दिवस उगवला संसाराचा धंदा
याचा त्याच्या टवाळक्या करतोस निंदा
सदा तुझी मरमर सारे भाव वरवर
केले त्यांचे कधी नाही चुकणार ।
विश्वासाच्या पायी वागतोस खोटा
खोटयाच्या पदरी बाधला रे गोटा
अभिमान धरू नको रंगेलपणा करू नको.
यम तुला बांधून ने नार ।
मनामध्ये भाव नाही, देवाचे नाव नाही
सांग तुला भेट कशी होणार |
नवसाच्या पायी देवाची वारी
दयामया सोडूणी जीवाला मारी
पापाची करणी देवाच्या चरणी
देव कसा कबुल करणार |
मनामध्ये भाव नाही, देवाचे नाव नाही
सांग तुला भेट कशी होणार
शर्माची वाणी ऐकुण घे काणी
लाव खरे मन आपुले देवाच्या ध्यानी
वेळ जाईल निघूनी रडशील बसुनी
मग नाही काहीच होणार |
मनामध्ये भाव नाही देवाचे नाव नाही
सांग तुला भेट कशी होणार ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा