१) दोन वडील आणि दोन मुले सिनेमाला गेली. थिएटरमध्ये तीनच सीट्स रिकाम्या होत्या तरी प्रत्येकाला सीट मिळाली , कशी काय?
उत्तर:- तीनच माणसे होती - आजोबा, वडील, मुलगा
२) वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. वडिलांच्या आणि मुलाच्या वयाच्या अंकाची अदलाबदल झाली असेल तर त्यांची वये सांगा.
उत्तर:- वडील 41 मुलगा 14.
३) जर मी 10 त आठ मिळवले तर 6 होतात. उत्तर जर बरोबर असेल तर ते कसे?
उत्तर:- 10 वाजले आहेत त्यात आठ तास मिळवले की 6 वाजतात.
४) जड काय आहे? 1 किलो कापूस की 1 किलो लोखंड?
उत्तर:- दोन्हींही सारखेच आहे.
५) फक्त बेरजेच्या साह्याने आठवेळा आठ वापरून 1000 ही संख्या मिळवा.
उत्तर:- 888 + 88 + 8 + 8 + 8 = 1000
६) एका शेतकऱ्याकडे किती प्राणी आहेत असे विचारले असता तो म्हणाला, माझ्याकडे फक्त गायी, म्हशी आणि बकऱ्या आहेत.
सहा प्राणी वगळता सर्व गायी आहेत. ७ प्राणी वगळता सर्व म्हशीं आहेत. ५ प्राणी वगळता सर्व बकऱ्या आहेत तर त्या शेतकऱ्याकडे एकूण किती प्राणी आहेत?
उत्तर:- 4 बकऱ्या , 3 गायी, 2 म्हशी असे एकूण 9 प्राणी
७) 2 + 2 ही बेरीज आणि 2 × 2 हा गुणाकार समान आहे हे आपल्याला माहिती आहे. तर ज्यांचा गुणाकार आणि बेरीज समान आहे अशा तीन नैसर्गिक संख्या कोणत्या?
उत्तर:- 1, 2, 3
८) अंकाच्या बेरजेच्या सातपट असणारी सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगा.
उत्तर:- 21
९) श्रीयाचे वय 10 वर्षे होते त्यावेळी तिच्या बहिणीचे म्हणजे रियाचे वय श्रीयाच्या निम्मे होते. जर श्रीया आज 30 वर्षांची आहे तर रियाचे वय किती?
उत्तर:- 25 वर्षे
१०) एका प्राणीसंग्रहालयात पशूपक्ष्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
1 पोपट - 5 रुपये
1 कावळा - 1 रुपया
20 चिमण्या - 1 रुपया
एका व्यक्तीने 100 रुपये देऊन तिन्ही प्रकारचे मिळून 100 पक्षी घेतले तर त्याने प्रत्येक प्रकारचे किती पक्षी घेतले?
उत्तर:- 19 पोपट , 80 चिमण्या , 1 कावळा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा