पण काही वर्षे केल्यावर ह्या गोष्टी समजू लागतील
कोणते ग्रंथ वाचले उपनिषदे, भगवदगीता, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, निदान हरीपाठ किंवा दासबोध, यावरूनही हा अभ्यास वाढवता येईल.
अल्बर्ट आइनस्टाईन म्हणतो जर आम्ही मनापासून प्रयत्न केले आणि परमेश्वराने मनावर घेतले तर एखादी गोष्ट आम्हांला समजते जी आधीच असते तरी आपण त्याला शोध म्हणतो
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अश्याने भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
विवेकानंदांची देवावर पुर्ण श्रद्धा होती विश्वास होता त्यांनी हिंदू धर्मातील एका परंपरेनुसार रामकृष्ण परमहंसांना गुरु केलं आणि संन्यास घेतला होता
आणि ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या बद्दल मी काय बोलणार त्यांची विठ्ठलभक्ती सर्वमान्य आहे.स्वर्ग नरक ह्या गोष्टी या ज्ञानी संतांना मान्य होत्या.
त्यामुळेच बाकी कुणाच्याही मतांपेक्षा या संतांनी सांगितलेल्यावर माझा दृढविश्वास आहे
ज्याला जसं हवं तशी भक्ती करा हा आपल्या हिंदू धर्मातील विचार मला जास्त योग्य वाटतो
तुम्ही पुजा करा किंवा
आरती करा किंवा
जप करा किंवा
यात्रा करा किंवा
पोथ्या वाचन करा
नामस्मरण करा
तप करा
योग हटयोग करा
प्रपंच करतानाच परमार्थ करा
अगदी प्रत्येक माणसात ईश्वराचे अंश आहेत म्हणून लोकांच्यासाठी सेवा करा
इतके सुक्ष्मपणे त्याबरोबरच सोपे करुन सांगितलेल्यावर माझा विश्वास बसणारच ना
आणि सर्व मार्ग हे एकाच ईश्वराला भजतात हे उदात्त तत्त्वज्ञान सुद्धा हिंदू धर्मातीलच
दूसरा कोणत्याही धर्मात आपला धर्म सोडून वेगळ्या धर्माला मान्यता नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .