वेळेचा सदुपयोग
प्रश्न :- रोज माझ्यासमोर अनेक कामं असतात. इतकी सगळी कठीण कामं करता करता मी थकून जातो. रोज सकाळी आज मला काय काय कामं पूर्ण करायची आहेत याची मी यादी करतो. पण जसजसा दिवस पुढे जातो मला जाणवतं, मी माझ्या टास्कवर लक्ष केंद्रित करू शकलो नाही. याला कारण माझ्या डोक्यावर असलेली अजून अनेक बाकीची कामे आणि मध्येमध्ये येऊन माझ्या सहकाऱ्यांनी प्रश्न विचारून मला दिलेला त्रास. मी स्वतःचं, कामाचं चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकत नाही. मी अनेक वेळा वेळापत्रकाचं पालन करण्याचा प्रयत्न केलाय. पण मी वैतागतो कारण कितीही प्रयत्न केला तरीही मी माझ्या वेळापत्रकाचं पालन करू शकलो नाही. मी ठरवलेल्या वेळात काम करू शकत नाही, हे आता नित्याचंच झालेलं आहे. मग अशावेळी कामात तडजोड करून किंवा रात्री उशिरापर्यंत थांबून शेवटच्या क्षणापर्यंत मी ते काम करत राहतो. मला माहीत आहे, त्या कामाला योग्य वेळ आणि लक्ष न दिल्यामुळे क्षमता असून सुद्धा मी त्या कामाला न्याय देऊ शकत नाही. सर तुम्ही अत्यंत मोठमोठे प्रॉजेक्ट मॅनेज केलेले आहेत जस एसएलव्ही थ्री, मिसाईल्स, अणूबॉब आणि त्यांना वेळेत पूर्ण केलं आहे. तुमच्या टाईम मॅनेजमेंटचं रहस्य काय ?
भविष्य ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्याकडे जाताना प्रत्येकाला ताशी साठ मिनिटे याच वेगाने जावे लागते, मग तो कोणीही असो, काहीही करत असो.
- सी.एस. लुईस.
वेळ ही शाश्वत, अनादी काळापासून अनंत काळासाठी चालत आलेली आहे. असं म्हटलं जातं, की वेळेला सुरुवात नाही आणि शेवटही नाही. तरीसुद्धा माणसानं वेळ मोजायला आणि त्याची व्याख्या करायला सुरुवात केली. जसं वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिट आणि सेकंद, शब्दांनाही अर्थ द्यायला सुरुवात केली जशी भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ वेळ कधीच थांबत नाही. ती कायम चालूच असते जे काल होतं ते आज नाही, जे आज आहे ते उद्या असणार नाही, कालचा दिवस गेलेला आहे. उद्याचा दिवस अजून यायचा आहे. आजचा दिवस मात्र आत्ता समोर आहे. आणि आजचा दिवस हुशारीने वापरणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
आपण सर्व जाणतोच, की पृथ्वी स्वतःच्या केंद्राभोवती २४ तासातून एकदा किंवा १४४० मिनिटातून एकदा किंवा ८६,४०० सेकंदातून एकदा फिरत असते. ज्याच्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होतात. सूर्याच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला तिच्या कक्षेमध्ये एक वर्ष लागतं. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्या वेळेला तुमचं आयुष्य एक वर्षांनी वाढलेलं असतं. निर्मितीचा प्रत्येक क्षण हा वेळेशी जोडलेला आहे इथे जन्म आहे. जीवन आहे आणि मृत्यू आहे. मुलाचा जन्म होतो मग बाल्यावस्थेतून तो पौगंडावस्थेत जातो. नंतर त्याचं रूपातर युवकामध्ये होतं. युवकाच रूपांतर मध्यमवयीन माणसामध्ये होते आणि मग तो वृद्धावस्थेत जातो. ऋतूही वेळेनुसार येतात. त्यानुसार झाडाना फुलं आणि फळं येतात. कोणी एका महिन्यात धान्य तयार करू शकत नाही किंवा कुठल्याही मुलाला एका वर्षात मोठ करू शकत नाही. इथे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतोच. प्रत्येक गोष्ट ही वेळेनुसारच पूर्ण होते.
वेळ ही मुक्त शक्ती आहे. ती कुणासाठी थांबत नाही. नेहमी असं म्हटलं जातं, की वेळ आणि समुद्राची भरती-ओहोटी ही कुणाची प्रतीक्षा करत नाही. वेळ हा पैसा आहे असंही म्हटलं जातं. एक मिनिट सुद्धा जर योग्य पद्धतीने वापरला नाही तर तो अनंत काळासाठी झालेला तोटा असतो. तुमच्या आयुष्यातला हरवलेला मिनिट तुम्ही कधीच परत मिळवू शकत नाही. जेव्हा लोखंड गरम असतं त्याच वेळी त्यावर हातोडा मारावा लागतो. कारण एकदा वेळ गेली तर ती परत कधीही येत नाही. तुम्ही जर वेळ वाया घालवलात तर, तुम्ही स्वतःला वाया घालवलं असा अर्थ होतो.शेक्सपिअरने ही गोष्ट अत्यंत प्रभावीपणे ज्यूलिएट सिजरमध्ये मांडली आहे. (अंक ४, दृश्य ३)
लोकांच्या दैनंदिन व्यवहारातही एक लाट असते.
भरती असतानाच ती पकडली तर सुदैवाकडे नेते.
पण सोडली तर आयुष्य उथळ आणि दुःखांनी सिमीत होते.
अशा समुद्रात आपण आहोत.
योग्य वेळ साधा किंवा हार पत्करा.
'वेळ हे सर्वोत्तम औषध आहे.' असं रोमन कवी ओविडन लिहिलं आहे. असं म्हटलं जातं, की काळ अनेक जखमा भरून काढतो. ज्यांच्यासमोर तर्क चालत नाही अशा जखमासुद्धा काळ भरून काढतो. मनुष्य हा भावनाप्रधान आहे आणि जेव्हा नकारात्मक भावना, भीती, राग, मत्सर किंवा द्वेष हे आपल्यावर हावी होतात तेव्हा आपण विचार न करता असं काही करून बसतो ज्यांचे गंभीर परिणाम होतात. नंतर डोकं शांत झाल्यावर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो पण, तोपर्यंत गोष्टी घडून गेलेल्या असतात, आपलं कायमस्वरूपी नुकसान झालेल असतं. परंतु काळानुसार या घटनासुद्धा पुसट होऊ लागतात. लोकही झालं गेलं विसरून एकमेकांना माफ करतात. हेच वेळेचं महत्त्व आहे आणि त्याला औषधी स्पर्शही आहे.
अशी म्हण आहे, की वेळ वाया घालवणं हा घात नसून आत्मघातआहे. याचा अर्थ असा, जो माणूस वेळ वाया घालवतो तो इतरांचं नाही, तर स्वतःचंच नुकसान करून घेत असतो.
वेळ हा एक ज्ञानी सल्लागार आहे, असंही म्हटलं जातं. जसजसा काळ लोटतो, तसतसा माणूस विकसित होत जातो. हा विकासाचा अनुभव त्याची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. वेळ तुम्हाला कार्य करण्याची आणि तेही हुशारीने करण्याची आठवण करून देतो. काहीजण वेळ कसा घालवायचा हा विचार करतात. तर ज्ञानी आणि प्रतिभाशाली लोक मात्र वेळेचा अत्यंत चांगला वापर करतात, फलदायक वापर करतात. असं म्हटलं जातं की हुशार माणसाला, वेळ वाया गेल्याचं दुःख सर्वांत जास्त असतं. ज्यांना वेळेचं महत्त्व माहीत नसतं ते आपला वेळ वाया घालवतात. किंवा काही न करण्यात वेळ घालवतात. अशी म्हण आहे, की वेळ वाया जो घालवणं हा घात नसून आत्मघात आहे. याचा अर्थ असा, माणूस घालवतो तो इतरांचं नाही, तर स्वतःचंच नुकसान करून घेत असतो. वेळ वाया
वेळ हीच यशाची किल्ली आहे, ज्यावर आपले नियंत्रण नाही. मात्र आपण आपले ध्येय गाठण्यासाठी त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकू शकतो.
काही लोक नेहमी तक्रार करतात, की प्रत्येक पुरेसा वेळ नाही. हे योग्य नाही. तुम्ही जर तुमच्या कार्याचं नियोजन हुशारीने केलत तर प्रत्येकासाठी तुमच्याकडे वेळ असेल. माणूस जो या निसर्गाचा भाग आहे तो वेळेच्या विरुद्ध कधीही तक्रार करू शकत नाही. माणसाला फक्त त्याचं पालन करायचं आहे. वेळ ही शक्तिशाली असते ती सर्वांवर मात करते. प्रत्येक दिवशी प्रत्येकाला चोवीसच तास मिळतात. तुम्ही ते हवे तसे वापरू शकता. या चोवीस तासांपैकी जो वेळ तुमच्याकडे उपलब्ध आहे. तो तुम्ही कुठल्या मार्गानं वापरता हे सर्वांत
गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे महत्त्वाच आहे. मी माझ्या जीवनाच्या सुरुवातीलाच ही गोष्ट शिकलो आणि माझ्या वेळेचा उपयोग मी योग्य पद्धतीन करायला लागलो. रोजच्या कामाच्या मागेमागे न जाता माझ्या वेळेचा उपयोग मी योग्य पद्धतीने करायला लागलो. तुम्ही जर वेळेवर नसाल आणि तुमची ट्रेन चुकली तर ती तुम्ही कायमसाठी चुकवलेली असते. त्याचप्रमाणे वेळेचं आहे. तुम्ही एकदा का ती चुकवली किंवा वाया घालवली तर ती आयुष्यभरासाठी घालवलेली असते. तुम्ही ती परत कधीही गाठू शकत नाही किंवा तिला परत आणू शकत नाही. म्हणूनच वेळला क्षणभंगुर अस म्हटल गेलेलं आहे.
वेळ हीच यशाची किल्ली आहे, ज्यावर आपले नियंत्रण नाही. मात्र आपण आपले ध्येय गाठण्यासाठी त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकू शकतो. चला वेळेचा उपयोग फलदायी कसा करून घ्यायचा हे शिकून घेऊ या. हे पंख असणारे दिवस असेच वाया जायला नकोत.
असे घडवा तुमचे भविष्य • या पुस्तकातून संकलित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा